"केळीचे शिक्ररण"
सहर्ष सादर करीत आहे- विचार मंथन "शिक्ररण" परवा रेडिओवर मामाच्या गावाला जाऊया... पळती झाडे पाहूया... मामाची बायको सुगरण... रोज रोज पोळी शिकरण!, हे गाणे ऐकलं आणि मनात विचार आला, या गाण्यात किती काही दडलेलं आहे, केळ्याविषयी. हे गाणं किती प्रसिद्ध झालेल आहे. "केळीचे शिकरण " आजकालच्या मुलांना कदाचित परिचित नाही. आपण जे पूर्वी एक पदार्थ म्हणून खाल्लेले गोड आणि चवीष्ट झटपट बनणार गोड पदार्थ त्याबद्दल थोडे काही. आणि आज तर अष्टमी आहे. दिवाळीची सुरुवात म्हणून खास. शिकरण हा पदार्थ काय भारी आहे ना, जो आपण लहानपणी बघितलेलाही नसतो किंवा खाल्लेला नसतो पण अगदी लहानपणापासून तर समजायला लागेतोपर्यंत तो आपल्या अवतीभोवती फिरतो. हे गाणं ऐकून ते किती स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे, हे जवळून कधी कळत नाही . हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनवले जात होते, आता हे सहसा बनत नसावेत, असे वाटते. हे अगदी लवकर बनणारे हेल्दी चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारे व आवडीने खाल्ले जात होते. केळीचे शिकरण आमच्याकडे "करअष्टमीच्या" दिवशी खास बनवत होते. आठ तांबे ठेवून ...