सूर्य देवा दिनेशा:
भास्कराय नमः 🌷
सूर्य देवा दिनेशा मम बारबार प्रणाम:
रोज सूर्य उगवतो पण
आज सकाळी उठल्यावर माझ्या मनामध्ये आले सूर्य देवा विषयी काहीतरी लिहावे म्हणून मी हे लिहिले हे सर्वांनाच माहित आहे पण हे माझे मत साकारले
सूर्यदेवाला नमस्कार 🙏
सकाळी सूर्य उगवला नाही तर
कल्पना सहन होत नाही. या विषयावर आपण पहिली पासून ते दहावी बारावी पर्यंत निबंध लिहित असतो. प्रत्येक जण आपल्या प्राप्त बुद्धीनुसार पहिली ते दहावी वर्गात असे पर्यंत लिहीत लिहित होतो.
असो अभ्यासात होता म्हणून लिहीत होतो पण जस जसे मोठे होतो गेलो तर तसे आपल्या डोक्यातून हा विषय पुसट झाला .म्हणजे सूर्य उगवतो सूर्य मावळतो रुटीन वर्क त्याचे ते काम असते बाकी त्याच्या पलीकडे काही नाही.
सूर्याचे खूप प्रकारचे वर्णन सूर्य उगवताना पण सुंदर दिसतो आणि मावळताना पण सुंदर दिसतो आपण
ठिकठिकाणी बघण्यासाठी जातो
पौराणिक कथा, ग्रंथ ,संस्कृत भाषेत सुभाषिते, शास्त्रामध्ये अथवा रामायण ,महाभारत , होम, यज्ञ, यांच्या सारख्या विधीत आपण बघितले आहे ऐकले आहे आता सांगायचे म्हणजे .
सूर्या बद्दल जगात सर्वांना त्याच्याविषयी माहित आहे पण तो आपल्या श्वासा पेक्षाही मौल्यवान
व शक्तिशाली आहे सूर्याच्या मंत्राने कुंतीला कर्ण झालेला आहे म्हणजे केवढी शक्ती आहे त्याच्यात व त्याच्या मंत्रात. जर तो उगवला च नाही तर आपण आपली जगण्याची कल्पनाच करू शकत नाही .
आपले भारतातल्या लोकांचे भाग्य व नशीब की तो आपल्याकडे अनंत काळापासून आहे आणि अनंत पर्यंत राहणार आहे पण असे ऐकले आहे की कुठे कुठे तो सहा महिने दिवस सहा महिने रात्र असते (नॉर्थ पोल ) अंटार्टिका देशात .
तिथे राहणाऱ्या व्यक्तींचे हाल विचारू नका सूर्यप्रकाश नसल्याने ते आळशी बनतात आजाराने त्रस्त होतात, घरात उजेड नाही डोक्यात प्रकाश नाही .गोव्याला तर दरवर्षी देशोदेशी चे लोक सूर्य स्नान(सन बाथ) घेण्याकरता भरगोस पैसे खर्च करून हॉटेल बुक करून दोन तीन महिने राहतात .
कारण तीकडे सूर्याचे कडकऊन आपल्या सारखं त्यांना मिळत नाही. सकाळी ते सूर्य उगवतो तेव्हापासून तर संध्याकाळी मावळतो त्या आधी पर्यंत ते आपले आपले विशिष्ट पद्धतीचे कॉट टाकून उन्हामध्ये सन बाथ घेतात. किंवा अक्षरशा वाळूवर झोपतात. ते पूर्ण शरीरावरून उन घेतात . शरीरावर खूप कमी कपड्यांचा वापर करतात . आणि आपण त्यांना बघून आश्चर्य करतो की असे कमी कपडे घालून का उघड्यावर झोपतात .पण त्याचे महत्त्व त्यांना जास्त समजले आहे .
गोरी कातडी काळी करण्यासाठी सुद्धा ते तयार असतात .सूर्यस्नान स्किन डीसीस वर रामबाण उपाय लहान मुलांमध्ये मुडदूस रोग होतो तो याच्याने बरा होतो .आपल्याकडे मात्र याला नजर अंदाज करता .आपल्याकडे फुकटचे असून आपल्याला वेळ नसतो उन्हात बसायला डॉक्टर लहान बाळाला म्हणूनच सांगता की कोवळ्या उन्हात ठेवा म्हणजे त्याचे हाडे बळकट होतील 'डी ' जीवनसत्व मिळावे म्हणून आपण फक्त 'सी 'आणि 'डी 'जीवनसत्व आपल्या शरीरात कमी झाले की महागाचे इंजेक्शन, गोळ्या ,औषध घेतो पण उन्हात बसत नाही .शेतकरी लोक कधी आजारी पडतात का ?याचे कारण हेच ते पूर्ण दिवस उन्हामध्ये ऊन अंगावर घेऊन काम करतात. पूर्वी मोठ मोठे वाडे होते व मोकळे अंगण असल्यामुळे मुलं व माणसे जास्त बाहेरच राहायचे.
आता नवीन वैज्ञानिक विज्ञानाच्या दृष्टीने बघितले तर वैज्ञानिकांनी खूप प्रयोग करून सौर ऊर्जेपासून सोलर पॅनल तयार केले आहे त्यात सोलर कुकर म्हणून सुद्धा तयार केले आहे त्यात आपले जेवणाचे वरण-भात भाजी आणि सर्व प्रकारचे भाजणी पण होते. मोठमोठ्या फॅक्टरीज त्या पॅनलवर चालतात, घरातील दिवे ,टीव्ही ,गरम पाणी ,इत्यादी सर्व या सोलर पॅनल वर चालू शकतो .याचा शोध चार्ल्स (charles frictts)यांनी शोध लावला आहे . आपल्याला खानदेश जळगाव मध्ये जैन इरिगेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे. आजकाल तो व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे .त्याला काहीतरी सबसिडी मिळते त्याप्रमाणे ते आपण आपल्या घरावर लावू शकतो . आज-काल मोठमोठे दवाखाने, फॅक्टरी ,हॉटेल, संस्थाने मोठे मोठे गार्डन ,अशा ठिकाणी सर्रास वापर होतो.त्याचे पैसे पणभरपूर लागतात.
पण निसर्गाला काय काय मिळते?सूर्य तर ते फुकट देतो. पण त्याचे तांब्याच्या धातूचा वापर करून मोठमोठे पॅनल बनवावे लागतात. म्हणून खर्च जास्त लागतो.ती वेगळी गोष्ट
तसेच( wind Mill) याचा शोध( Charles F.Brush ) हवे पासून विद्युत तयार करतात .
याचे मोठ-मोठे उंच खांबावर मोठे मोठे फॅन लावलेले असतात खांबाची उंची 50 फुट असते पात्याची लांबी 262ते 325फूट असते हवेतून विद्युत निर्माण करतात. खूप मोठी जागा जागा लागते हेसुद्धा आपण सौर ऊर्जा सारखा वापर करू शकतो आजकाल मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये वापरतात.
निसर्गही आता माणसासारखा लहरी झाला आहे .आपण जर त्याला त्याच्या प्रमाणे वागलो तर तो आपल्याला नक्कीच साथ देईल झाडे लावा झाडे जगवा कदाचित निसर्ग सुद्धा सुखावेल व आपल्याला
भरपूर ओझोन वायू,शुद्ध हवा मिळेल व निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत होईल व नव नवीन
आजारांन पासून दूर राहू
लीलाताई वानखेडे
सुलहर
Comments
Post a Comment