टाटा बाय-बाय
सुलहर सहर्ष सादर करीत आहे...
'विचार मंथन'
टाटा आणि बायबाय
परवाच माझ्या नातू 'टाटा' करायला शिकला.
खरंच आपल्याला किती सहज अंगवळणी पडलेले असते हे टाटा करणे! दारातून हसत निरोप घेतला तरी खिडकी किंवा गॅलरीतून टाटा असतोच. अगदी बाल मनापासून रुजलेले असते आई, इतर कोणीही बाहेर चालले की त्याला टाटा करायचा. एक छोटीशी हाथ हलवायची क्रिया , ज्याची सुरुवात आपल्या बालपणीच होते . पण काय एवढे असते? रूक्ष , भावनाहीन? मला वाटते या टाटा करण्यात विलक्षण सामर्थ्य असते. खूप भावना दडलेल्या असतात, आत्मविश्वासाच्या! दोन ,तीन, वर्षाचे मूल झाले की शाळेच्या दाराजवळ येऊन आपल्या आईला, बाबांना, करते हा टाटा असतो विश्वासाचा की शाळा सुटल्यानंतर आई-बाबा इथेच उभे असतील आपल्याला घ्यायला . बाळाच्या इवल्याश्या मिठीतून स्वतःला सोडवणारी एक ऑफिसला जाणारी माऊली, आई डोळ्यात अश्रू हृदयात कालवाकालव आणि मनात प्रचंड अपराधी भावना मागे वळून आपल्या बाळाला टाटा करते, हा असतो अगतिक टाटा. बाळाला अलगद त्याची आजी उचलून घेते आणि त्याचा हात हातात घेऊन टाटा करते, हा असतो प्रेमापलीकडे दुधाच्या सायीवरची स्निग्धता युक्त दिलासा . ओठावर पप्पी घेऊन हळूच हसून पुन्हा एकदा टाटा असतो कृतज्ञतेचा!
टाटा असते एक वचन ,दूरदेशी चाललेल्या मुलाला प्रेमपूर्वक हृदयद्वावक , आशीर्वादाचा टाटा तसेच त्याच्या पत्नीने दिलेले वचन मुलांना सांभाळून कुटुंबाला सांभाळेल घरची काळजी घेईन आणि 'तू पण जपून राहा' हा विश्वासाचा टाटा. तोच तिकडून असतो एक आश्वासन दिलेला टाटा मी लवकर परत येईल.
विमानतळावर आपल्या लाडक्या लेकाला लेकीला, नातीला घ्यायला गेलेले आई बाबा ते दुरूनच येताना दिसताच आनंदाने जोरजोरात हात हलवून त्यांचे स्वागत करतात पण हेच आई बाबा परत विमान तळावर सोडवायला जातात तेव्हा हात हलवण्याची क्रिया तीच असते, पण भावना किती वेगळ्या त्यात असते वियोगाचे दुःख.. सासरहून पहिल्यांदा माहेरी जात असलेली एखादी मुलगी हात हालवते टाटा करायला त्यात असते थोडी हुरहुर , थोडा लाजाळूपणा आणि माहेरचे परत भेटणार म्हणून होणारा थोडा आनंद.. हेच ती परत सासरी यायला निघाली हात करते तर तेव्हा संमिश्र भावनांनी माहेरचा निरोप घेते सासरी जाणारी सून असते भीती उत्कंठा आणि काळजी. सासरचे तिला हात करतात तो असतो मायेचा प्रेमाचा. बाळाला घेऊन लवकर ये गं आपल्या हक्काच्या घरी, हे तुझे घर गुरुलक्ष्मीची वाट बघते असे सांगतानाचा टाटा.
बाळंतपणासाठी आलेली बाळाला घेऊन परत सासरी निघालेली मुलगी आईला हात करते तो असतो शाशंक मनाने केलेला टाटा. 'जमेल ना गं आई मला सगळं ?' तिकडून तिची माऊली प्रेमाने हात करते 'जमेल बाळच शिकवेल तुला सारे' !!! हा असतो टाटा धीराचा . लेकुरवाळी माहेरपणाला आलेली मुलगी निघाली की वृद्ध आजी ,आजोबा ,आई ,वडील हात करतात येत जा गं वरचेवर आता आम्ही पिकली पानं. मुलगी हात करते! पण त्यात जीव नसतो फक्त प्रश्न असतो? मिळेलं ना गं अजून "माहेरचं सुख पुष्कळ वर्ष. " भाऊ भावजय गाडीत बसवून देतात 'बरे झाले आलीस खूप छान वाटले गप्पा झाल्या मस्ती झाली.' भाची,भाच्यांशी हे टाटा म्हणजे निमंत्रण असते परत माहेरपणाला यायचे.
मित्रमैत्रिणींच्या टाटा असतो एक पोच पावती आनंद परत भेटण्याची गोड आठवण. घरची स्त्री जेव्हा हसत सगळ्यांना टाटा करते ती आठवण असते की घरी आपल कोणीतरी वाट बघते .
ह्या टाटा मुळे सगळ्यांची पावले तिन्हीसांजेला आपोआप घराकडे वळतात .हे असते टाटा करण्याचे सामर्थ्य!
एक टाटा असतो प्रोत्साहनाचा परीक्षेला निघालेल्या मुलांना करतो तो . झालंय रे तुझा अभ्यास मस्त लिही पेपर ' बेस्ट ऑफ लक 👍🏻'
एक टाटा असा आहे ज्याला सगळे शब्द अपुरे पडतील तो म्हणजे सीमारेषेवर लढाईला निघालेल्या सैनिकला त्याच्या कुटुंबीयांचा सगळ्याच भावना असतात त्या टाटा त पण सगळ्यात तीव्र भावना असते ती देशसेवेची त्यांच्या त्या भावनेला आणि त्यांना आपला मानाचा मुजरा 🙏
अशी ही टाटा बाय-बायची कहाणी ,करत रहा टाटा व आपल्या भावना पोचवत रहा सर्वांना🤚
ताजा कलम :-
यावरून मला पॉझिटिव्ह व्यक्ती आठवते ती या वरील सर्वांची कृती रतन टाटा मध्ये आहे म्हणून त्याचे नाव टाटा असेल? कारण ते प्रत्येक क्षेत्रात अव्वल कार्यरत आहे व प्रत्येकाला आवर्जून टाटा करत असतील. म्हणूनच काय ते आपल्याला बिजनेसमधे प्रगतीच्या पथावर निर्धास्त पणे चालू शकतात. आणि त्यांचे व्यक्तिमत्व पण तितकेच भारदस्त आहे . आज आपण गेट वे ऑफ इंडिया समोरची "ताज हॉटेल" सारखी भव्य वास्तु बघू शकतो.
तसे ते कोणी आपले लागत नाही पण एक सामाजिक नागरिक , होत करू व्यक्ती म्हणून मनात कुठेतरी त्यांचे व्यक्ती चित्र म्हणून मला आवडते . त्यांचे कामातले यश बघून निश्चितच सर्वांनी धडा घ्यावा बाय-बाय टाटा करावा.
खूप सुंदर लेख लिहला👌👌
ReplyDeleteधन्यवाद 👍🏻
ReplyDeleteVery nice article 👌👌.Amarnath Jangale
ReplyDeleteसर्व सामान्य जीवनातील बाळकडू संस्करलेला टाटा किंवा बाय बाय हा किरकोळ पण महत्वचा घटक लेखनासाठी निवडून अक्षरबद्ध केल्याबद्दल प्रथमता आपले अभिनंदन.आपण तटाच्या अनेक प्रकारात कृतजञतापूर्वक टाटा आश्वासनकेंद्रीय टाटा विश्वस्त टाटा देशाभिमानी टाटा मानवंदना टाटा इत्यादी प्रकारांचे उत्तम लेखन करून स्मृती जागृत केल्याबद्दल पुन्हा प्रणाम.असेच लेखन सुरू ठेवावे
ReplyDeleteअरुण चौधरी
लिलाताई लहान मुलांच्या संस्करा संदर्भात तुम्ही टाटा बायबाय च लेखन केले आहे ते खरो खर बालपणाची आठवण करून देते .या संस्काराच्या निरनिराळ्या प्रकाराची माहिती तुम्ही उत्तम शब्दांकन केलेले आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
ReplyDeleteअर्चना चौधरी
🙏 चौधरी साहेब धन्यवाद
ReplyDeleteआपण आवडीने आणि सवडीने लेख वाचला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे
🙏 अर्चना ताई तुम्हाला
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद तुम्ही खूप आवडीने आणि सवडीने लेख वाचतात त्यामुळे आम्हाला लिहिण्यात उत्साह येतो👍🏻🌷