जागतिक अन्न दिवस
सहर्ष सादर करत आहे" विचार मंथन" 🌷16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस🌷 अन्न हे पूर्णब्रह्म🙏 मागच्या आठवड्यात जागतिक अन्न दिवस होता, हे समजले. त्याचे असे की आमची ज्येष्ठ नागरिक ग्रेसफुल लिविंग संघाची मीटिंग होती तर त्यात हा विषय होता. मला तसे पहिल्यांदाच कळले की हा पण एक दिवस साजरा होतो म्हणून! प्रो. मॅनेजर दामले व शमा मॅडम यांनी खूप छान प्रोग्राम अरेंज केला होता. प्रश्न उत्तराची मालिका, व आपल्या आवडीचा पदार्थ कसा करतात किंवा त्याविषयी अनुभव विचारले आणि दुसरे मजेशीर म्हणजे आता तुमच्याजवळ जे पण खाण्याचे पदार्थ असतील त्यापासून ऍक्टिव्हिटीज करा म्हणून सांगितले. प्रत्येकाने खूप छान आपले आपले कौशल्य प्रदर्शित केले. दीड -दोन तासाचा कार्यक्रम खूप छान झाला. नवीन काहीतरी माहिती मिळाली. हा दिवस कसा आणि केव्हा साजरा करतात. म्हणून मी पण या विषयी काही अजून माहिती मिळवून ती माहिती आपल्याला पुढे सादर करावी असे वाटले. आपल्यातल्या काही लोकांना माहितच असेल किंवा नाही ज्यांना माहित नाही त्यांना पण कळावी म्हणून मी हे लिहिले. आपल्याला आवडल्यास जरूर ...