Posts

Showing posts from April, 2022

तेल

सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"             🌷तेलाचे प्रकार व त्याचे महत्त्व 🌷   तेल हा शब्द आपल्या भौतिक जीवनात खूप वापरला जातो, तुपापेक्षा तेल बरे अस बहुतेक जण म्हणतात आजकाल तर सर्व तळण पदार्थ तेलात च तळतात कारण तेल फिल्टर असतं तुपातले पदार्थ तळल्यानंतर गार झाले की त्याच्यावर तूप साठत ते जास्त तेलकट  वाटतं खायला म्हणून तेल बरे आपण ज्या हवामान व प्रदेशात राहतो तेथे जे पिकवले जाते ते आपल्या शरीराला पोषक असते. उदा. उत्तरप्रदेश मधे -सारसो चे तेल             केरळ - खोबरेल तेल            कर्नाटक - सूर्यफूल तेल            महाराष्ट्र  - शेंगदाणा तेल 1) सरसो तेल:- हे यूपीमध्ये रोजच्या खाण्यास लोणच्यात सर्रास वापरतात, आपल्याकडे याचा सहसा वापर होत नाही त्याचा एक वेगळा सुगंध येतो व घट्ट  असते हे तेल व अतिशय उष्ण असते. ठराविक भाज्यांना  याची फोडणी देतात . लहान बाळांची मालीश करता पण वापरतात. यामध्ये ओमेगा 3 असते , कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, ...