Posts

Showing posts from August, 2023

नात्याची रेसिपी

Image
स्वागत करत आहे "विचारमंथन"      🌹नात्याची रेसिपी🌹 श्रावण महिना सुरू झाला. सणवार आले की घरात स्वादिष्ट सुग्रास भोजनाचे ताट समोर येते. तेव्हा त्याविषयी थोडे काही लिहावे असे वाटले. नात्याच्या रेसिपीत पण अशीच काही जवळजवळ साम्य आहे. ते असे की वाढलेले पूर्ण पदार्थाचे ताट किती छान  दिसतात. प्रत्येक पदार्थ जिथल्या तिथे प्रत्येक पदार्थाला आपली एक स्वतःची चव आणि ठरलेली जागा सुद्धा असते. आपले आयुष्य पण असेच काहीतरी असते. आपल्या हृदयात आपल्या माणसांचा तसेच आपल्या प्रत्येक नात्याशी एक वेगळाच गोडवा असतो. भोजन वाढण्याची सुरुवात होते मिठाने डावीकडून पण सुरुवात (लेफ्टने झाली तरी ती ऑलवेज राईट) असते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव हे आपल्या आयुष्यासारखे आहे. आपले आईवडील ज्यांच्यामुळे आपल्याला जन्म मिळतो त्यांच्याशिवाय आपले जीवन बेचवच असते. मायेने डोक्यावरून हात फिरवणारे असावे, पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि हिम्मत देणारे दोन शब्द असावे. ताटाच्या मध्यभागी (सुगंधी तांदुळाचा) वरण-भात कालवल्यावर तो एक जीव झाला की परत (वरण-भात)वेगळा करतात येत नाही. तसेच हे असते नवरा बायकोच...

लग्न

Image
स्वागत करत आहे "विचारमंथन" लग्न:-एक परिवर्तन शुभमंगल सावधान! असे शब्द कानावर पडले की सर्व मंडळींना हायसे वाटते व आटोपले. 'लग्न' म्हणजे नक्की काय? असा प्रश्न लहानपणी सर्वांनाच पडतो व लहान बुद्धीप्रमाणेच विचार होतो दागिने आणि नवीन साड्या, नटायला मिळणार पण लग्न या शब्दात किती अर्थ गुण लपलेले आहे, हे लग्न ठरलेल्या अथवा लग्न झालेल्या मुलीलाच समजते तेव्हा ती मनातून हलते. आपल्याला आईचं घर सोडावं लागणार!  तसं लग्न म्हणजे सामाजिक व पारंपारिक एक शुभ सोहळा व नात्याचे बंधन आहे व एक गोड स्वप्न. पुढे म्हणजे लग्न झाल्यावर कोणी सुखी आहे का? असे प्रत्येक विवाहितांना विचारले जाते तर कदाचित काही संमिश्र उत्तर येते असो . छान चाललंय अस म्हणतो. आता सुखी म्हणजे नक्की काय? लग्न म्हणजे नशिबाची लॉटरी किंवा पत्त्याचा डाव तर ते कसे लॉटरी म्हणजे एकदम अनपेक्षित कल्पनेपेक्षा वेगळे मिळते जसे पत्त्याचा डाव  हातात आलेल्या पत्त्याप्रमाणे डाव खेळणे, कधीही हुकमाचा एक्का येतो तर कधी साधे पाने असतात. जसे असेल तसे खेळी खेळायची असते व डाव जिंकायचा प्रयत्न करायचा असतो. कधी जिंकतो तर कधी हरतो पण प्...