Posts

Showing posts from May, 2024
Image
सहर्ष स्वागत करत आहे  "विचारमंथन चोर चोळी, चोर ओटी  कशी भरयची व केव्हा याबद्दल थोडी माहिती. तसे तर ही चोर ओटी मी दहा-पंधरा वर्षांपूर्वी मी माझ्या दोन्ही सुनांची भरली होती. म्हणून मी हे दोन-चार शब्द सांगू शकते परवा काय झाले अचानक मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तिच्या मुलीची चोरी ओटी, चोळी भरायची आहे तर कसं करू ग तर मी म्हटलं अगं हो कित्ती छान योग. मी सांगते पण म्हटलं चला आपण हे लिहूनच तिला सांगू तर ईतर चार जणांना अजून समजेल म्हणून मी हे लिहायला घेतले तर चोर चोळी,चोर ओटी म्हणजे ती चोरून च  भरायची बरेका आणि ती सुद्धा दिवे लागण्याच्या वेळी कोणालाही समजू न देता ही ओटी तीन महिने संपल्यानंतर चौथा लागल्यावर भरतात. चोर चोळी भरण्याचा एक उद्देश की बाळाची काळजी म्हणून कौतुकाने भरायची असते .चोर चोळी ही आपण मुलगी किंवा सून एक गोड बातमी देते तेव्हा ती एक नवीन उंबरठ्यावरती पाऊल पडत असते. आणि आपल्या घरातली ही गोड बातमी फक्त पहिले घरातल्याच लोकांना सांगायची असते.ओटी भरल्यानंतर बाहेर सर्वांना सांगायचे कारण तीन महिन्यापर्यंत बाळाचे अवयव तयार होत असतात डोळे, नाका, का...