Posts

Showing posts from January, 2022

"जीभ"

 "सहर्ष सादर करत आहे     * विचार मंथन*                      🌷जीभ🌷  आपल्या शरीरातला एक हाड नसलेला अवयव तो म्हणजे "जीभ" कोणी काही बरे वाईट उलट सुलट बोलले तर म्हटलं जाते, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही ? म्हणून काही वाटेल तसं बोलायचं.  जिभेच्या मध्यभागी सरस्वती असते, म्हणून काही वेळेस जे आपण बोलतो ते खरे होते. आजाराचे मूळ कारण सुद्धा हीच आहे कारण आपले खाण्याचे लाड पुरवले जातात. माणसाला चटक-मटक मसालेदार  पदार्थ खाण्यास फार मनापासून आवडतात. आपले पूर्वज म्हणायचे मूळ कारण हीच आहे म्हणून जिभेचे चोचले पुरवू नका.  अति खाल्ल्यामुळे किंवा चुकीच्या आहार घेतल्यामुळे डायबिटीस , बीपी, डायरिया ,असे आजार होण्याचा संभव असतो या जिभेवर ताबा मिळवणे म्हणजे एक दिव्यच आहे ती चूप राहू शकत नाही सारखी वळवळते कारण हाड नसते.  जरा आवर घाला, जिभेला  लगाम लावा. नाहीतर खरं नाही किती बोलणार आणि किती खाणार असे आपले मोठे नेहमी सांगत असतात , आपल्या शरीराचा प्रत्येक अवयवा  नुसार कमी अधिक कार्य करण्यास कुरकुर ते...

🌷नूतन वर्ष🌷

Image
सुलहर "सहर्ष सादर करत आहे  * विचार मंथन*      🌷(3६)आणि (६३)आकड्याची करामत 🌷 आत्ताच नवीन वर्ष सुरू झाले आहे तर त्याच्या वरून आठवले  36 चा आकडा कसा?तीना चे तोंड येणारे असे आणि सहा चे  जाणारे दर्शवतो , तसे हाताचे पंजे एकावर एक ठेवले की टाळी वाजते,👏 आणि दोघे  पायांचे विसंगत जरी चालले 👣तरी एका ठिकाणी उभे राहू शकतात ,त्याच्यावरून एक गंमत आठवली सुरवातीला कोणतीही गोष्ट येताना (झिरो )  नंबर च असते जातांना ती वाढत जाते म्हणजे एकवीस जातो बावीस येतो . तसे आपल्याकडे दोनाचे चार हात करतानासुद्धा हे आकडे मिळवले जातात . वाढवून राहिलेले केव्हाही चांगलेच असते आणि आपल्याकडे पूजा झाली की ब्राह्मण प्रसाद म्हणून चार दाणे गव्हाचे किंवा तांदळाचे देतात .तेव्हा म्हणतात तुमच्या घरातल्या तांदळा टाका म्हणजे तुमचे धान्याला बरकत राहील तर खरच ! ते चार दाणे टाकले तर ते वाढतातच ना ? गंमत आहे की नाही   मग आता 63चा आकडा  बघा दोघांचे तोंड एकमेका कडे असतात ते वेगळे होऊ शकत नाही 36 सारखे . कोणी कोणाच्या मनाविरुद्ध बोलले किंवा कोणाच आपसात जमले नाही तर म्हणतात अर...