हात 👍

सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"

       🌹 हात👍😊🌹

तुम्ही म्हणाल हातिमाविषयी काय एवढे लिहिण्याचे कारण? मी परवा एक गाणे ऐकले.
'तेरे हातो मे नव नव चुडिया' 
खरंच हातात बांगड्या घातल्या की हात किती खुलून दिसतो.
मग 'म्हण' आठवली. 
'हाताच्या कंकणाना ला आरसा कशाला?'
 या म्हणीनुसार खरंच आपले हात आपले भविष्य घडवतो. ते असे आहे की आपण आपल्या हाताने काम करू तेव्हाच आपल्याला आपल्या उदरनिर्वाह करीता पैसा किंवा पोटभर जेवायला जेवण मिळते. त्यांचे पहिले आपण आभारी आहोत. आपले हात आपल्याकडून किती काम करून घेतो. चांगले-वाईट पण हाच धुतले की स्वच्छ होतात. देवाने आपले शरीर किती सुंदर बनवलेले आहेत  कारण दुसऱ्या वस्तू खराब झाल्यास आपण फेकून देतो. नवीन घेतो. पण शरीराचे तसे नाही ते कधीच खराब होत नाही. परत नव्याने दुसरे काम करायला तयार.
कुठल्याही काम केलं की त्यावरून फिनिशिंग म्हणून आपण त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवतो ते काम तेव्हाच पूर्ण झाल्याचे आपल्याला समाधान होते. उदा. काही वाळत घातलं की त्याच्यावरून हात फिरवतो तसेच कपड्यांना घड्या केल्या की त्याच्यावरून हात फिरवतो. काही कला केली भरतकाम विणकाम त्याच्यावरून पूर्ण हात फिरवला की समाधान वाटते की ते छान झालं म्हणून. एवढेच कशाला आपण स्वयंपाक करतो तर कोणाच्या हाताचा पदार्थ स्वादिष्ट बनतो तर आपण त्याला म्हणतो, 
'अहो, तुमच्या हाताची चव खूप छान आहे.' 
मला तुमच्या हातचे पदार्थ खूप आवडतात. तसेच हात फिरवल्या शिवाय कोणतेही काम पूर्ण झाल्याच समाधान होत नाही. आपण काय काम केले, काही दान दिले, किंवा चांगले काम केले की असेच म्हणतात या हाताचे त्या हाताला कळू देऊ नये.  ह्या हातात आपल्या भविष्याच्या रेषा असतात. कलाकारी असते, हे हात अगदी वाटत ले वाईट काम पण करतो आणि चांगल्यातले चांगले काम सुद्धा करतो, जसे दुसऱ्याला चांगले देण्यासाठी आशीर्वाद व वाकून नमस्कार व दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करतो अथवा माफी पण मागतो, दोघ हातांची ओंजळ करून धान्य इतर दान पण देतो. अशा किती चांगल्या गोष्टी करतो. हातावरूनच बऱ्याच म्हणी वा वाक्प्रचार आहेत,  त्या थोड्याफार मी इथे लिहू इच्छिते. हातात हात घालून मैत्रीचे व प्रेमाचे भक्कम स्नेहपूर्वक आदर करतो  व विश्वासाने नाते जपले जाते. कोणी लवकर काम केले नाही तर लवकर लवकर हात चालो तुझ्या हातात जोर नाही का असे म्हणतात. जादूगार आपली हात चलाखी दाखवून पूर्ण हॉल खिळवून ठेवतो. कोणी मुलांनी ऐकले नाही तर हाताबाहेर गेला असे म्हणतात. आपल्याला काही गोष्टीचा नकार द्यायचा असेल तर हात  हलवून नाही सांगतात.  गर्दीत कुठेही आपले माणूस दिसत नसेल तर उंच हात करून आवाज दिला तर लगेच तो सापडतो. काही जणांना आपला हात दाखवून भविष्य जाणून घेण्याचा छंद असतो तेव्हा म्हणतात हात दाखवून अवलक्षण करू नका असे. प्रेमाने मिठी मारण्यास हे हातच जवळ घेतात. नारे लावण्यासाठी तर हाताच्या मुठी आवळून जोरदार नारे दिले जातात. कोणी पैसे बुडवले तर हातावर तुरी देऊन गेला असे म्हणतात. जी कामगार हातावर हातावर पोट भरत आहेत त्यांना काय मागायचे. असे म्हटले जाते
हेच हात शिक्षा देण्यासाठी मुलांच्या गालावर, पाठीवर उमटतात तसेच शिक्षकांकडून पण शिक्षा होते हातावर, छडी लागे छम छम विद्या येई घमाघम . त्यातूनच मुलपुढे आपण शिकतो.
लहान मुलांने  आपल्या  हातात हात दिला की ते स्वतःला किती सुरक्षित फिल करतात, फक्त हाताच्या आधाराने आणि तोच त्यांचा हात आपल्या हातात असल्या वर गोड, स्पर्श सुखकर वाटतो.
असे हे हात आपल्याला हारू देत नाही आणि कारण नसता कोणापुढे झूकू देत पण नाहीत!
आपला हात जगन्नाथ 🙏👍😊

                    सुलहर 🖋️

Comments

  1. छान लेख वाचून खूप आनंद झालाय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"