नूतन वर्ष 🎉👍🏻⏳
'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" - तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹 नूतन वर्षाचे स्वागत करायचे पण त्याआधी जाणाऱ्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा. कारण जुने गेले म्हणून नवीन आले. 2020 हे वर्ष covid-19 करोना चे होते. त्याने गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना एकसारखी वागणूक दिली. त्याच्या तडाख्यात जो आला त्याला सोडलेच नाही. हे जरी खरे असले तरी Corona ने सगळ्यांना आत्मनिर्भर राहण्यास शिकवले, नात्यातली ओढ निर्माण केली आणि एकमेकांशी प्रेमाने वागावे हे लक्षात आणून दिले. त्या संकटाला सर्वांनी धीराने तोंड दिले. असो, नूतन वर्षाचे स्वागत गेल्या वर्षीच्या कडू आठवणी डिलीट करून व गोड आठवणींना उजाळा देऊन करायचे. मागील वर्षी अपूर्ण राहिलेले काही प्लॅन किंवा उपक्रम नव्याने सुरु करून नवीन गोष्टी करायच्या त्या पण जिद्दीने. "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे "! आधी करा, नुसते साखर गोड आहे हे पेपरवर लिहून चालत नाही तर ती खावी लागते व पचवावी पण लागते. नवीन वर्ष दरवर्षी येते पण प्रत्येक वेगवेगळ्या घटनांनी व प्रसंगांनी बनत जाते...