श्राद्ध पक्ष
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन",, 🌹 पितृ पक्षातील पंधरवाडा 🌹 सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे या पंधरवड्यात प्रत्येकाच्या घरी आपल्या पीत्रांच्या तिथीला पीत्रांना पिंडदान करून श्रद्धेने श्राद्ध करण्याची(प्रथा)परंपरा आहे. या प्रथेला कुणाचाही विरोध नसावा व तसे काही कारणही नाही आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायलाच हवे असे आपण मानतो पण आजच्या धावपळी च्या युगात नवीन पिढीला हे करायला त्यांना वेळ पण नाही पण ज्यांनी हे लहानपणी बघितलेले आहे त्यांच्यावर संस्कार आहे ते मुलं जरूर करतात. असो. लिहिण्याचा कारण की आज एकादशी/द्वादशीचे आमच्याकडे श्राद्ध असते तर जुन्या आठवणी येऊन हे लिहावे असे वाटले. श्राद्ध म्हणजे गणपती उठल्यानंतर भाद्रपद पक्षातील पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत एक संस्काराचा पूर्वजांना जेऊ घालण्याचा आनंद सोहळाच असतो. आपल्या गावाकडे या दिवशी पित्र म्हणून एक जोडपे जेवायला बोलवतात जर आई असेल तर एका महिलेला आपल्या आईचा मान देऊन तिला आदराने जेवायला बोलवतात तसेच वडील असतील तर एक पुरुषाला त्यांच्या नावा...