Posts

Showing posts from May, 2025
Image
सहर्ष स्वागत करत आहे  "विचारमंथन"        *एक आठवण* माझी आई जेव्हा पोळ्या करायची तेव्हा मी फक्त बघत होते की ही कशी करते त्यामुळे मोठी झाल्यावर मला आपसूकच पोळ्या छान मऊ येऊ लागल्या.  शेवटी काय स्वयंपाक हा नजरेने शिकायचं असतो. तसेच  माझा लहान मुलगा मी स्वैपाक करताना नेहमी माझ्याजवळ उभा राहून पहात असे, मी स्वयंपाक कशी करते, ते त्यामुळे मी अभिमानाने सांगते की त्यालासुद्धा पोळीसकट सगळा स्वयंपाक येतो. तो लहान होता तेव्हाची एक गोष्ट आठवली.  मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा उलट करून मग गॅसवर भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच परत एका हातात पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चिमट्याने गॅसवर  धरला तर तो लगेच टम्म फुगून आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला, "किती छान टम्म फुगला फुलका? आई इतका सोप्पा असतो का?"😃 मी म्हणाले,  "हो, कठीण नसतोच मुळी फुलका व पोळी. खरंतर  सगळा स्वैपाकच सोप्पा असतो. आम्हा बायांना कठिण नसतं ते... रोज रोज करणे दिवसातून दोन-तीन, अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे, आपल्या मूडचा, मनःस्थितीचा, आजा...