Posts

Showing posts from June, 2021

टाटा बाय-बाय

Image
सुलहर सहर्ष सादर करीत आहे... 'विचार मंथन' टाटा आणि बायबाय  परवाच माझ्या नातू 'टाटा' करायला शिकला. खरंच आपल्याला किती सहज अंगवळणी पडलेले असते हे टाटा करणे! दारातून हसत निरोप घेतला तरी खिडकी किंवा गॅलरीतून टाटा असतोच. अगदी बाल मनापासून रुजलेले असते आई, इतर कोणीही बाहेर चालले की त्याला टाटा करायचा. एक छोटीशी हाथ हलवायची  क्रिया , ज्याची सुरुवात आपल्या बालपणीच होते . पण काय एवढे असते? रूक्ष , भावनाहीन? मला वाटते या टाटा करण्यात विलक्षण सामर्थ्य असते. खूप भावना दडलेल्या असतात, आत्मविश्वासाच्या! दोन ,तीन, वर्षाचे मूल झाले की शाळेच्या दाराजवळ येऊन आपल्या आईला, बाबांना, करते हा टाटा असतो विश्वासाचा की शाळा सुटल्यानंतर आई-बाबा इथेच उभे असतील आपल्याला  घ्यायला . बाळाच्या इवल्याश्या मिठीतून स्वतःला सोडवणारी एक ऑफिसला जाणारी माऊली, आई डोळ्यात अश्रू हृदयात कालवाकालव आणि मनात प्रचंड अपराधी भावना मागे वळून  आपल्या बाळाला टाटा करते, हा असतो अगतिक टाटा. बाळाला अलगद त्याची आजी उचलून घेते आणि त्याचा हात हातात घेऊन टाटा करते, हा असतो प्रेमापलीकडे दुधाच्या सायीवरची स्निग्धता युक्त दिलासा...

पुडाच्या पाटवड्या

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " खान्देशी पुडाच्या पातोड्या - "अहो ऐकलं का ? उद्या आपल्याकडे जावई, विहीणबाई व व्याही येणार आहेत, मग काय बेत करायचा ? "  - "अरे हो ! काय करायचं ?".  - "काल रव्या बेसनाचे लाडू करून ठेवलेच आहेत, अजून नवीन काय करायचं ?" - "आपण पुडाच्या पाटवड्या करू खान्देशी! हे सहसा मुंबईकडील लोकांकडे करत नाही".  जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्याकडे आवर्जून केल्या जातात. एकदम दमदार - टेस्टी पदार्थ ! चला मग लागा तयारीला .आधी सर्व साहित्य घरात पाहिजे म्हणजे मनाप्रमाणे होतात. कुठलीही गोष्ट कमी किंवा नाही , चालवून घेऊ असे चालत नाही . तर मग लिस्ट तयार करा - डाळीचे पीठ,  मसाला , खसखस ,कोथिंबीर, खोबरं, कांदे ,तेल,  तिखट, मीठ, हळद, जिरे, इत्यादी.  आता पूर्वतयारी - पूर्वतयारी करून घेतली की  आपण त्यात टाकायची कुठलीही वस्तू विसरत नाही आणि पदार्थ व्यवस्थित होतो. भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. पानं घ्यायची , काड्या वेगळ्या ठेवायच्या. त्याची दोऱ्याने जुडी बांधायची व आमटी उकळत असताना त्यामध्ये सोडायची त्याचा पूर्ण अर्क येतो व...

जागतिक सायकल दिन🚲

सुलहर सहर्ष सादर करत आहे "विचार मंथन"          🌷 जागतिक सायकल दिन🌷 आज सहज कंपाउंडमध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकलवर नजर गेली, तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर नाही. घरात आल्यावर  रेडिओवर तेच ऐकू आले. आज म्हणजे मागच्याच आठवड्यात 3/6/21जागतिक सायकल दिनानिमित्त म्हणून मला पण लिहिण्याचा उत्साह आला. पूर्वी सायकल ज्याच्याकडे आहे, त्या मुलांना श्रीमंत म्हणायचे. मध्यमवर्गीय लोकांकडे घरात दहा लोक. सायकल एकच! जो बाहेरचे सर्व काम करायचा ऑफिस बाजारहाट. एक विशेष म्हणजे पूर्वी लग्नामध्ये  हुंड्यासोबत जावयाला सायकल, रेडिओ  देण्याची पद्धत होती. ती पण ॲटलास कंपनीची हवी. देणारा पण श्रीमंत व घेणारा पण श्रीमंत असायचा. त्यावेळेस लग्नात नाव पण घ्यायचे "सोन्याची सायकल चांदीची चांदीची सीट चल चल राणी डबल सीट" 😀नंतर टू व्हीलर वर आला. नवरदेव मग फोर व्हीलर वर! असो... आम्ही लहान होतो त्यावेळेसची गंमत. 'सायकल शिकणे', म्हणजे एक चढाओढ असायची. कधी मित्रांची घेऊन तर दहा पैसे देऊन तासाने भाड्याने मिळायची. नंतर चार आणे झाली. त्याची किंमत तेव्हा ...

🌷कापसाच्या वाती🌷

Image
सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन 🌷कापसाचे वातीचे प्रकार 🌷 खरे तर आपल्याला तेलवाती, फुलवाती हेच जास्त प्रचलित आहे पण याच्या व्यतिरिक्त अजून  वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या वाती असतात. काही मला आईकडून माहित झाले आहेत आणि इतरही काही माहिती गोळा केली ती तुमच्यापुढे मांडत आहे. तसं तर चैत्रापासून फाल्गुनापर्यंत प्रत्येक महिन्यात काहीना काही असते. त्या हिशोबाने त्याच्या वाती करायच्या आणि देवापुढे लावायच्या. त्या पण कापूस निवडून स्वच्छ करून त्याचे सुत काढून ठेवायचे अगदी  बारीक दोऱ्या सारखे आणि मग त्याच्या पासून या वेगवेगळ्या वाती पदर मोजून करायच्या. प्रत्येक वातीचे पदर वेगवेगळे असतात. नंदादीप वात:- तसे आपण नंदादीप मध्ये एक किंवा दोनच पदर लागतात पण  कोणी कोणी 5,7,9, असे पदर घेऊन रोज पूजेच्या वेळेस लावतात. फुलवात:- निरांजनामध्ये फुलवात लावतात. कोणी दोन एकत्र लावतात. कोणी दोन निरंजनामध्ये एक एक एक लावतात. ही रोज आपण आरतीच्या वेळेस वापरतो शिवरात्र:- महाशिवरात्रीला  1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात. वैकुंठ वात:- ही 350 पद्री आपल्या हाताचा वितभर (करंगळी ते अंग...