Posts

Showing posts from June, 2024

अडगळीक्या खोलीत गेलेले शब्द

Image
सहर्ष स्वागत करत आहे  "विचारमंथन" "अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द"😊 उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि  बहीण, भावंडांची मुलं नातवंड माझ्या घरी मुक्कामाला 8,15 दिवस होते मग आपल्या बोलीभाषेत त्यांना बोलते-  'ये कार्टे, कारट्या इथे काही करू नको, इथे हात लावू नको',  'इकडे अशी आडवी का पडली जरा डोक्याचा वापर कर', काही असे शब्द असतात. मग ते आपल्याकडे बघतात की ही अशी का बोलते?  आता हे शब्द अडगळीत जमा होत आहेत हळूहळू. नवीन पिढीत कोणी वापरत नाही. कारण सगळे इंग्रजी शाळेचे भोक्ते, आम्ही ते सर्वच वापरतो म्हणून एक आठवण झाली. त्याचे काही काही छोटे छोटे किस्से. ऑफिसमधून घरी आले तर बहिण क्राफ्टचा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी  करत होती. म्हंटलं, "काय ग अशी फतकल मारून बसली मधेच!” तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह? फतकल??? बहिणीला म्हंटलं अग मिरा  "माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव.” तर तिची नात  फिदीफिदी हसली, म्हणते, "शी खुंटी??? What’s that?” आता काय सांगू तिला. माझा जन्म आमच्या वाड्यात झाला, त्यामुळे खुंटी, कोनाडा, फडताळ, ओगराळ, बोळ ,घंगा...