सहर्ष सादर करत आहे विचारमंथन 🌹 *चक्र* *पूजा* 🌹 🙏चक्र पूजा नवरात्रातील एक कुळाचार करण्याची परंपरा आहे. *चक्र* हे देवतांच्या हातातील एक शस्त्र आयुध आहे. *चक्रपूजा* केव्हा व कशी करतात. ही पूजा नवरात्रात घटस्थापना झाल्यावर *अष्टमीला* करतात यावेळी जर कांही कारणास्तव नाही झाली तर (दिवाळीच्या)कर अष्टमीला पण करतात. नवरात्रात प्रत्येक दिवस आनंदाचा असतो नवरात्र आली की गुजरात मध्ये व आता सर्वच राज्यांमध्ये *गरबा* खेळायला उत्सुक असतात. ते एका पटांगणा मध्ये मध्यभागी एक कलश ठेवतात व त्यावर दांडा रोऊन त्या भोवती फेर धरून रात्री गाणे म्हणून जागरण करतात. आपल्याकडे पण आता खूप त्याचे प्रस्थ झालेले आहे ठिक ठिकाणी देवीच्या पुढे नवरात्र संपेपर्यंत स्पर्धात्मक गरबा डान्स खेळायला मुलं-मुली एकत्र जमतात . खानदेशात चक्रपुजेचे खूप महत्त्व असून तो एक धार्मिक विधी म्हणून पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. प्रत्येकाच्या घरी आपापल्या प...
Posts
Showing posts from October, 2024