Posts

Showing posts from October, 2020

'सुलहर' सहर्ष सादर करीत आहे "विचार मंथन" *लग्न - एक परिवर्तन* " शुभमंगल सावधान! " असे शब्द कानावर पडले की सर्व उपस्थित मंडळींना हायसे वाटते व "आटोपले एकदाचे लग्न" असे उद्गार निघतात. लग्न म्हणजे नक्की काय? असा प्रश्न लहानपणी जेव्हा मनात यायचा, तेव्हा लग्न म्हणजे नवीन साड्या, दागिने आणि नटायला मिळणार बस एवढेच वाटायचे. पण लग्न या शब्दात किती अर्थ लपलेला आहे हे लग्न झाल्यावर मुलींना कळते. हा एक सामाजिक व पारंपारिक शुभसोहळा व बंधन आहे व गोड स्वप्न देखील आहे. लग्न झाल्यावर, "सुखी आहे ना?" असे प्रत्येक विवाहीतेला विचारतात. कदाचित परिपूर्ण सुखी अाहे असे उत्तर ठराविक मुलींचे असते. आता सुख म्हणजे नक्की काय? पैसा खूप असणे, बंगला, गाडी असणे हेच सुख आहे की याव्यतिरिक्त अजून काही आहे? लग्न म्हणजे नशिबाची लॉटरी किंवा पत्त्यांचा डाव! तर ते कसे? लॉटरी म्हणजे एकदम अनपेक्षित, कल्पनेपेक्षा वेगळे मिळणे, नाही तर पत्त्यांच्या डावा प्रमाणे - त्यात कधी हुकमाचा एक्का असतो तर कधी साधेच पत्ते असतात. जसे असतील तसे खेळायचे असतात व जिंकायचा प्रयत्न करायचा असतो. कधी जीत तर कधी हार होते. पण शेवटपर्यंत खेळावा लागतो. जसे नव्याची नवलाई नऊ दिवस, त्याचप्रमाणे लग्न झाल्यावर काही दिवस सर्व सुरळीत चालते, पण काही कारणावरून वाद मतभेद झाले कि मग दोघांना प्रश्न पडतो -"आपण लग्न का केले?" उत्तर काही मिळत नाही. काही कुटुंबांमध्ये मुलांवरून वाद होतात तर काही वेळा घरातील नातेवाईकांवरून जसे सासू, नणंद, जाऊ, इ. पण असं काही झालं तरी संसार करावाच लागतो. प्रत्येक नात्याचा हसरा मुखवटा चढवून वावरावे लागते. कधीकधी असे वाटते मुले आहेत म्हणूनच पती-पत्‍नी एकमेकांना धरून आहेत. कारण प्रत्येक वेळेस असा विचार येतो की मुलांचे काय? त्यांचा काय दोष? शेवटी कुटुंब रेल्वे लाईन प्रमाणे असते. आयुष्यात शेवटपर्यंत सोबत असतात. रेल्वे रूळ जोडण्याच काम त्यांच्यामध्ये असलेल्या एक जाडजूड लाकडी कडपाचे (स्लीपर) असते, त्याच प्रमाणे मुलं संसारात उभयतांना प्रेमा पोटी जोडून ठेवतात.एकमेकांत पटत नसते याचे खरे कारण आवड-निवड, विचारांचे मतभेद असतात. ते नदीचे दोन किनारे एकमेकांना समांतर असून कुठेच मिळत नाही. ज्या वेळेस लग्न होते त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघतो. आपण, आपले घर, मुलं, हे स्वप्न असते. अर्थात बहुतांचे तसे नसते. कधीकधी लग्न ही जीवनातील तडजोड ठरते. कारण मुलींना चांगले जीवन जगण्यासाठी एक जोडीदार हवा असतो. पण तो सर्वांनाच मनासारखा मिळतो असे नाही, म्हणून सामाजिक बंधनात राहून एकमेकांना समजून घेण्याची एक सुसंगती आहे. थोडक्यात लग्न म्हणजे काय ? दोन जीवांनी थाटाने, समजुतदारपणाने व गोडीने करायचा संसार! पण हे प्रत्येकाच्या नशिबात असतेच असेही नाही. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आईचा संदेश असतो की दिल्या घरी तू सुखी रहा व दोन्ही घराण्याचे नाव उज्वल कर, सर्वांशी प्रेमाने वाग तेच तुझे घर ,आणि ह्याच उपदेशाच्या शब्दावर मुलगी सासरी निघून जाते. तिच्या माहेरचे नाव उज्वल करते. यालाच समाजात संस्कार मानतात. सं ...संस्कार सा... सातत्याने र .... रहाणे, रमणे च.- 🖋️ सुलहर

शक्ती महिमा

सहर्ष सादर करीत आहे "विचारमंथन"                            *शक्तीचा महिमा*  या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता l  या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता l नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः l आजकाल व्यवहारात 'लेडीज फर्स्ट' हा शब्द फार प्रचलित झाला आहे तेव्हा काही वयस्कर लोकांच्या मनात येते की हा पाश्चिमात्य शब्द का वापरतात? तसे पाहिले तर हा अनादी काळापासून चालत आलेला शब्द आहे तर तो कसा की जेव्हा आपण धार्मिक पूजा करतो, तेव्हा गुरुजी आपल्याला पूजा सांगतात तेव्हा प्रथम श्री व पुरुष असे दोघं मिळून पूजा होते पण सुरुवात करताना श्री गणेशाय नमः उमापती - शिव किंवा सिता- राम, राधा - कृष्ण, असे म्हणतात. म्हणजेच काय स्त्री ला अगदी पुरातन काळापासून पहिले स्थान आहे. तिला शक्तीचे स्थान दिले आहे. म्हणून तिची पूजा करतात. तर शक्ती ही फार महत्त्वाची आहे! शक्ती म्हणजे (ताकद नाही ) प्रेरणा आहे. देवांनी सुद्धा दानवांना मारण्यास शक्तीचा  उपयोग केलेला आहे . स्त्री ही अनंत काळची माता आहे .शिवाजी महाराजांची जिजामाता, कुंत...

आशीर्वाद

सहर्ष स्वागत करत आहे "विचार मंथन "                                    "आशिर्वाद"   आशिर्वाद हा निशुल्क, असून अमूल्य आहे. तो देताना किंवा घेताना पैसे द्यावे लागत नाही. मोठ्यांनी लहानांना दिलेला मनापासून एक अमूल्य ठेवाच आहे, खरेतर देवाचेच हे आशिर्वाद ,मोठे लोक माध्यम होऊन आपल्याला देतात. त्यांच्यात एवढी शक्ती आहे ती (अनाहत) दिसत नाही, पण पाठीशी उभी असते. हि ज्याच्या त्याच्या अनुभवाची आणि विश्वासाची गोष्ट आहे. आणि हे संस्कार सुद्धा आहेत जे आई वडील आपल्या मुलांना शिकवतात. त्यात शास्त्रीय कारण पण आहे की आपल्या मनात नम्रते चा भाव उत्पन्न होतो. म्हणूनच मोठे लोक जेव्हा भेटतात तेव्हा आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. याच्या वरून एक गोष्ट आठवली, एका गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होते, आई वडील व त्यांचा एक मुलगा गणू. ते खूप कष्ट करून पैसा मिळवत होते. चरितार्थ चालवत होते. एक दिवशी वडील अचानक आजारी पडले. डॉक्टर ईलाज बराच झाला. जवळ होते नव्हते ती जमा पुंजी खर्च झाली. आजार काही बरा झाला नाही. त्यांना बायको ...

वानोळा

सहर्ष स्वागत करत आहे" विचार मंथन"                                                                              वानोळा        आपल्याकडून दुसऱ्याला आपुलकीने दिलेली भेट ,म्हणजे वानोळा आम्ही लहान होतो तेव्हाची पद्धत होती ती. तर वानोळा ,म्हणजे ती एक माया च असायची हृदयातून पोटापर्यंत जाणारी, एकमेकांकडे , खाद्य पदार्थ ,देण्याचा एक संस्काराचा आणि वाटून खाण्याचा आनंद, खूप मज्जा यायची कारण गरीब-श्रीमंत असे काही नव्हते .हे एक जवळीक सधन्याचा व प्रेम टिकवून ठेवण्याचे माध्यम होते. आमच्या शेजारी दादा वहिनी ,मावशी काका, भाऊ दादा, असे प्रेमाचे नातेवाईक राहात असत . सांगायचे म्हणजे त्यांच्याकडे  शेती,फळबाग होती. तर त्यांच्याकडून गल्लीत सर्वांना फळ चिकू ,सीताफळ ,पेरू ,  केळी चा तर अख्खा घडच मिळायचा त्यात  पाच,दहा डझन तरी केळ असायचे ते पिकवायचे, केळांचे वेफर बनवायचे. तर कधी कच्च्या...