Posts

"चहा"

Image
सहर्ष सादर करत आहे  "आनंदी सकाळ" 🌹 जागतिक चहा दीन 🌹 आज जागतिक "चहा दिवस "म्हणून चहा बद्दलचे काही मजेशीर अनुभवी बोल  . आपले चहा बद्दलचे प्रेम , चहाचे नाव घेतल्या बरोबर रोमँटिक वगैरे होऊन दोघात एक कप चहा घेण्यात येतो ती एक मज्जाच.                तसेच एका वेळी दोन दोन कप चहा पिण्याची सर नाही  येणार हुक्की आली की रात्री दोन ला  घेतलेला चहा, पेनल्टी म्हणून मित्रा कडून उकळलेला चहा, पैज लावून कपावर कप ढोसलेला चहा ,चहाचे दुष्परिणाम वाचत घेतलेला चहा ,आणि सिगारेट फुंकणाऱ्यांना शिव्या घालत टपरीवरचा चहा, हा चहा चहा,🫖☕ चहा ,आणि अमृततुल्य चहा ,आता तर वेग वेगळया नावाने चहाचे दुकान उघडले आहे काय तर आमदार चा चहा ,गुळाचा चहा, यवले चहा,असे एक ना एक अनेक चहाचे दुकान थाटलेले दिसते समोर एक टोपीवाला गृहस्थ चहाची कीटली घेऊन दिमाखात उभा असतो . आणि आत मध्ये मस्त बैठक घालून चहाचे कपा वर कप घेऊन पैसे कोणी द्यायचे?याची वाट बघुन घेतलेला चहा.आजारी असल्याच्या निमित्ताने घेतलेला चहा, लहानपणी दोन्ही हातांनी बशी धरून टॉम अँड जेरी  बघत फुंकून ...
Image
दिनांक  4/2/2026 संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त🙏🌷 सुवर्ण धातू बदल मिळालेली माहिती  वाचण्यात आली ती तुमच्या समोर सादर करत आहे. दुर्मिळ आणि अनेक गुणधर्मामुळे सोने मौल्यवान! कसे. ज्या सोन्याचे भाव आज गगनाला भिडले आहे अशा या सोन्याची माहिती सुवर्ण अलंकार हा शब्द डोळ्यांसमोर येताच आपल्या डोळ्यापुढे येतात नयन मनोहर विविध रत्नजडित ,कलाकुसरीचे अलंकार. या अलंकारांचा पूर्व इतिहास पाहता, अनादी कालात सुद्धा होता. मानव मग ती स्रो वा पुरुष असो, आपले सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसण्यासाठी विविध प्रकारच्या अलंकाराचा उपयोग करीत आले आहे .अनादी काळात मानवाला जोपर्यंत धातूचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत त्या वेळी मानव महिला व पुरुष नैसर्गिक वस्तूंचा उदाहरणार्थ झाडाची पानें, फुलें ,शंख, शिंपले, प्राण्याचे दांत, व नखे यांचा अलंकार रूपाने सर्रास उपयोग करूत असे. जस जसा मानव प्रगत होऊ लागला तस तसं तो नवीन धातूचा आपल्या अलंकारा साठी वापरण्यास उपयोग करून  लागला. परंतु, सोन्याचा शोध केव्हा लागला हे निश्चितपणे कोणाला सांगता येणार नाही. सोन्याला धातूंचा  राजा म्हणतात. कारण त्य...

कर अष्टमी

Image
सहर्ष स्वागत करत आहे  "विचारमंथन"       *एक आठवण* पूजा कराष्टमीची परवाच कराष्टमी झाली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरीही 'कराष्टमी' पूजा करायचे ती आठवण झाली. आम्ही परीक्षा संपली की सगळे दिवाळीसाठी भुसावळहून चाळीसगावला जायचो. ही पूजा रात्री होत असे. त्यादिवशी चंद्राला नैवेद्य दाखवला जायचा. स्वयंपाक वरणभात, भाजी- पोळी, भजी, शिकरण, गोड पुऱ्या. अजून इतर काही नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी जेवायचे नाहीत.  स्वयंपाक सोवळ्यात असायचा. कोणीही उष्टे करायचे नाही. हा तिथला नियम होता आणि त्या दिवशी नेमका चंद्रोदय उशिरा असायचा रात्री दहाच्या पुढे. सर्व लहान मुलं भूक लागायची झोपून जायची त्यावेळेस आत्तासारखे बारा वाजेपर्यंत जागरण करत नव्हते. नऊ वाजले की सगळे मुलं झोपून जायचे. आजी आम्हाला झोपू द्यायची आणि मग परत नैवेद्य झाला की उठवून जेवायला बसवायची. अर्धवट झोपेत आम्ही जेवण करायचो पण काय मजा गोड पुरी खाण्यासाठी प्रत्येक जण उठायचे. पूजा मांडलेली बघून खूप मन प्रसन्न व्हायचे. आता त्यातल...
Image
सहर्ष स्वागत करत आहे  "विचारमंथन"        *एक आठवण* माझी आई जेव्हा पोळ्या करायची तेव्हा मी फक्त बघत होते की ही कशी करते त्यामुळे मोठी झाल्यावर मला आपसूकच पोळ्या छान मऊ येऊ लागल्या.  शेवटी काय स्वयंपाक हा नजरेने शिकायचं असतो. तसेच  माझा लहान मुलगा मी स्वैपाक करताना नेहमी माझ्याजवळ उभा राहून पहात असे, मी स्वयंपाक कशी करते, ते त्यामुळे मी अभिमानाने सांगते की त्यालासुद्धा पोळीसकट सगळा स्वयंपाक येतो. तो लहान होता तेव्हाची एक गोष्ट आठवली.  मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा उलट करून मग गॅसवर भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच परत एका हातात पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चिमट्याने गॅसवर  धरला तर तो लगेच टम्म फुगून आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला, "किती छान टम्म फुगला फुलका? आई इतका सोप्पा असतो का?"😃 मी म्हणाले,  "हो, कठीण नसतोच मुळी फुलका व पोळी. खरंतर  सगळा स्वैपाकच सोप्पा असतो. आम्हा बायांना कठिण नसतं ते... रोज रोज करणे दिवसातून दोन-तीन, अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे, आपल्या मूडचा, मनःस्थितीचा, आजा...

उसवण

सहर्ष स्वागत करत आहे  "विचारमंथन",, *उसवण /माया*                       उसवण आणि माया या शब्दात  साम्य आहे उसवण ही कपड्याची करतात, त्याचप्रमाणे माया ही मुळातच आपल्या मनात असते. आणि शिवलेल्या कपड्याच्या आत असते तीला पण माया म्हणतात. त्याबद्दलचा अनुभव आणि वास्तविकता चार पैसे आल्यावर मुलीचे बदलेले विचार आणि आईने काळजी पोटी सांगतानाचे विचार.                   मुलगी आईला म्हणाली "आई! देऊन टाक, कुणाला द्यायच्या असतील तर या साड्या ,कुर्तीज  मला आता होत नाहीत...मी नवीन मागवतेय..." "आई, अग इतक्या चांगल्या,भारी महागामोलाच्या... चारपाच वेळा तरी वापरल्यास का? लगेच कपडे    टाकून काय गं देतात...? एखादी टीप उसवली तरी परत वापरता येतील की... म्हणूनच आत माया ठेवलेली असते ना...?" "तुझ्यातली बाई लगेचच जागी झाली का..?  "बोर झाल्या मला आता त्या कुर्तीज... मी नवीन बघते... "     लेकीचा निग्रह बघून ती उसासली. क्षणभर ही यांच्या जीवाची उलाघाल होत नाही का वस्तू टाकताना... ...