Posts

Showing posts from December, 2022

हात 👍

सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"        🌹 हात👍😊🌹 तुम्ही म्हणाल हातिमाविषयी काय एवढे लिहिण्याचे कारण? मी परवा एक गाणे ऐकले. 'तेरे हातो मे नव नव चुडिया'  खरंच हातात बांगड्या घातल्या की हात किती खुलून दिसतो. मग 'म्हण' आठवली.  'हाताच्या कंकणाना ला आरसा कशाला?'  या म्हणीनुसार खरंच आपले हात आपले भविष्य घडवतो. ते असे आहे की आपण आपल्या हाताने काम करू तेव्हाच आपल्याला आपल्या उदरनिर्वाह करीता पैसा किंवा पोटभर जेवायला जेवण मिळते. त्यांचे पहिले आपण आभारी आहोत. आपले हात आपल्याकडून किती काम करून घेतो. चांगले-वाईट पण हाच धुतले की स्वच्छ होतात. देवाने आपले शरीर किती सुंदर बनवलेले आहेत  कारण दुसऱ्या वस्तू खराब झाल्यास आपण फेकून देतो. नवीन घेतो. पण शरीराचे तसे नाही ते कधीच खराब होत नाही. परत नव्याने दुसरे काम करायला तयार. कुठल्याही काम केलं की त्यावरून फिनिशिंग म्हणून आपण त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवतो ते काम तेव्हाच पूर्ण झाल्याचे आपल्याला समाधान होते. उदा. काही वाळत घातलं की त्याच्यावरून हात फिरवतो तसेच कपड्यांना घड्या केल्या की त्याच्यावरून हात फिरवतो. का...