बेसन
"सुलहर "सहर्ष सादर करत आहे
* विचार मंथन*
🌷बेसन/पिठलं🌷
सुनीलने आवाज दिला.
'सासूबाई, आज भाजी काय करायची?'
सुनेने दिवाबत्ती झाल्यावर असे विचारले तर त्या म्हणाल्या,
'अगं बरेच दिवस झाले पीठल केलं नाही तेच कर!
तर ती लगेच म्हणाली,
'मग ते तुम्हीच करा, कारण तुमच्या हातचे खूप छान टेस्टी होते.'
तर लगेच तिकडून मुलांचा आवाज आला आणि 'पिठल आणि डोकं उठलं.'
सर्व एकच हशा पिकला. नातू म्हणतो,
'असे काय म्हणत आहेत सगळे?अरे ज्याला आवडत नसते ना तो असेच म्हणतो.
एक म्हण आहे ती तसं पाहिलं तर पिठलं कोणाला आवडत नाही?, असे सहसा क्वचितच म्हणणारे आहेत. पिठलं गरिबाचे 'तिखट श्रीखंड आहे.'आणि एनीटाईम करता येते झटपट होणारा पदार्थ! वेळी-अवेळी रात्री अचानक पाहुणे आले किंवा काही भाजी नसते तेव्हा हे खूप जवळचे वाटते .हे खूप वेगवेगळ्या प्रकाराने केले जाते. अगदी कुठल्याही प्रसंगात सुखदुःखात सदैव तत्पर असा हा पदार्थ एकमेव सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे तर.
दर गुरुवारी गजानन महाराजांना प्रसाद म्हणून नैवेद्य करतात, अगदी दुखा:च्या घरी म्हणजे कोणाकडे मयत झाली तरी त्यांच्याकडे पिठलं-भाकरी नेऊन देण्याची पद्धत आहे. त्याला दुसरे नाव 'बेसन' पण म्हणतात. हे करताना याचा तसा विशेष ताम झाम नसतो. पण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही घरात आनंदाने नांदत असते. खेड्यात चुलीवरचे गरम गरम खाल्लेले पिठलं ,अजून दुसरीकडे खाल्लेले पिठलं हे खूप प्रकार आणि खूप वेगवेगळ्या पिठाने बनते उदा.ज्याला ह.डाळ चे पथ्य आहे ते मुगाच्या डाळीचे पिठाचे करतात .2)ह. डाळ भिजत घालून ती वाटून करतात ते तर खूप सुंदर लागते आमच्याकडे बहुतेक करायचे 3) चिवई च्या भाजीचा किर्रर्ड पिठलं कोणी त्याला झुनका पण म्हणतात .4) कुळीदाच्या पिठाचे पिठल कोकणामध्ये जास्त करतात. त्याची प्रोसेस म्हणजे कुळीद खमंग भाजून त्याचे पीठ जिरे ,ओवा , घालून दळायचे .
प्रत्येक डाळीचे पीठाची चव मात्र वेगळी असते. प्रत्येक घरात प्रत्येक गृहिणीच्या हाताच्या पिठल्याची चव पण वेगळी असते. असे त्याचे भाऊबंद खूप प्रकारचे आहे. म्हणजे करण्याची पद्धत पण कांद्याची पीठ पेरून केलेले पिठलं , लसणाचा तडका देऊन पीठ पेरून गाठीचे पिठलं, तव्यावरचे वड्या पडतील असे पिठलं, ताकातले पिठलं, कोरडा झुणका. (झुणका-भाकरीचे केंद्र पण बरेच निघाले होते.) असे अनेक प्रकार आहेत पिठल्याचे! पिठल्या त कांदा भरपूर कोथिंबीर आणि वरून (कच्च्या)तेलाची धार सोबत तुडुंब फुगलेली गरम-गरम ज्वारी- बाजरीच्या भाकरी, तोंडी लावायला कांदा. एक घास तोंडात टाकला आणि तो जिभेवर ठेवला की ब्रम्हानंद. (जिभेची पर्वणीच) प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही दुर्लभ असा हा मेनू याच्यासोबत गरम-गरम पहिल्या वाफेचा भात आणि हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खर्डा हा बेत काही निराळाच असतो. याचा आस्वाद घेत खाण्याची मजा काही औरच आहे खरड खाण्याची मजा तर सगळे तुटून पडतात ती खरवड खरडून खातात म्हणून त्याला खरवड म्हणतात असं वाटतं! बाहेर ट्रीपला जाताना बहुतेक लोक नेतात कोरडे पिठले. ते खराब होत नाही. दोन दोन दिवस टिकते. पण तव्यावरचे पाहिजे कोरडे .
आणि अस्सल जिवंत पिठलं खावे; ते फक्त आपल्या आई किंवा आजीच्या हातचे! त्या हाताला प्रदीर्घ अनुभवाची गोडी न विसरणारी. आहे हे पिठलं- भात, पिठल- भाकरी खाण्याची मजा आहे ना ! ती कुठल्याही पंचतारांकित हॉटेलात विकत मिळत नाही, असं हे पिठलं घरचेच!
सुलहर🖋️
Very nice 👌👌.Amarnath Jangale.
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDeleteधन्यवाद जंगले दादा 🙏
ReplyDeleteकांचन घोडके( गुड्डी )
ReplyDeleteअतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे अगदी वाचता वाचता तोंडाला पाणी सुटते साधा पदार्थ पण ताई तुझ्या शब्दांच्या फोडणी ने बेसनाची लज्जत वाढवीली.....👌🏻.. 😋
शितल ठाणे 👍🏻
ReplyDeleteमस्त मांडणी ,जणू काही वाचताना एक एक घास पोटात जात आहे आणि आम्ही त्याचा आस्वाद घेत आहोत ....😊😊👍
पुरंदरे वहिनी 👍🏻
ReplyDeleteपिठलं भाकरी हा गजानन महाराज चा प्रसाद आहेच पण सगळे आवडीने खातात कुणी चुन कुणी झुणका कुणी पिठलं तर कुणी बेसन म्हणतात पण शेतात जाऊन पिठलं भाकरी ठेचा मुळा कांदा अशी मेजवानी 😋😋😋अSssहाSssहा मस्तच
लिलामॅडम धन्यवाद🙏🏻🙏🏻
हेमंत नाशिककर 🙏
ReplyDeleteखूप छान दर गुरूवार चा संध्याकाळचा सर्वांनाच सर्वांनाच आवडणारा बेत 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
काकळीज 🙏
ReplyDelete👌फारच छान सकाळी सकाळी पिठलं भाकरी खावून ढेकर आल्या सारखे वाटले 💐
उर्मिला जोशी 🙏
ReplyDeleteखुप छान सकाळी सकाळी पिठलं भाकरी मस्तच.👌👌😋😋 खरोखर पिठलं भाकरी किंवा भात खर्डा याची सर कुठल्याही जेवणाला नाही.
अपर्णा खोले 👍🏻
ReplyDeleteवा, प्रत्येकाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा पदार्थ.नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.
सुनंदाताई 🙏
ReplyDeleteआवडीची मेजवानी👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻मस्त🥳
मीना मुगल 🙏
ReplyDeleteKhup chhan , Today's evening menu " pithale"
फार छान लेख.
ReplyDelete