Posts

Showing posts from April, 2023
Image
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन" 🌹पूर्वीच्या मध्यमवर्गीयांच्या घरातील गमती जमती🌹😊 आपण ऐकलेल्या आहेत आणि अनुभवल्या पण आहेत त्याचे एक एक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे ते वाचून आपले बालपण आठवायचे.  प्रत्येकाची घरे तसेच लहान. तीन रूम, दोन रूमचीच होती. तेव्हा आता सारखा टापटीत पणा नव्हता पण शिस्त मात्र जरूर होती.घरात असे वेग वेगळे रूम पण नव्हते  ड्रॉईंग रूम, किचन, बेडरूम, मास्टररूम,  गेस्ट रूम, असो... 1)दारावर टॉवेल, पंचा वाळत टाकलेल्या असायचा. 2 )गोदरेजच्या कपाटाला आणि त्याच्या आरशावर टिकल्या चिटकलेल्या. 3) प्रत्येकाच्या घरात दोन प्रकारचे कॅलेंडर असायचे एक महालक्ष्मी आणि कालनिर्णय हे घरोघरीच होते. 4) रविवारी सकाळी आई, आजी  लवकर उठून मुलींचे न्हाणे करायचे व कर्ता पुरुष बाजारहाट करायचा. घरातील महिला चारीठाव जेवण करीत. बाकी सारे दुपारी मस्त झोप काढायचे आणि रात्रीच्या जेवणात पण मनसोक्त आवडीचे पदार्थ. 5) दुधाच्या पातेल्यातील लागलेली साय खरवड चमच्याने काढून खायची कधी कधी  त्यात  चहा सुद्धा करायचा आपसात भांडण करून  6) थंडी जरा कुठे कमी झाली  क...