Posts

Showing posts from April, 2021

"हात शेवया"👍🏻

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " 🌹 शेवया  🌹 एप्रिल - मे महिना आला की हमखास उन्हाळ्याचे वाळवणाचे प्रकार घरोघरी होतात. त्यातला एक प्रकार शेवया. ह्या  शेवया तीन चार  प्रकाराने बनवतात -   1) हात शेवया 2) पाटावरच्या शेवया 3) मशीनच्या शेवया 4) विदर्भातल्या हात शेवया -  त्याची पद्धत एकदम वेगळी. एकच गोळा हातात घेऊन त्याचे वेगवेगळे पदर काढतात.  अजून एक प्रकार त्याला सुरगुंडे म्हणतात. ते एका जाड लांब काडीला शेवयाच्या पिठाचं सूत गोल गोल स्प्रिंग सारखे  गुंडाळायचे. मग ते वाळवायचे. ते अगदी स्प्रिंगच्या आकाराचे बनते. ते आंब्याच्या रसात टाकून खाण्याची पद्धत आहे. छान लागतात म्हणे. आमच्या शेजारी अरुणा राहते ती ह्या करते म्हणून मला माहिती. ही पण पद्धत कलाकौशल्य मेहनतीची आहे. पण हात शेवयांची चव काही न्यारीच. खूप मेहनतीच्या असतात या. आता सहसा कोणी करत नाही. बाहेरून  करून आणतात. याचे जागोजागी मशीन निघाले आहे. घरून गहू घेऊन जायचे व जाड बारीक पाहिजे तशा करून घ्यायच्या. पण हात  शेवयांची सर नाही . पूर्वी ह्या घरीच करायचे व आजकाल न्युडल्स म्हणून खूप प्र...

गोष्ट एक बांगडीची

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन " 🌷"बांगडी"🌷 "अगं सुनबाई उद्या वडपूजा आहे नवीन बांगड्या भरून घे", तर सून म्हणते, "अहो सासुबाई  मला आज ऑफिस आहे आणि मी जीन्स घालणार त्यावर काय बांगडी घालणार का ? मी उद्या संध्याकाळी बघेन!". मग माझे मन भूतकाळात गेले आणि आठवले की आपण सासरी  होतो तेव्हा सक्तीने एका हातात कमीत कमी सहा बांगड्या तरी घातल्याच पाहिजे असा नियम होता. मग बांगडीवालीचा इतिहास आठवला. आमच्या गल्लीत बांगडीवाली यायची.  अजूनही तिचा आवाज आठवतो  व तिची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. नऊवारी पातळ, मोठे कुंकू व भारदस्त आवाज. डोक्यावर गोल मोठी टोपली,  त्यात पद्धतशीर रचून ठेवलेल्या बांगड्या. वेगवेगळे  कंगन, कडे, पाटली, इ. आमच्याकडे  जी यायची तिचे नाव पार्वती काकू होते. बांगड्या किती भरायच्या आहेत, कशाला लागणार आहेत, तिला सगळं माहीत असायचं, त्यामुळे ती आली की लगेच सिलेक्टेड बांगड्या दाखवायची . त्या किती पक्क्या आहेत हे दाखवण्याकरिता एका हातात दोन बांगड्या घेऊन आवाज करून  दाखवायची. जर बांगडी फुटकी असेल तर त्याचा आवाज वेगळाच यायचा. तर बांगडी फुटकी आहे क...

🌷गुढीपाडवा 🌷

'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" - 🌷गुढीपाडवा 🌷 गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मासाठी पारंपारिक नवीन वर्षाची सुरुवात . चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते, झाडांना नवीन पालवी फुटते त्याला चैत्रपालवी म्हणतात. हा दिवस महा पर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. प्रतिपदेपासून  चैत्र नवरात्र सुरू होते. ती चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चालते. वर्षभरातील एकूण चार नवरात्र पैकी ही पहिली नवरात्र असते. ब्रह्म पुराणात सांगितल्याप्रमाणे  ब्रह्माच्या ध्वजाचे  प्रतिनिधीत्व करणाऱ्याला गुढी म्हणतात. ह्याच दिवशी विश्वनिर्मिती झाली होती.  हा सण गोवा ,मध्य प्रदेश ,महाराष्ट्र ई. सर्व ठिकाणी साजरा होतो आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये ह्या उत्सवाला युगाडी अशा नावाने ओळखतात .हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मानला जातो. गुढीपाडवा इसवी सन 78 मध्ये शालिवाहन शके पासून सुरू झाला. वसंत ऋतु संवस्तर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असून एक कालमापन पद्धती आहे. शालिवाहन शके हे अजून दुसरे कालमापन पद्धती आहे. वेगवेगळ्या संवत्सर मध्ये एक विक्रम संवत्सर आहे. आता शके 1942 ,चैत्र शके 1943 चालू आहे ...

कलई वाला😀👍🏼

कलई वाला😀👍🏻 पूर्वी पितळी भांड्यांचा जास्त वापर होता. त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याकरता भांड्यांना आतून कलई करावी लागायची. कलई केली नाही तर त्या भांड्यातले पदार्थ शिजवल्यानंतर खराब होत. कलई करण्याकरता ठराविक कारागीर होते.  आम्ही लहान असताना आमच्या गल्लीत एक कलईवाले काका यायचे. त्यांना आधी आमचे काका सांगायला जायचे की पुढच्या आठवड्यात या ! कलई ही स्वयंपाक घरातील पितळी भांड्यांना केली जायची. जसे की परात, वाट्या, ग्लास, पळी, इ. मोठमोठ्या पातेल्यांना -  ज्यात कुरडई , बिबड्याचा घाटा, खारोड्या, इ., केल्या जायच्या त्यांनाही कलई केली जायची. ज्या भांड्यांना कलई करायची ते भांडे आधी राखेने स्वच्छ घासून ठेवावे लागायचे कारण तेलकट भांड्यांवर कलई बरोबर होत नसे. ते काका  खाली रस्त्याच्या एका बाजूला खड्डा करायचे आणि एक लाकडी कोळशाची भट्टी लावायचे. त्याला हवा भरण्यासाठी एक छोटा पंखा पण असायचा.  मग 1 भांडे घ्यायचे व ते त्या भट्टीवरती चांगले लाल होईस्तोवर तापवायचे. ते तापले की त्याच्यावर कथिलाचा थेंब टाकायचा. कथिल एक धातू आहे. तो गरम भांड्यात वितळतो. त्यात सवागी टाकून कापसाने किंवा जुन्या...