"चहा"

सहर्ष सादर करत आहे 
"आनंदी सकाळ"

🌹 जागतिक चहा दीन 🌹

आज जागतिक "चहा दिवस "म्हणून
चहा बद्दलचे काही मजेशीर अनुभवी बोल  .
आपले चहा बद्दलचे प्रेम , चहाचे नाव घेतल्या बरोबर रोमँटिक वगैरे होऊन दोघात एक कप चहा घेण्यात येतो ती एक मज्जाच.
               तसेच एका वेळी दोन दोन कप चहा पिण्याची सर नाही  येणार हुक्की आली की रात्री दोन ला  घेतलेला चहा, पेनल्टी म्हणून मित्रा कडून उकळलेला चहा, पैज लावून कपावर कप ढोसलेला चहा ,चहाचे दुष्परिणाम वाचत घेतलेला चहा ,आणि सिगारेट फुंकणाऱ्यांना शिव्या घालत टपरीवरचा चहा, हा चहा चहा,🫖☕ चहा ,आणि अमृततुल्य चहा ,आता तर वेग वेगळया नावाने चहाचे दुकान उघडले आहे काय तर आमदार चा चहा ,गुळाचा चहा, यवले चहा,असे एक ना एक अनेक चहाचे दुकान थाटलेले दिसते समोर एक टोपीवाला गृहस्थ चहाची कीटली घेऊन दिमाखात उभा असतो . आणि आत मध्ये मस्त बैठक घालून चहाचे कपा वर कप घेऊन पैसे कोणी द्यायचे?याची वाट बघुन घेतलेला चहा.आजारी असल्याच्या निमित्ताने घेतलेला चहा, लहानपणी दोन्ही हातांनी बशी धरून टॉम अँड जेरी  बघत फुंकून फुर फुर् आवाज करून घेतलेला चहा, चहात Tanin नावाचे विष असते असे  सांगणाऱ्या अरसिका कडे क्षुद्र कटाक्ष टाकून प्यालेला चहा, अभ्यासासाठी रात्र-रात्र जागतांना कडक चहा आणि नाईट ड्युटीचा ,हॉस्पिटल मधला. कुणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर कोणी चहा नाही दिला तर, काय त्याने चहा ला सुद्धा विचारले नाही त्यांनी, असे म्हणून त्याच्यावर आरोप करणारा प्रश्न?
थंडीतल्या सकाळचा वाफाळलेला फक्कड चहा ,पावसाळ्यातल्या संध्याकाळचा, आणि उन्हाळ्यातल्या" दुपारचा" चार वाजेचा चहा ..! 250 km.drive केल्यानंतर आळस देत ऑर्डर दिलेला चहा, पत्त्याचा डाव आणि गप्पांची मैफिल रंगात आल्यानंतर चा चहा ,भजी बाजूला ठेवून  आधाशा सारखा घेतलेल्या चहा, चष्म्याच्या काचेवरच्या वाफा बघत घेतलेला चहा, आणि रिमझिम पावसात गाणी ऐकत घेतलेला चहा, सिंहगडच्या धुक्यातला चहा ,लोणावळ्याच्या पावसातला चहा..! आणि बस स्टैंड वर गारठलेला चहा..! सेमिनार मधला चहा, कागदी कपात घेतलेला चहा, आणि घरचा आले विलायची मसाला, मग भरून घेतलेला चहा, रेल्वेत प्रवासात डीप डीप वाला चहा, आणि लिफ्टच्या मशीनचा चहा, कंटाळा घालवण्यासाठी घेतलेल्या चहा, आणि उत्साह वाटावा म्हणून घेतलेला चहा, डोके दुखून डोकेदुखी पळवायला घेतलेला चहा, आणि राग गिळायला घेतलेला चहा ,ब्रेक म्हणून घेतलेल्या चहा आणि चहा साठी म्हणून घेतलेला, ब्रेक मधला चहा, काहीच सुचत नाही म्हणून घेतलेला आणि काहीतरी सुचाव म्हणून घेतलेला चहा, प्रॉब्लेम चे सोल्युशन म्हणून घेतलेल्या चहा आणि आनंदाचे सेलिब्रेशन साजरे करतांना घेतलेला चहा, चहाची लहर , तलफ  आणि चहाचे व्यसन म्हणून चहा, आणि आजकाल तर शुगर आहे तरी चहा प्यायचाच  म्हणून शुगर फ्री घेतलेला चहा, लेमन टी चहा, लिफ्ट टी , चहाचे अनेक प्रकार त्याची किंमत पण शंभर रू की.पासून एक हजारा पर्यंत आहे .चहातो चहा च तो चहा चाहत्यांनी च घ्यावा असा चहा😂😂
      आजचा आनंदी चहाचे प्रेमी लोकांन करता ठेरलेला चहा.
 वारे! वा! हा चहा..! घ्यावा चहा  द्यावा चहा, चहा जीवाचा विसावा.

   🙋सुलहर 😊🖋️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी