Posts

Showing posts from September, 2020

श्री गणेश

Image
Image
  * विचर मंथन * प्रस्तावना, स्नेह नमस्कार , मी लीलाताई वानखेडे रिटायर्ड एम्प्लॉयी वय 65  हल्ली मुक्काम मुंबई                                              माझ्या  पुस्तकाचा आत्तापर्यंतचा प्रवास अगदी स्वप्ना प्रमाणे पूर्ण झाला. मी अठरा-वीस वर्षापासू लिहीत आहे, सुरुवातीला मी हे माझ्या आईच्या नावाचे विश्लेषण लिहिले होते ,नंतर कसे आणि काय कशी सवय लागली मला समजलं नाही काहीतरी एक विषय डोक्यात आला की ते लिहायचे सहज म्हणूनच लिहीत होते पण मग नंतर त्याचे पुस्तकाचं रूपांतर होईल हे कधी वाटले नव्हते. पण माझे भाऊ वासुदेव वहिनी प्रभा मला नेहमी उस्फुर्त करायचे की तुम्ही खूप खूप छान लिहितात. कुठल्यातरी मासिकात किंवा पेपरात तुमचा लेख द्या ,पण कुठे आणि कसे काही लिंक सापडत नव्हती बघू असेच खूप वर्ष गेले . एकदा वाटले आपण जे लिहितो ते कितपत बरोबर आहे हे कसं समजेल मग मी आमच्या फॅमिली डॉक्टर मोरे यांन लिखाण दाखवले त्यांनी वाचले, आणि अभिप्राय लिहून दिला म्हणाले छान आहे प्रयत्न करू...