Posts

Showing posts from May, 2021

गच्ची/बालकणी🍁👍🏻

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " बाल्कनीतल्या व गच्चीतल्या गमती जमती घर कितीही लहान असले तरी आपल्या घराला एक बाल्कनी असावी असे प्रत्येकाच्या मनात असते. खिडकी, गॅलरी ,बाल्कनी, गच्ची, इ. वेगवेगळ्या  क्षेत्रफळाची असते. सर्वांची आवडती जागा आणि विचार विनिमय, आनंद आदान - प्रदान करण्याची महत्वाची जागा.  असो, बाबांच्या आवाजाने तंद्री भंगली. " अरे बेटा ! काय आहे त्या खिडकीत? सदा कदा तिथेच असतोस!" आता काय सांगावे त्यांना ? बाहेर जाऊ देत नाही मग काय करायचे? खिडकीत, गॅलरीत उभे राहून बाहेरील गंमत  बघायची आणि दुसरी गंमत म्हणजे ठरल्या वेळी शेजारच्या काकूंकडे मित्र-मैत्रिणी गप्पा मारायला  जमायचे. त्यात एक मैत्रीण पण असायची. बाबा तिकडे जाऊ देत नव्हते मग काय करू ? गॅलरीत उभे राहून गप्पा मारायचं बस ! आता हे गुपित काय सांगणार त्यांना? खरंच आहे पण! कितीही छोटे घर असो त्याला एक खिडकी, बाल्कनी जरूर असावी. खूप मजा येते त्यातून डोकावून बघायला. रस्त्यावरची मजा, एखादी वार्‍याची झुळूक ,गारांचा पाऊस आला की गारा गोळा करायला!  रस्त्यावर बाहेर जाऊन तुम्ही बघू शकत नाही एवढे या ठिकाणाहून...

🌷गोधडी 🌷

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " 🌷गोधडी 🌷 गोधडी ! आता तशी ती इतिहास जमा झाली आहे. पण तिचा इतिहास असा आहे - जे आईचे पातळ फाटल्या नंतरही उपयोगात आणून हाताने  शिवून एक नवीन  (पांघरूण) गोधडी तयार करायचे .आतासारखे पूर्वी बेडशीट, सोलापूरी चादरी ,गाद्या  वापरत नव्हते.  त्यामुळे अंथरायला व पांघरायला गोधडीच असायची. तसे ती बर्‍याच नावाने ओळखली जाते. चौघडी- म्हणजे चार घडी ची पथोरली- लहान बाळाची आता त्याला  दुपटे  म्हणतात . वाकळ- जाडसर  व  मोठी असते . कोणी झावर पण म्हणतात त्याला. आता याच्या विषयी सांगायचे म्हणजे परवा माझ्या मुलीला एकदम थंडी वाजून खूप ताप भरला. तिने मला आवाज दिला "आई मला खूप थंडी वाजत आहे.  माझ्या अंगावर काही तरी टाक". मी तिच्या अंगावर ब्लॅंकेट ,सोलापुरी  चादर टाकली. पाच-दहा मिनिटे झाली तरी तिची थंडी थांबेना! मग तीच मला  म्हणाली, "आई माझी लहानपणीची तुझ्या पातळाची गोधडी माझ्या अंगावर टाक". मग मी ती गोधडी शोधून काढली व तिच्या अंगावर टाकली. वरतून ब्लॅंकेट आणि  चादर टाकली आणि माझ्या कामासाठी मी निघून गेले. मग जवळ जवळ ...

🌷अक्षय तृतीया 🌷

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " 🌷अक्षय तृतीया🌷 तृतीया तशी दर महिन्यात येते पण  वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची जी तृतीया तिथी साजरी केली जाते तिला "अक्षयतृतीया" म्हणतात. हिंदू पंचांगानुसार दिनदर्शिकेतील एक दिवस आहे -  "अक्षयतृतीया" म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी खेड्यापाड्यात मुलींना सासरहून माहेरी आणतात. प्रत्येकाच्या घरी सांजोऱ्या, शेव, लाडू असे बनवतात. दारापुढे लिंबाच्या झाडाला उंच उंच झोके बांधतात. माहेरवाशिणीसाठी मग मुली एकत्र झोके खेळतात, गाणी म्हणतात, खूप गमती जमती करतात. या वेळेस शेतकरी जरा  निवांत असतात. निसर्ग राजाची वाट बघत शेताची नांगरणी करून शेत स्वच्छ करून ठेवतात .मग त्या दिवशी त्याची ही पूजा होते . पाऊस पडला की पेरणीला सोपे जाते. अक्षयतृतीया हा अक्षय - उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.  सोने पण खरेदी करतात . या दिवशी घेतलेले सोने अक्षय राहते . कोणतीही  नवीन गोष्ट घ्यायची असेल - घर ,गाडी ,अजून इतर काही ते ह्याच दिवशी घेतात.  या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते...

🌹पूर्वतयारी 🌹

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " आपल्याला कोणतीही गोष्ट करण्याआधी पूर्व तयारी करावी लागते. मग ती कुठल्याही संदर्भात असो. छोटासा कार्यक्रम असो नाहीतर  नास्त्याला किंवा जेवायला पाहुणे येणार असो,  तयारी ही करावीच लागते. इतकंच काय रोजचा स्वयंपाकच घ्या ! म्हणजे  रोज घरातले  जेवण बनवतो  तेव्हा स्वयंपाक करण्यापूर्वी केलेली तयारी असो किंवा जेवण झाल्यानंतर तेच अन्न दुसऱ्या वेळेस खाण्यात उपयोगात आणण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठीची तयारी असो,  ही कला फक्त एका गृहिणी मध्येच असते. अशा काही आठवणीतल्या गोष्टी आहेत. सकाळी उठल्या उठल्या चहा, नाश्ता काय करायचा  सर्वांना? आधी रात्रीचे काही उरले आहे का ? त्याला नवीन चटक-मटक फोडणी देऊन डिश तयार करायची, किंवा पोळ्या उरल्यास तिखट चूरमा, तिखट-मीठाची पोळी, पोहे, सांजा ,उपमा, इडली ,ढोकळा, डोसे , वेगवेगळे पराठे असे रोज वेगवेगळे प्रकार करावे लागतात.  जेवणात काय बनवायचे ते आधी घरातल्या गृहिणीला ठरवावे लागते. घरातल्यांची लहान-मोठ्यांची आवड -  निवड लक्षात घेऊन मग मेनू ठरवून  त्याप्रमाणे पूर्वतयारी करावी लागते. आव...