हरतालिका ची पूजा

 सुलहर "सहर्ष सादर करत आहे 
* विचार मंथन* 

                     🌷हरतालिका🌷
'अरे अरे काय गोंधळ चालला आहे तिकडे आणि कसली चर्चा चालली आहे?' 
नातीला आवाज घेऊन विचारले. तिच्या मैत्रिणी पण होत्या सर्व जणी पुढे येऊन गलका करत  म्हणाल्या, 
'आजी  हरतालिका पूजा म्हणजे नक्की काय असते व त्याचे महत्त्व काय?' 
तर मी म्हणाले, 
'मी सांगते तुम्हाला ती गोष्ट बसा सर्वजण. ऐका. पार्वती जेव्हा वयात आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या करता स्थळ बघण्याचे सुरू केले आणि एकदा अचानक नारदमुनी विष्णु भगवानचे स्थळ घेऊन आले आणि म्हणाले आपल्या मुली करता श्री भगवान विष्णूंचे योग्य वर आणला आहे तर तुम्ही याच्यावर विचार करावा तिच्या वडिलांनी सांगितले ठीक आहे. काही हरकत नाही तेव्हा पार्वतीचे वडील खुश झाले व च्या आईला म्हणाले... मला खूप आनंद झाला हे ऐकून. दुसऱ्या दिवशी वडिलांनी पार्वतीला जवळ बोलावून सांगितले की काल नारद मुनी येऊन गेले आणि विष्णु भगवान करता तुझा हात मागितला आहे. पार्वती ऐकून विचारात पडली कारण  पार्वतीने मनातून शंकराला वरले होते. त्याच्याशीच लग्न करायचे असे ठरवले होते. दुसऱ्या दिवशी पार्वतीने आपल्या सख्यांना तिचा विचार सांगितला व म्हणाली की आता मी काय करू मला विष्णू शी लग्न नाही करायचे सखी म्हणाली तुला त्यांच्याशी का नाही  करायचे तर ती म्हणाली  सर्वात श्रेष्ठ भोळा शंकर  आहे  आणि मनोमन त्यांनाच  वरले आहे. त्या सखीने गौरीला एका वनविहाराला घेऊन गेल्या. तिच्यासोबत  संध्याकाळपर्यंत तिचा राग निवळेपर्यंत तिथेच थांबल्या पण नंतर तिने घरी जाण्यास नकार दिल. एक सरोवराकाठी त्या गुहेतच थांबणार असेच सांगितले. आता तिचे वडील हिमालय विचारात पडले असे का केले? तिने  तिच्या मनात वेगळेच काही होते. तिने तिथे  नदीकिनारी वाळूचे शिवलिंग तयार केलेले व अत्यंत घोर तपश्चर्या केली. सर्व ऋतु पार पडले. कंदमुळे खाऊन राहिली. इकडे तिचे वडील चिंतेत पडले पण तिने पण केला होता जोपर्यंत शंकर प्रसन्न होत नाही तोपर्यंत काहीही खणार नाही.  अरण्यात कंद मुळे खाऊन उपवशी राहिली. त्या दिवशी तिला उपवास घडले व एक दिवशी शंकरांनी तिला दर्शन दिले व तू ही तपश्चर्या का करते विचारले तर तिने सांगितले माझे लग्न माझ्या वडिलांनी विष्णूशी ठरवले आहे. मला मान्य नाही तुमच्याशी लग्न करायचे आहे. शंकर तिला प्रसन्न झाले. वर दिला. मग सखीसोबत घरी गेली. झालेला सर्व प्रकार सांगितला. आईवडील नाराज होते. त्या जटाधारी आणि भस्म धाऱ्याशी तू का लग्न करते? हिमालयाला ब्रम्हदेवाने वर दिला होता की तिचे लग्न शंकराशी होईल, हे आठवल्यावर त्याने आनंदाने तयार झाले. मग चांगला मुहूर्त बघून तिचे शंकराशी लग्न लावून दिले. 'शिवआराधना' केली म्हणून शिवपार्वती असे  म्हणतात. तसे तिचे बरेच नाव पण आहे. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती, अपर्णा हे पण एक नाव आहे कारण तिने पिंडीवर बेलाची पाने वाहिले होते आणि 'अर्ध नारी नटेश्वरी' पण म्हणतात त्या  शिवाला हरवून आणि सखीच्या सोबतीने अरण्यात राहून हे  व्रत केले.  'हरतालिका' म्हणतात आणि हरी हे विष्णूचे नाव आहे  सर्व व्रतांमध्ये हे सर्वात श्रेष्ठ आहे
"शिव व्हावे प्रसन्न पार्वतीने द्यावे सौभाग्य दान." 

आपल्या हिंदू धर्मामध्ये तेव्हा पासून आपल्याकडे  महिला, मुली हे व्रत श्रद्धा भक्तीने करतात. असाच भोळा शंकर सर्वांना मिळावा आणि लग्न झालेल्या बाया आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून पण हे व्रत करतात अशी अख्याईका आहे.' 

मुलींना तर गोष्ट सांगितली पण माझे मन भूतकाळात हरवले. आम्ही लहान होतो तेव्हा भाद्रपद तृतीया महिना लागला की गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा कधी तिथी घट झाली तर दोघेही एकाच दिवशी असतात .
'अगं, उद्या हरतालिका आहे. मग काय एक दिवस आधीच तयारी बागेत जायचे. सर्व प्रकारची पत्री जमा करायची. पत्री म्हणजे झाडाचे पानं. दुर्वा आघाडा असे सर्व शोधायचे व तोडून घरी आणायचे मग स्वच्छ करून प्रत्येकी पाच पाच पांन घ्यायचो आणि रात्रीच पूजेचे ताट तयार करायचे. त्यात हळदकुंकू, पार्वतीला वस्त्र, काडवाती ,कापसाचे वस्त्र, शिवामूठ ,फुलं, हार कच्ची फळ, तांब्याभर पाणी, नॅपकिन पुसायला, पंचामृत असायची, त्यात एक काकडी जरूर ठेवायची कारण दुसर्‍या दिवशी उपास सोडायला ते काकडी खायची मगच उपास सोडायचा असतो. संजयचे ताट व्यवस्थित तयार केले की नाही परत  बघायला लावायची आई कारण कडे जावे लागायचे पूजेला काही राहायला नको. आम्ही तीन, चार बहिणी आई, काकू सर्व बरोबर असायचो. ताटात काही राहिले तर नाही म्हणून. विशेष म्हणजे 108 बेलाचे पान निवडून मोजून एका वेगळ्या टोपलीत ठेवायचे. ताटावर छान हाताने विणलेले रुमाल टाकायचे. सगळ्यांनी छान तयार व्हायचे नव्या साड्या घालून  तयारी करायची व ज्याच्याकडे पूजा आहे त्यांच्याकडे चार वेळा डोकावून  विचारायचे. ब्राह्मण किती वाजता येणार? कधी सुरू होणार पूजा? आणि आधी जाऊन आपले ताट ठेवून यायचे कारण आठ दहा जणी तरी असायच्या एका वेळेस असे घरोघरी व्हायचे सामुहिक पूजा मंदिरात पण व्हायची. मध्यभागी पूजा असायची आणि  आजूबाजूला सर्व बाया गोल करून बसायच्या आणि एका कोपऱ्यात ब्राह्मण मग त्यांची अर्धा-एक तास पूजा चालायची. शेवटी आरती खूप छान प्रसन्न वाटायचे . 

मग दुपारी हरतालिकेची कहाणी वाचायची. त्यानंतर कोण कोणत्या महादेवाला जाणारा रानातला महादेव, का कंडारीच्या महादेवाला का अजून कुठे मग तयारी करून सर्वांनी चार वाजता परत जमायचे. 

प्रत्येकाची  उपासाची पद्धत वेगळी वेगळी कोणी निरंकार करायचे. पाणी सुद्धा प्यायचे नाही आणि रात्री बारा वाजता बेलाचे पानावर मत किंवा तूप घेऊन व एका वेळेस जेवढे पाणी प्यायले जाईल, त्याच्यावरच उपवास सोडायचे. कोणी फराळ तर कोणी फक्त फळ खायची. या दिवसात सहसा कुणी तिखट खात नाहीत. फक्त गोड फराळाचे खायचे
मग रात्रीचे जागरण करायचे. सर्व मैत्रिणी जमून बैठे खेळ, फुगडी ,लंगडी, गाण्याच्या भेंड्या, भजन असे वेगवेगळे खेळ रात्री बारापर्यंत खेळायचो. बारा कधी वाजून जायचे समजायचे नाही. कधी कोणी मावशी, काकू चहाला बोलवायच्या रात्री आरती करायची मग खूप मजा यायची दुसऱ्या दिवशी ते वाळूचे मांडलेले शिवलिंग पूजा सर्व आरती झाल्यावरती दहीभाताचा नैवेद्य दाखवून व ती पूजा तापी नदी मध्ये विसर्जन करायला जायचो. ते दिवस कधीच विसरणार नाही. 

दुसर्‍या दिवशी गणपती त्याची आरास कशी करायची. कोणाकडे किती दिवसाचा गणपती याच्यावर चर्चा. कोणाकडे पाच दिवस, कोणाकडे  दहा दिवस, कोणाकडे दीड दिवस. आरती, मोदक घरोघरी असायचे. तसा सर्वाजनिक गणपती प्रत्येकाचा मंडळाचा असायचाच, त्याचे खूप छान छान कार्यक्रम वगैरे होतात त्यात भाग घ्यायचो. 

'आजी... तुम्ही कोणत्या विचारात आहात?' 
मग मुलींच्या प्रश्नाने भानावर येऊन त्यांना सांगितले, 'असे व्रत व पूजा करायचो. आम्ही त्यांना खूप मज्जा आली ऐकून व त्या म्हणाल्या, 
'आज आम्ही पण पूजा करतो आजी. मग मी  सर्व तयारी करून दिली. त्यांना पण आपल्या वेळेची काही औरच मज्जा होती म्हणा आता फक्त आठवणी पण परंपरा चांगली पाहिजेल ना ?' 

मुलींनी पण मनापासून आनंदाने पूजा व उपवास केला व दुसऱ्या दिवशी उपास (पारणे) सोडला. 

मी त्यांना हसत हसत आशीर्वाद दिला, 
'मुलींनो तुम्हालाही असाच भोळा शंकर मिळो!


                                         सुलहर🖋️

'

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"