आवळे अष्टमी
सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन" आत्ताच 'आवळे अष्टमी' होऊन गेली. त्याबद्दल जुन्या आठवणी आठवल्या . आवळा अष्टमी म्हटले की आमचे काका तिघी आत्यांना आमंत्रण द्यायचे की उद्या आपल्याला बागेत जायचे आहे जेवणासाठी. त्या दिवशी आई खूप स्वयंपाक करायची. करत करत एक वाजायचा. त्यानंतर बागेत जायचं. जेवायला शेजारचे वाड्यातले सगळे मिळून श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बागेत . प्रत्येकजण आप आपल्या घरून वेगवेगळे पदार्थ डब्बे भरून भरून आणायचे मुलं-बाळं सगळे, सगळे जण सोबत यायचे सर्व तयारी व्यवस्थित असायची केळीचे पानापासून तर मीठ लिंबूपर्यंत , डब्यात कोणी गोड दशम्या , तिखट दशम्या ,भाताचे प्रकार मसाल्यांची चमचमीत भाजी, चटण्या, कोशिंबिरी, कोणी गोड पदार्थ असे आणायचे खूप खूप मजा यायची चार वाजेपर्यंत अगदी वनभोजन चालायचे. मुलांना खूप मजा यायची. झाडावर चढायचे. खाली सतरंज्या टाकायचे. त्यावर सर्वांना वाढायचे. आधी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे. झाडाची पूजा करायची हे कधीही विसरू शकणार नाही, असं वनभोजन असायचे. दोन तीन ग्रुपबरोबर वेगवेगळ्या दिवशी जायचे. मैत्रिणींबरोबर, त्या आठड्यात दोन-तीन वेळ...