गाद्या घालणे
""सहर्ष स्वागत करत आहे "विचार मंथन" 🌹अंथरूण घालणे🌹 परवा आमच्याकडे पाहुणे आले बरेच जण होते, पूर्ण दिवस मजेत गेला. पण रात्री झोपायची व्यवस्था करायची म्हणजे मोठे काम, ते मी ठरवले तसे आजकाल मोठे घर असल्यामुळे तशी चिंता नसते, माझ्या बेडवर तू झोप. त्या रूममध्ये तुम्ही झोपा. मी त्या रूमवर झोपेन, असं करून आपल्या आपल्या रूममध्ये सगळे जाऊन झोपून गेले. त्यावेळेस मला आठवलं की पूर्वी आपण सर्व लहान असताना काही वर्षांपूर्वी, मला माझे लहानपण आठवले आणि तिथेच रेंगाळत राहिले. चाळीसगावला असताना दिवसा सगळे काम झाल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस अंथरून टाकणे हा एक मोठा विषय आहे . 'अंथरुणे घालणे आणि काढणे' म्हणजे हा एक बायांचा कामाचा एक उर्वरित भाग होता. सर्व काम आटोपल्यानंतर सुद्धा रात्री शेवटचे काम हेच ते घरातील मोठया माणसांचे (आजी,आई,आत्या, काकू) यांचे असे अंथरुण टाकणे. प्रत्येकाच्या गादीला पांढरीशुभ्र चादर, उशाला पांढरे कव्हर, पांघरायला (पांघरूण) थंडी असेल तर ब्लॅंकेट. साधारण गरमी असेल तर बारीक चादर देणे त्यांच्या डोक्याशी पाण्याचे तांब्याभांड पाणी भरून ठेवणे ...