फुंकर

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन "

"फुंकर"🌷

काल दाराच्या उंबरठयाची मला अचानक ठेच लागली आणि लगेच शब्द बाहेर पडला "आई गं ss". आईने लगेच माझ्या पायावर फुंकर घातली आणि म्हणाली, "काही नाही आत्ता बरे होऊन जाईल !" किती माया होती त्या शब्दांमध्ये आणि हृदयात काळजी. किती सुंदर, अर्थपूर्ण शब्द. नुसता शब्द वाचला तरी त्या प्रेमाच्या व्यक्तीचे व्याकुळ डोळे, माया, ममता, तो स्नेह, सहवेदना आणि अस्पष्ट ऐकू येतो तो "फुsss" असा आवाज. तोंडाने सोडलेला गरम हवेचा स्पर्श ! एक लाघवी उच्छश्वास !

ही एक ओठाने "फुss" असा आवाज करून, तोंडाचा चंबू करून केलेली कृती किती सहज सुंदर ! हळुवार भावना प्रदान केलेली मानसिक उपचार पद्धती.

कधी कधी डोळ्यात कचरा जातो तेव्हा लगेच आपल्या जवळची व्यक्ती किंवा मैत्रीण ; कोणीही असेल ती लगेच आपल्या डोळ्यात फुंकर घालते किंवा तिच्याच रुमालाने कापडाच एक टोक तोंडाला लावून, बोळा करून "फु ss" असा आवाज करून आपल्या डोळ्याला लावते. क्षणिक त्या गरम स्पर्शाने आपला डोळा बरा होतो . काय जादू आहे बघा ह्या कृतीत ! 

कधी कुणाच्या भयंकर दुःखात पाठीवरती हात फिरवून मायेने दुःखावर घातलेली ती प्रेमाची "फुंकर" किती सुखद आणि जवळीक साधणारी सहानुभूतीची हळुवार कृती.
कधीकधी नववधू प्रिया मी बावरते असे प्रियकराने तिच्या केसांच्या बटावर घातलेली "फुंकर" अशी की ती लाजेने चूर होऊन दोन्ही हाताने आपला चेहरा लपवते .
नटखट कृष्ण राधा रमण जेव्हा आपल्या मादक ओठांची "फुंकर " बासरीवर घालतो तेव्हा मधुर सूर निघतात व सर्व निसर्ग फुलून जातो. त्या गोड मंजुळ स्वराने सर्व गोप, गोपिकांना जवळ करतो.

लहान मुलांना साबणाचे पाणी घेऊन त्यात स्ट्रॉ बुडवून त्यावर घातलेली "फुंकर" एकदम छोटे छोटे बबल बाहेर पाडते. किती सुंदर खेळ . एकएक पाण्याचा बुडबुडा सप्तरंगात चमकतो आणि मुलं आनंदाने नाचतात. कधीतरी मुलं रिकाम्या रिफिलच्या सहाय्याने एका कागदावर चित्र तयार करतात. प्रत्येक रंगात रिफिल बुडवायची आणि एका कागदावर "फुंकर" मारून सोडायची. असे सगळे रंग सोडल्यावर एक चित्र तयार होतं किंवा होत ही नाही ! पण त्या "फुंकर "मुळे किती सुंदर रंगीबेरंगी फवाऱ्यासारखे चित्र तयार होते आणि मुलांना सुखद आनंद मिळतो.

कधी लहान मुलांना उचकी लागली की त्यांच्या टाळूवर हळूच "फुंकर" घालतात. तसेच बाळाच्या चेहऱ्यावर आई "फुंकर" मारते तेव्हा ते बाळ इतके गोड हसते गालातल्या गालात . तसेच बाळ मोठे झाल्यावर बशीत गरम दूध असताना त्याच्यावर घातलेली मायेची "फुंकर " ते दूध बाळासाठी लगेच थंड करते.

शेतात निघालेल्या धनीला चुलीवर भाकरी करताना विझलेल्या निखाऱ्यावर घातलेल्या "फुंकर" ने निखारा परत फुलतो व चुलीतली लाकडे पेट घेतात. खुप दिवसांनी सीमेवरून आलेल्या धनीचा अल्पशा मिळालेल्या सहवासात गप्पा मारत रात्र सरता सरता दिवा मालवून त्यावर घातली जाते ती "फुंकर ". 

किती सुंदर आहे आपल्या जीवनातील हळुवार "फुंकर" चे महत्त्व,
त्याला नाही लागत दवा दारू, नाही पैसे, ना कसली किंमत 
"फक्त हळुवार प्रेमाची " फुंकर"👍🏻🙋

त्यावर एक सुंदर गाणं पण आहे,
फुंकरीची वादळे आणि ओल्या सरी,
त्यात उडती पाखरे वरच्यावरी!

                                    सुलहर 🖋️

Comments

  1. Very nice 👌👌 Heartly Congratulations. Amarnath Jangale

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद 🙏👍🏻

    ReplyDelete
  3. शोभाताई
    Funkar atishy sundar khup Barik gosticha vichar kela ahes👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद शोभाताई 🙏👍🏻

    ReplyDelete
  5. फारच छान लेख वाचून आनंद झाला

    ReplyDelete
  6. फुंकरची कल्पना किती मोहक वाटली खूप खूप मस्त👌🤏👌

    ReplyDelete
  7. अत्यंत भावना प्रधान आणि मनालाऊर्जा देणारी फुंकर अनुभवली.खरोखर फु बाई फू चां गोडवाही जाणवला.आईचे वात्सल्य तुम्ही व्यवस्थित शब्दांकित केलेत.मनस्वी धन्यवाद.लिखाण सुरू ठेवा.

    ReplyDelete
  8. संवेदशील फंकरचा अनुभव आला.अतिशय उत्तम विषय विषय निवडून योग्य लिखाण केले आहे.मायेचे वात्सल्य ही उठून दिसते.माची वैचारिक शक्ती चांगली आहे.लिखाण सुरू ठेवा........अरुण चौधरी

    ReplyDelete
  9. तुमची फुंकर उत्तम असल्याने मनाला भावली.त्यात् माया ममता प्रेम स्नेह सर्वच संवेदना उत्तम रेखाटल्या आहेत.भावना. कृष्णाची बांसरी सुमधुर वर्णन आहे.तुमचे अभिनंदन
    ...अर्चना चौधरी

    ReplyDelete
  10. Wa फार छान कल्पना मांडली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"