Posts

Showing posts from March, 2022

पोळी

Image
सहर्ष सादर करत आहे "विचार मंथन "                   🌷 * पुरण पोळी *  🌷 आत्ताच होळी येऊन गेली होळी रे होळी पुरणाची पोळी म्हटले की आईचा चेहरा समोर उभा राहतो ,कारण की पोळी खावी  ती फक्त माझ्या आईच्या च हातची गरम, रेश्मा सारखी मऊ, ती बनवायचे म्हणजे एक कलाच आहे खर, आता कोणी म्हणेल की पोळी सारखी पोळी  त्यात काय? पण त्या पोळीच आपल्या सर्व भगिनींची माया आहे मुलांना म्हणतो अरे गरम गरम पोळी खाऊन घे पोळी हा पदार्थ असा आहे की तो गरमच छान लागतो एक पोळी च्या ऐवजी दोन पोळ्या खाऊन  गरम असते तर. जेवणात पोळी चांगली असली तरच जेवण पोटभर होते .बाकी सगळे पदार्थ असतात पण जेवण हे पोळी वरच फुलका,रोटी पण म्हणतात तिला, भुकेला मागणारा येतो तेव्हा मला जेवण द्या, असं म्हणत नाही तर मला एक रोटी किंवा एक पोळी द्या, असेच म्हणतो म्हणजे ही पोळी जेवणाचा एक अविभाज्य आहे. ती कशाही सोबत खाल्ली तरी आपण पोट भरू शकतो. उदाहरणार्थ भाजी ,चटणी, लोणचं, तिखट , मीठ मसाला. तेल, तूप मीठ असले तरी चालते.  1) पोळ्यां करताना पीठ चाळून घेतो मग भिजवतो. तसे ...

🌷किनारा 🌷

Image
सुलहर "सहर्ष सादर करत आहे  * विचार मंथन*                 🌷काठ /किनार /बॉर्डर🌷  बहिणीच्या मुलाचे लग्न ठरले म्हणून परवा साडीच्या दुकानात गेले तर 'आम्हाला जरीच्या काठाच्या साड्या दाखवा', असं दुकानदाराला सांगितले. दाखवल्या गेल्या पण 'ह्या नको, जरा दुसऱ्या रेशिम काठाच्या असलेल्या  दाखवा!' यावरून मला काठ ह्या शब्दाच्या विषयी लिहावेसे वाटले.  'काठ' हा शब्द आपल्या अगदी जवळच वावरणारा आहे तर तुम्ही म्हणाल याबद्दल काय विशेष, तर आपण साडी बघायला गेलो की पहिले रंग बघतो नंतर पोत, मग त्याचे काठ आणि किनार बघतो मग किंमत तेव्हा साडी पसंत करतो, जोपर्यंत हे सर्व मनाला पटत नाही तोपर्यंत साडी पसंत पडत नाही.  कारण काठा पदराच्या साडीची मज्जाच वेगळी! त्यावर अनेक प्रकारचे बारीक नक्षीकाम केलेले असते उदा. पान पूल, मोर ,पक्षी,विणकाम, आरसे काम , इतर भरपूर प्रकार असतात. लग्नासाठी काठाची च साडी आवडीने घेतो. शालू महावस्त्र त्याची बॉर्डर किनार आवडल्याशिवाय घेत नाही कपड्याला पण काठ असतो खूप पक्का असतो. कापड  काठाकडूनच मोजले जाते, कापड...