बेसन
"सुलहर "सहर्ष सादर करत आहे * विचार मंथन* 🌷बेसन/पिठलं🌷 सुनीलने आवाज दिला. 'सासूबाई, आज भाजी काय करायची?' सुनेने दिवाबत्ती झाल्यावर असे विचारले तर त्या म्हणाल्या, 'अगं बरेच दिवस झाले पीठल केलं नाही तेच कर! तर ती लगेच म्हणाली, 'मग ते तुम्हीच करा, कारण तुमच्या हातचे खूप छान टेस्टी होते.' तर लगेच तिकडून मुलांचा आवाज आला आणि 'पिठल आणि डोकं उठलं.' सर्व एकच हशा पिकला. नातू म्हणतो, 'असे काय म्हणत आहेत सगळे?अरे ज्याला आवडत नसते ना तो असेच म्हणतो. एक म्हण आहे ती तसं पाहिलं तर पिठलं कोणाला आवडत नाही?, असे सहसा क्वचितच म्हणणारे आहेत. पिठलं गरिबाचे 'तिखट श्रीखंड आहे.'आणि एनीटाईम करता येते झटपट होणारा पदार्थ! वेळी-अवेळी रात्री अचानक पाहुणे आले किंवा काही भाजी नसते तेव्हा हे खूप जवळचे वाटते .हे खूप वेगवेगळ्या प्रकाराने केले जाते. अगदी कुठल्याही प्रसंगात सुखदुःखात सदैव तत्पर असा हा पदार्थ एकमेव सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे तर. दर गुरुवारी गजानन महाराजांना प्रसाद म्हणू...