दिनांक 4/2/2026
संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त🙏🌷
सुवर्ण धातू बदल मिळालेली माहिती
वाचण्यात आली ती तुमच्या समोर सादर करत आहे.
दुर्मिळ आणि अनेक गुणधर्मामुळे सोने मौल्यवान! कसे.
ज्या सोन्याचे भाव आज गगनाला भिडले आहे अशा या सोन्याची माहिती
सुवर्ण अलंकार हा शब्द डोळ्यांसमोर येताच आपल्या डोळ्यापुढे येतात नयन मनोहर विविध रत्नजडित ,कलाकुसरीचे अलंकार. या अलंकारांचा पूर्व इतिहास पाहता, अनादी कालात सुद्धा होता. मानव मग ती स्रो वा पुरुष असो, आपले सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसण्यासाठी विविध प्रकारच्या अलंकाराचा उपयोग करीत आले आहे .अनादी काळात मानवाला जोपर्यंत धातूचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत त्या वेळी मानव महिला व पुरुष नैसर्गिक वस्तूंचा उदाहरणार्थ झाडाची पानें, फुलें ,शंख, शिंपले, प्राण्याचे दांत, व नखे यांचा अलंकार रूपाने सर्रास उपयोग करूत असे. जस जसा मानव प्रगत होऊ लागला तस तसं तो नवीन धातूचा आपल्या अलंकारा साठी वापरण्यास उपयोग करून
लागला. परंतु, सोन्याचा शोध केव्हा लागला हे निश्चितपणे कोणाला सांगता येणार नाही. सोन्याला धातूंचा राजा म्हणतात. कारण त्याची काही विशेष गुणधर्म, त्याचे वैशिष्ट्य गुरुत्व १९.३ आहे .म्हणजेच प्लॅटिनम वर टंगस्टन धातू यांच्या खालोखाल सोने जड आहे. शुद्ध सोन्याचा रंग पिवळा धमक असतो. त्याचा विलयनबिंदू एक हजार 10630 सेल्सियस आहे. सोन्याचे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अतिशय बारीक तारा काढता येतात. एक ग्राम सोन्याची 3.5 किमी लांबीची तार तयार करता येते .तसेच 0.0002 मि. मि. इतक्या पातळ जाडीचे त्याचे पत्रे तयार करता येतात .उष्णता व विद्युत यांचा सोने हा धातू उत्तम वाहक आहे. रासायनिक दृष्ट्या हा धातू क्रियाशील आहे. आम्ल किंवा अल्क यांचा त्यावर काहीही परिणाम होत नाही .मात्र नॅट्रिक ऍसिड व हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्या संयुक्त द्रवात तो विरघळतो. त्यास ॲक्वारेजिया असे म्हणतात .सोने हे तांबे या धातू प्रमाणे मुबलक सापडत नाही. ते दुर्मिळ आहे. त्यामुळेच फार पुरातन काळा पासून सोने कृत्रिमरित्या तयार करणे हे मानवाचे स्वप्न आहे. सोन्याचे दागिने मानवी संस्कृतीने का पसंत केले याची कारणे अशी सांगता येतील.
1) सोन्याचा आकर्षक रंग व अंगभूत तेज.
2) सोन्याची दुर्मिळ उपलब्धता, त्यामुळे त्याला होणारी आर्थिक महत्त्व.
3)आम्ल व अल्कलींची सहज प्रक्रिया होत नसल्याने राहणारे शुद्ध स्वरूप.
4) त्याचे उत्तम विशिष्ट गुरुत्व. यामुळे अल्प जागेत मावणारे त्याचे मोठे मूल्य.
5) त्याच्या उच्च मिलियन बिंदू यामुळे येणारा अधिक टिकाऊपणा .
6)अतिशय पातळ पत्रा वअतिशय बारीक तार काढता येण्याऱ्या त्याच्या
गुणधर्मामुळे असंख्य प्रकारच्या कलात्मक अलंकारासाठी होणाऱ्या त्याचा उपयोग .
7)सर्व वैद्यकीय शास्त्रामध्ये असणारे त्याचे औषधी महत्त्व.
8)सर्व इलेक्ट्रिक उपकरणात उपयुक्त
असे हे सुवर्ण सोन आपली वसुंधरा आपल्याला देत असते.
आणि सर्व सुवर्णकार सराफ बांधवांन ची अन्नदाता आहे.
आणि जे दागिने घडवतात असे कारागीरांना शतशः प्रणाम .
लीलाताई वानखेडे
नाशिक
सोन्याचा इतिहास त्याची मौलिक ता का आणि कशी ही बाब ओघवत्या शैलीत लिहलीय सर्वांनी आवर्जून वाचा
ReplyDelete