Posts

Showing posts from February, 2022

फुगेवला

Image
सुलहर "सहर्ष सादर करत आहे  * विचार मंथन*                   🌷फुगेवाला 🌷  'फुगा' म्हटलं की लहान मुलांचा सर्वात आवडता. रंगीबेरंगी फुगे बघून मुलं घ्यायलाच लावतात पण फुटला की घाबरतात. आम्ही लहान होतो तेव्हा रोज संध्याकाळी पाच वाजता आमच्या गल्लीत  एक फुगेवाला यायचा त्याची येण्याची चाहूल लगली म्हणजे तो फुग्याला टिचकी वाजवून वेगवेगळे आवाज काढायचा किंवा पिंगाणी वाजवायचा. त्याच्यावर गाणी म्हणायचा. हळूहळू सर्व बालगोपाल मग एकामागून एक असे जमा व्हायचे, विचारायचे, 'तुला हवा होता ना...  घड्याळ किंवा इतर वस्तू ये ना लवकर, तो आपला फुगेवला आला आहे ! बघ त्याच्या आवाज येत आहे.'  आम्ही फक्त त्याच्याकडे जाऊन उभे राहायचं कारण रोज रोज घ्यायला घरून पैसे मिळत नव्हते ते फक्त श्रीमंत मुलांना रोज मिळत असे. एखादे वेळेस आई चुपचाप घ्यायची पण घेतला म्हणजे एक तर फुटायचा किंवा हवा कमी व्हायची. मग रडारडी. आई समजावयाची, ' असू दे फुगा फुटतोच म्हणून.' त्याच पैशाची खाण्याची वस्तू घ्यावी चॉकलेट-बिस्कीट तर त्यावेळी आतासारखे पन्नास शंभर रुपय...

*पतंग*

Image
सुलहर "सहर्ष सादर करत आहे * विचार मंथन*                    🌷  "पतंग" 🌷 नवीन वर्षाची सुरुवात मकरसंक्रांतीच्या  सणाने होते या सणाचे विशेष म्हणजे पतंग! (पतंग उडवण्याचा सण) अतिशय उत्साह घेऊन येतो तो आत्ताच  येऊन गेला म्हणजे मकर संक्रांत 14 जानेवारी. याला 'उत्तरायण' पण म्हणतात हा सण विषम संख्येच्या वर्षी 15 ला येतो आणि समसंख्या ला 14 ला येतो. भारतात दर वर्षी आंतरराष्ट्रीय पतंग दिवस  मनवला जातो, गुजरात मध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणावर होतो तिथे प्रत्येक जण गच्चीवर टेपरेकॉर्डर डीजे लावतात व पूर्ण दिवस गच्चीवर सहपरिवार मित्र मंडळासह ग्रुपने पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. तिथे दहा रुपयांनपासून पाचशे हजार रुपयांपर्यंतच्या पतंगी मिळतात. प्रत्येक जण जवळ  दोन चार डझन किंवा अधिक पतंगी आणतात. तसेच मांजाची चक्री पण खूप रंगात व खूप प्रकारात मिळतात त्यादिवशी जेवण खावन सर्व विसरुन बेफान होऊन पतंगी उडवतात. किती पतंगी काटल्या जातात काही अडकून पडतात तरी प्रत्येक जण  मोठ्या  उभारीने व आवेशाने उडवतात. खाणे म्हणजे ग...