Posts

Showing posts from June, 2022

तुप

Image
सहर्ष सादर करत आहे  "विचार मंथन "     🌷साजूक तूपाचे महत्व🌷                 साजूक  तूप माझे खुप आवडतं खाद्य आहे ,प्रत्येक पदार्थावर घेतले की खूप खाण्या ची चव औरच येते व आनंद मिळतो. जसे थालपीठ, दशमी, ई.लोणी पण खूप च छान चवीष्ट लागत. तूपा साठी खास आकाराचे चांदीचे भांड वापरतात . लोणी पासून तूप पूर्ण पणे वापर होतो. लोण्याचे तूप तुपाची बेरी, बेरी चा शिरा, किंवा मिठाई.हे सात्विक  बुद्धीवर्धक असते. लोणी कढत असले की सुंदर एक सुगंध येतो खूप छान वाटते लगेच समजते. रवाळ असे पांढरे शुभ्र तूप .देशी गाईचे तूप पिवळसर असते . गरम,गरम पहिल्या वाफेचा मऊ वरण भातावर तुपाची धार तर स्वर्गानंद. जेवण कोणते ही असो, पंगतीला  तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची अशी आपली परंपरा आहे. पंगती त चांदीच्या भांड् हातात घेऊन वाढणे म्हणजे औरच शान असते.पूर्वी एक  ओतीव पितळी भांड वेगळ्या आकाराचे संपुट म्हणायचे त्याला त्याच्याने तूप वाढायचे खूप मोठी धार पडायची त्याची. आता तर आपण चमच्याने घेतो एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील...

खुलभर वाटी

Image
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"     🌷खुलभर वाटीची कहाणी🌷  परवा अचानक घरी पाहुणे आले होते तर घरात साखर नव्हती. नातीला हळूच म्हटले की जा शेजारच्या ताईंकडून वाटीभर साखर आण बरं! साखर संपली आहे. तर ती मला म्हणाली की अगं शेजारीहून एक वाटी साखर? मी नाही जात. मला लाज वाटते. असे म्हणून मागे गेली, मग मी गेले व पाहुण्यांना चहा करून रवाना केले. मग तीला जवळ बोलावलं खरं तर मी भूतकाळात शिरले . अग आमच्या लहानपणी काय आणि आत्ता काय आम्ही बिनधास्त काही संपलं कि, शेजारच्या शोभा ची आई, सुजाताकडे, काकूंच्या स्वयंपाकघरात जाऊन हक्काने मागून आणायचो, काहीही! कारण आमचे मोठे कुटुंब होते, कितीही आणले तरी संपतच असे. आम्ही वाड्यात पाच बिऱ्हाड रहात होतो... पण जास्त जवळीक म्हणजे भाभी, चव्हाण व लकडे (म्हणजे बेबिताईची आई) , यांचं घर आमच्यासाठी नेहमीच उघडे असायचे. शेजारच्या शोभा ताई ची आई तर आमच्याकडे कोणी आजारी असले तर गरम गरम फोडणीचं वरण भात ,दही भात ,मेटकुत भात असं आवर्जून आणून द्यायच्या कारण त्यांच्याच खुप मऊ व चविष्ट व्हायचं कमी तिखट असायचं त्या स्वतःहून म्हणायच्या तुला ...