सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन" गुरुदेव दत्त दत्त जयंती निमित्ताने दि. २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३, श्री गुरु दत्तात्रय परिक्रमा गिरणार जय गिरणार, मागच्या महिन्यातच मी गिरणार परिक्रमा व गुरुदत्त शिखर करुन आले, खुप छान झाली परिक्रमा. तर मला पुरंदरे वहिनींचा खास निरोप होता की, मॅडम तुम्ही ह्या विषयावर लिहावे म्हणजे आम्हाला सविस्तर समजेल. तसं पाहिले तर ही सर्वांना माहितच आहे, मी काही वेगळे लिहिणार नाही . तरी माझा अनुभव लिहित आहे आणि तुम्ही पण ही परिक्रमा करू शकता . कठीण असली तरी सहज होते. फक्त देवावर विश्वास आणि आपला आपल्यावर विश्वास पाहिजे. गुजरात प्रदेशात सौराष्ट्र मध्ये जुनागढ शहरात २ कि.मी.च्या अंतरावर एक भव्य-दिव्य पर्वत गिरणार विद्यमान आहे. पर्वताच्या पाचवे शिखर गुरुशिखरच्या नावाने ओळखले जाते. येथे भगवान दत्तात्रेयाच्या चरण पादुका आहे. त्यांच्या दर्शनासाठी दुरुन लाखो श्रध्दाळु लोक येतात. या गिरीनारायण म्हणजे गिरणार ने भगवान शंकराजवळ वरदान मागितले होते. शंकर भगवानने माझ्या या पर्वतावर ३३ कोटी देव देवतांचा वास असावा व सिध्द संतांच...
Posts
Showing posts from December, 2023
दिवाळी
- Get link
- X
- Other Apps
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन" दीन दीन दिवाळी! परवा मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. "काय म्हणते? कशी आहेस?" बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला कारण परवा दिवाळी आली तू माझ्याकडे ये ती जरा नाराजीनेच बोलली आता मला दिवाळी आली की जुनं सारं वैभव आठवून जीव रडकुंडीला येतो. चार दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं? एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का मी ओझं? मी म्हटले, "अगं, असं काय म्हणतेस? तुला तर सुट्टीच आहे ना मग काय प्रॉब्लेम नाही गं... सर्व ठीक आहे मग तरी सुद्धा असे का बरं म्हणतेस? तर ती म्हणाली, "काय सांगू आम्ही चौघे बहीण भाऊ. कुणीच कुणाशी बोलत नाही. मी कुठे जाऊ? आता कुणी कुणाकडे जात येत नाही आणि आम्हालाही दोन दिवस कुणीच बोलावीत नाही.चार दिवस कसे जातील? मलाच प्रश्न पडतो लहानपणीचे फोटो पाहून मी एकटीच रडते. मुलांना काय सांगावे बरे यातले? मुले विचारतात, आई आपल्याला मामाकडे, काकां कडे का मावशी कडे जायचं यावेळी? पूर्वीच्या काळी नातेवाईक जरी गरीब होते तरीही ते एकमेकाकडे जात येत होते. कुणाकडे गेल्यानंतर मनापासून स्वागत व्हायचं सारं काम साऱ्यानी मिळ...