रेडिओ
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन" 13 फेब्रुवारी वर्ल्ड (विश्व)रेडिओ डे या दिवशी रेडिओ बद्दल काही लिहावे असे मला वाटले म्हणून दोन शब्द लिहिले. आत्ताच रेडिओ दिन साजरा झाला आकाशवाणी केंद्र भारतीय प्रसारवाणी यांची स्थापना 13 जुलै 1927 साली झाली याचे नाव भारतीय प्रसारण सेवा होते ते नंतर 1957 ला (आकाशवाणी )केंद्राचे ऑल इंडिया रेडिओ नाव केले गेले आकाशवाणी केंद्रावरून ये आकाशवाणी है! असा आवाज प्रसारित झाला याचा अर्थ आकाशापासून मिळालेला संदेश ह्याची पंचतंत्र कथे मध्ये माहिती आहे देश स्वतंत्र झाल्यावर ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी च बोलायला लागले. सूर्य उगवायचा तो आपली सकाळ, रेडिओवरील भूपाळी ,बातम्या, याच्याने च व्हायची आणि त्याचे गोड सुमधुर धुंद (म्युझिक) ऐकायचे ते अजून तसेच आहे १) जेव्हा आकाश वाणीला सुरुवात झाली तेव्हा ड्रायव्हर, विद्यार्थी, मजदूर, यांच्या करिता विविध कार्यक्रम होते. आज जसे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तसेच एकेकाळी शहरापासून खेड्यापर्यंत प्रत्येक माणसाच्या घरात व हातात रेडिओ दिसायचा. एवढेच काय नवरदेवला लग्नात हौशीने रेडिओ देण्याची ...