Posts

Showing posts from August, 2021

झोपाळा

Image
सहर्ष सादर करत आहे  * विचार मंथन*                    🌷" झोपाळा"🌷 आपले आयुष्य हे साधारण झोपाळा  सारखे हेलकावे खात कधी मागे कधी पुढे दुःख तर कधी सुख: मागे ! बंगळी पण  म्हणतात ,त्याला जेव्हा नवीन घर किंवा बंगला बांधतात तेव्हा इतक्या हौसेने यांची खरेदी करतात. याचे पण किती प्रकार असतात. लाकडी, सागाची, स्टीलची, लोखंडाची एक नाही अनेक प्रकार व रंगीबेरंगी सारंगखेडा गावाचे लाकडी बंगळी, पाळणे ,खूप प्रसिद्ध  आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि ऐपतीप्रमाणे घेतात. तो कुठे ठेवायचा कुठे बांधायचा याची प्रत्येकाची विशेष जागा ठरलेली असते. कोणी गच्चीत, तर कोणी बाल्कनीत, अंगणात, हॉलमध्ये. त्याला विशेष म्हणजे त्याच्या कड्या खूप वेगवेगळ्या  धातूच्या आकाराच्या आणि प्रकाराच्या मिळतात. त्याच्याने तर बंगळीची  शोभा अजून वाढते. एक साखळी सारखी सरळ असते , काही कड्या,कड्या एकत्र असतात. विशेष म्हणजे पितळेच्या छोट्या छोट्या भावल्या, राधाकृष्ण, छोटे छोटे पक्षी चिमणी काही मुर्त्या बनवून एकत्र करून पूर्ण साखळी बनवतात. खूप सुंद...

पडदे

Image
सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन" 🌷झीर्मिरी चिकाचे पडदे🌷 पडदे या शब्दा मागेच किती राज दडलेले आहे हा पडदा तसा पारंपारिक राजेरजवाडे पासून प्रचलित आहे पूर्वी महिलांना पुरुषांसमोर येण्याची अनुमती नव्हती. तेव्हा घरात चिकाचे बारीक काड्यांचे चे पडदे लावलेले असायचे त्यामागून त्या महिला संभाषण करत असंत पण तसा तो श्रीमंतांकडे जास्त बघायला मिळायचा श्रीमंती थाटच तो.  आज-काल खिडकी आणि दरवाजाला खूप वेगवेगळ्या कपड्यात आणि डिझाईन मध्ये पडदे शिवून मिळतात. सर्व साधारण मध्यमवर्गातल्या कुटुंबाकडे हे नाटक नव्हते सदा सर्वकाळ दार सत्ताड तिन्ही त्रिकाळ उघडे असायचे. कोणी केव्हा या त्यामुळे कळत नक भळत एक फायदाच होत होता .तो म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश घरात यायचा ,लाईट लावायची गरज नसायची कोणी पडदा लावला तर तू कधीपासून पडल्यात राहिला लागली असा टोमणा द्यायचे .त्यावेळी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस लाईट लागायचे पण आता सध्या परिस्थिती चेंज झाली आहे . कारण घर लहान लहान आणि घरात कोणी नाही विभक्त कुटुंब आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर लाईट लागतील .वडीलधारी माणसं घरात नसल्यामुळे हा प्रॉब्लेम असतो . पडदे ल...

🌷कानबाई 🌷

Image
 सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन"      कानबाई 🌷 आमच्याकडे कानबाई चे रोट असतात त्या विषयी थोडी माहिती देत आहे. हा एक सणच असतो. या निमित्ताने आपले भाऊबंद एकत्र येतात. श्रावणसरी सारखा आनंद घेऊनच. श्रावणातल्या पहिल्या रविवारी किंवा नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी. कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तुझ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश - कान्हादेश . खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो. या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, इतर कपडे सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांन...

🌷आषाढी 🌷

Image
"सुलहर सहर्ष सादर करीत आहे "                   🌷आषाढी, एकादशी🌷     परवा झालेल्या मोठ्या एकादशीच्या दिवशी थोडे पूर्वीचे दिवस आठवले व त्यावरून हा लेख लिहिण्याची स्फूर्ती झाली. आषाढी आणि कार्तिकी एकादशी अशा दोन मोठ्या एकादशी असतात. वर्षाच्या चोवीस एकादशी असतात . अधिक महिना आला तर अजून एखाद-दोन वाढतात. दर पंधरा दिवसाची  प्रत्येक एकादशीचे नाव वेगळे आणि त्याचे व्रत व व्रताचे फळ सुद्धा वेगवेगळे असते. आमच्याकडे दर पंधरा दिवसाच्या एकादशीचा उपवास असायचे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यादिवशी घरात अन्न शिजत नसे ..पाहुणे आले तरी त्यांना आग्रहाने फराळाचं पाहुणचार केला जाई, सर्व चकचकित घासून ठेवायचे. देवाचे उपकरण, देव, देवाचा देव्हारा हे सर्व आदल्या दिवशी पूर्व तयारी करून ठेवावी लागत असे. फराळाचे पण तसेच कारण भरपूर प्रमाणात व्हायचे दाणे भाजून दाण्याचे कूट करून ठेवणे, रात्री साबुदाणा भिजवून ठेवणे, अगदी एक सण असल्यासारखेच असायचे. अगदी उत्साहाचे वातावरण. सकाळी लवकर उठून आंघोळ करून सडा, रांगोळी, फुलांचे हार, सर्वांनी मं...