"गुलाबजाम"
सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन "
"गुलाबजाम"🌹
गुलाबाच्या फुला इतकाच सुंदर आणि मोहक
हा पदार्थ अगदी सगळ्यांच्या आवडीचा आणि लाडका ! तोंडात टाकल्यावर लगेच विरघळणारा ! पण खरी गंमत अशी आहे त्याच्यामध्ये ना गुलाबाचा अंश ना कसला जाम, तरी तो "गुलाबजाम" कसा बनला याचा इतिहास पुढे वाचू.
गुलाबजाम किती प्रकारचे आहे हे बघा
1.खव्यापासून बनवलेले गुलाबजाम
2.ब्रेड पासून बनवलेले गुलाबजाम
3 .बटाटा पासून बनवलेले गुलाबजाम
4 .काला जाम, पाकातले गुलाबजाम ,
कोणी कोणी याला आईस्क्रीम मध्ये टाकून खातात .कुठे तरी म्हणे पावा बरोबर सुद्धा खातात अजून बरेच काही प्रकार
हा खूप लाडावलेला पदार्थ आहे.
35-40 वर्षांपूर्वी हा पदार्थ घरी बनवायचे पण ठराविक लोकांकडे आणि ठराविक पाहुणे आल्यावरच! तर एकदा आमच्याकडे आईने तो शिकावा असे काकांना वाटले म्हणुन त्यांनी त्यांचे गुजराती मित्र क्षत्रिय साहेब त्यांच्या मिसेस. काकूंना घरी बोलवले व करायला सांगितले. किती अप्रूप त्याचे ? बापरे! आता घरोघरी केव्हाही बनवतात. रेडिमेड ही मिळतात .तर सांगायचे असे की, आमच्याकडे तेव्हापासून गुलाबजाम बनवायला लागले. आमच्या आत्या भोपाळला राहत होत्या. वडिलांना आवडायचे म्हणून त्या जेव्हा कधी यायच्या तेव्हा त्या खास तिथून खवा आणायच्या. मध्यप्रदेशचा खवा खूप प्रसिद्ध आहे. खूप छान रवेदार असायचा. मग त्यानंतर आई वरच्यावर बनवू लागली. छान करायची !
त्यानंतर मग खेड्या वरून खवा विकणारे येऊ लागले दारावर. त्यातल्यात्यात कडगावचा खवा प्रसिद्ध होता. त्यात कणीक किंवा मैदा मिसळून खूप एकजीव करायचे. छोटे छोटे गोळे करायचे लांबुळके किंवा गोल आकाराचे व तुपात किंवा तेलात मंद आचेवर खरपूस तळायचे. मध्ये कच्चे रहायला नको आणि वितळायला ही नको. मग साखरेचा साधारण पातळसा पाक बनवायचा व त्यात वीलायची जायफळ पावडर टाकायचे तळलेले गुलाबजाम टाकायचे. आणि झाकण ठेवून मुरल्यावर शेजारी द्यायचे व मग खायचे . आमच्याकडे घरात सगळे लहान लहान आणि बरोबरीचे बहीण-भावंडे एकेक करून अर्धे तेव्हाच संपायचे ! दुसऱ्या दिवशी ऊरतील की नाही शंकाच. गुलाबजाम इतके टेस्टी असायचे गरम गरम छान लागायचे. तोंडात टाकले की संपलाच समजा. खूप मज्जा यायची!
आता तर कुठल्याही हॉटेलात सर्रास मिळतात गुलाबजाम. हा पदार्थ कोणत्याही समारंभाला कधी पण खायला आवडतो कारण त्यापासून काही अपाय होत नाही लहान मुलांन पासून मोठ्यान पर्यंत सर्वांना आवडतो.
म्हातार्या लोकांना तर फार आवडतो कारण त्यांना दात लावायची गरज नाही.
लग्नात किंवा इतर समारंभात कोण किती गुलाबजाम खाईल याची पैज लागते! आमच्याकडे आमच्या बहिणीच्या लग्नात भावाने आणि त्याच्या मित्रांनी पैज लावली होती. त्यांनी जवळ-जवळ तीस-पस्तीस गुलाबजाम खाल्ले होते. असा हा गुलाबजाम ! सर्वांचा लाडका व सर्व कार्यक्रमात आदराने प्रथम वंदावे तसा चालणारा .
एकमेकांना प्रेमाने भरवावा असा !
हल्ली तर अनेक कंपनीचे रेडीमेड पॅकिंग पण
येते अगदी छान होतात . झटपट स्वीट डिश तयार. पाकातला गुलाबजाम,
काला जाम - त्यावरून साखर लावलेला रसगुल्ल्या एवढा मोठा पण आतून रंग लाल , पिवळा, काळा ! असा हा गुलाबजाम सर्वांच्या घरोघरी मनाच्या पाकात भरलेला हा गुलाबजाम खूपच सुरेख !!!
हा भारतीय फळा सारखा (जांभळा) सारखा आकार आहे दिसायला पण तसा आहे म्हणूनही कदाचित याला गुलाबजाम नाव पडले असेल, शब्दांचा खेळ आहे.
याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ
हे आले कुठून आणि कसे हे आपणास थोडक्यात सांगावे असे वाटले याची माहिती मिळवली व हे आपल्यापर्यंत पोहोचावे.
ही मिठाई भूमध्यसागरीय देशात इराणमधून आली होती याला लुकमत -अल -कादी असे म्हणतात. हे लोक पिठापासून बनवत होते, पीठाचे गोळे बनवून तेलात किंवा तुपात तळून घेत होते मग त्याला मधा मध्ये बुडवून ठेवत मग त्याच्यावरून बारीक साखर पसरवत असत.
नंतर भारतात नामकरण झाले काही बदल करून गुलाबजाम झाला .
हा गोड पदार्थ म्हणून भारतात प्रसिद्ध झाला
मग याचे आपल्याकडे खास सणाला किंवा पाहुण्यांना पाहुणचार म्हणून बनवायला सुरुवात झाली .
याचा एक इतिहास आहे कदाचित तो बऱ्याच लोकांना माहिती असेल नसेल ?
पण आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की गुलाबजाम भारतीय पदार्थ नाही, ती एक इराणी मिठाई आहे. इराणमध्ये तेराव्या शतकात याचा उदय झाला गुलाबाचा अर्थ असा आहे गुल+आब गुलाबांच्या पाकळ्यांना गुल म्हणतात .आणि आब चा अर्थ काही विशिष्ट प्रकारचा रस त्यात सुगंधा करता गुलाबाच्या पाकळ्या टाकून जो पाक बनवत होते त्याला गुलाब म्हणत .
भारतात वर शासन करणारे मुगल बादशहा शहाजानला गुलाब जामुन खूप आवडत असे म्हणे .त्यामुळे मुगल सलताना शी जोडलेले लोक विशेष प्रसंगाला पाहुण्यांना गुलाबजामची मेजवानी देत होते .
हळूहळू भारतात पण शिरला हा पदार्थ विशेष पाहूण्यानकरता पाहुणचार म्हणून हा पदार्थ आवर्जून होऊ लागला .
मुगल तर चालले गेले परंतु गुलाबजाम जायला तयार नव्हता .
आहे की नाही मजेदार गोष्ट कशी वाटली सांगा
सुलहर 🖋️
Comments
Post a Comment