उसवण
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन",, *उसवण /माया* उसवण आणि माया या शब्दात साम्य आहे उसवण ही कपड्याची करतात, त्याचप्रमाणे माया ही मुळातच आपल्या मनात असते. आणि शिवलेल्या कपड्याच्या आत असते तीला पण माया म्हणतात. त्याबद्दलचा अनुभव आणि वास्तविकता चार पैसे आल्यावर मुलीचे बदलेले विचार आणि आईने काळजी पोटी सांगतानाचे विचार. मुलगी आईला म्हणाली "आई! देऊन टाक, कुणाला द्यायच्या असतील तर या साड्या ,कुर्तीज मला आता होत नाहीत...मी नवीन मागवतेय..." "आई, अग इतक्या चांगल्या,भारी महागामोलाच्या... चारपाच वेळा तरी वापरल्यास का? लगेच कपडे टाकून काय गं देतात...? एखादी टीप उसवली तरी परत वापरता येतील की... म्हणूनच आत माया ठेवलेली असते ना...?" "तुझ्यातली बाई लगेचच जागी झाली का..? "बोर झाल्या मला आता त्या कुर्तीज... मी नवीन बघते... " लेकीचा निग्रह बघून ती उसासली. क्षणभर ही यांच्या जीवाची उलाघाल होत नाही का वस्तू टाकताना... ...