गच्ची/बालकणी🍁👍🏻
सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन "
बाल्कनीतल्या व गच्चीतल्या गमती जमती
घर कितीही लहान असले तरी आपल्या घराला एक बाल्कनी असावी असे प्रत्येकाच्या मनात असते. खिडकी, गॅलरी ,बाल्कनी, गच्ची, इ. वेगवेगळ्या क्षेत्रफळाची असते. सर्वांची आवडती जागा आणि विचार विनिमय, आनंद आदान - प्रदान करण्याची महत्वाची जागा.
असो, बाबांच्या आवाजाने तंद्री भंगली. " अरे बेटा ! काय आहे त्या खिडकीत? सदा कदा तिथेच असतोस!" आता काय सांगावे त्यांना ? बाहेर जाऊ देत नाही मग काय करायचे? खिडकीत, गॅलरीत उभे राहून बाहेरील गंमत बघायची आणि दुसरी गंमत म्हणजे ठरल्या वेळी शेजारच्या काकूंकडे मित्र-मैत्रिणी गप्पा मारायला जमायचे. त्यात एक मैत्रीण पण असायची. बाबा तिकडे जाऊ देत नव्हते मग काय करू ? गॅलरीत उभे राहून गप्पा मारायचं बस ! आता हे गुपित काय सांगणार त्यांना?
खरंच आहे पण! कितीही छोटे घर असो त्याला एक खिडकी, बाल्कनी जरूर असावी. खूप मजा येते त्यातून डोकावून बघायला. रस्त्यावरची मजा, एखादी वार्याची झुळूक ,गारांचा पाऊस आला की गारा गोळा करायला! रस्त्यावर बाहेर जाऊन तुम्ही बघू शकत नाही एवढे या ठिकाणाहून अनुभवायला मिळते. लग्नाची वरात ,दुसऱ्यांचे भांडण आणि गर्दी बघून गर्दीत न राहता वरतून सगळ अनुभवता येत. आहे की नाही मज्जा ?
यावरून किशोर कुमार चे गाणे आठवले, "मेरे सामनेवाली खिडकी में.... " अशीच आपल्या मनातल्या विचारांची एक खिडकी असते. ती उघडली की मग बरेच काही आठवते हळूहळू .
बाल्कनी :- खिडकी पेक्षा मोठी बाल्कनी! पण हिची सर कशालाच नाही. आमच्या घराला मागेपुढे दोन्हीकडे गॅलरी होती .ती थोडी मोठी असली की त्यात बंगळी किंवा झोका बांधलेला असतो. त्यात झूलायची तर औरच मज्जा ! बाहेर किती सुरेख देखावा बघायला मिळतो. उगवता सूर्य, मावळता सूर्य, झाड, पक्षी ,चिमण्या. सकाळ संध्याकाळची छान हवा अनुभवायला मिळते. संध्याकाळी येणार्या- जाणाऱ्याशी त्यांच्या घरी न जाताच गॅलरीत उभे राहुन गप्पा मारता येतात. आमचा अधिक वेळ गॅलरीतच जायचा. अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत . आमचे घर थोडे लहानच होते. झोपायचो सुद्धा गॅलरीतच.
गच्ची :- त्याच्यानंतर येते गच्ची ! ही बाल्कनी पेक्षा मोठी. त्याची तर खूपच वेगळी मजा ! उन्हाळ्यात झोपायला, अंगत - पंगत करायला, मस्ती करायला, खेळायला, मित्र-मैत्रिणींना जमा करून दंगा करायला वेगळीच मजा येते. त्यात छोटेसे गार्डन म्हणजे निरनिराळ्या आकाराच्या कुंड्या आणि रंगीबेरंगी फुलझाडे. दिवाळीत त्या कुंड्यांना गेरूचा लाल रंग लावून रचना बद्ध ठेवायला खूप छान आवडायचे. उन्हाळ्यात गच्चीवर झोपण्यापूर्वी पूर्ण पाणी शिंपडायचे. मस्त गार होते गच्ची. छोटा माठ किंवा खोजा , सुराई पाणी भरून ठेवायचे. माठाला पांढरा कपडा लावून ठेवायचा. त्यावर पाणी शिंपडायचे. गार पाणी होते त्याने. खोजा , सुराई पूर्वी खास (खंडवा, इटारसी) एम.पी मध्ये खूप छान डिझाईनचे लाल मातीचे मिळायचे. तिथून आणायचे आमचे काका . खोजाला पाणी घेण्यासाठी दोन तोंड असायचे. एक बारीक आणि एक मोठे- सिंहाच्या तोंडाचे आणि सुराईला एक निमुळते उभे असे तोंड असायचे. पूर्वी उन्हाळ्यात प्रवासात सुद्धा याचा खुप वापर व्हायचा. नंतर नंतर आपल्याकडेही मिळायला लागले. खूप थंडगार पाणी होत असे त्यामध्ये .
गच्चीवर रात्री आकाशातील चंद्र बघायचा, चांदण्या मोजायच्या आणि आकाश पांघरून घेऊन झोपायचे ! ती मज्जाच वेगळी .
गच्चीत पार्ट्या तर एक ना अनेक प्रकारच्या करायचो. पाव भाजी, शेव भाजी, कळण्याची भाकरी चटणी, भरीत , कोजागिरीचे दूध , चांदण्यातली कांदे नवमी. खूप मजा यायची आमच्याकडे . वाड्यातील सर्व मेंबर जमा होऊन दर महिन्याला पार्टी करायचो. काहीतरी निमित्त करून वरती गच्चीवर जाऊन एकत्र बसायचो. कधी कधी सगळेजण ठरवून आपआपला एक मेनू बनवून रात्रीचे जेवण गप्पागोष्टी करत गच्चीत एकत्र करायचो. कधी बारा वाजायचे समजायचे नाही. सुरू, सुजाता चा खूप सहभाग असायचा. आम्ही सगळे मिळून ठरवायचो आणि करायचो .
उन्हाळ्यातील वाळवण - वडे ,पापड , कुरडया, धान्य वाळत घालायला आणि मेन म्हणजे मुलांना पतंग उडवायला गच्ची खूपच कामात यायची. शेजारीच एक जांभळाचे झाड होते . ते पूर्ण झाड आमच्या गच्चीवर आले होते. तर जांभळाच्या सीजन मध्ये पूर्ण जांभळं खायची मज्जा लहान-मोठे सगळे घ्यायचे.
ही सगळी मजा व आनंद फ्लॅट किंवा बंगल्यामध्ये मुळीच नाही कारण तिथला माहोल वेगळा असतो 😀👏👍🏻
सुलहर 🖋️
गच्ची बद्दल लिखाण सुंदर व उत्तम आहे.लेखिकेचे अभिनंदन.स्वतः आनंदी राहून आम्हालाही आनंद द्यावा
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद आपण खूप आवडीने असतात असेच भरभरून प्रेम द्यावे 🙏👍🏻
Deleteखूप खूप धन्यवाद
Deleteवासुदेव सोनार
ReplyDeleteव्वा खूप छान! आपल्या गँलरी व गच्ची ची सर व मज्जा कुठेही येणार नाही, आता ते क्षण परत येणार नाही.
आठवण चे 👍🏻
शितल 👍🏻
ReplyDeleteखुप सुंदर गच्ची चे वर्णन ... गच्चीवर नेऊन ठेवले आम्हाला......अगदी मनाने गच्ची मध्ये जाऊन हा छान लेख चा अनुभव घेता आला...thank u 😊😊
खूप खूप धन्यवाद 👍🏻
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 👍🏻
ReplyDeleteपुरंदरे वहिनी
ReplyDeleteवा वा लीला मँडम सुंदर लेख गच्चीवर अंगत पंगत भारी होत असे झोप तर मस्तच होत असे जाग ही लवकर येत असे अजून एक विशेष कार्यक्रम घरी आईस्क्रीम चे मशिन आणून आईस्क्रीम करत असू सगळे वाड्यातील मंडळी एकत्र बसून पोटभर खात होती काय मज्जा होती खरंच😋😋👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद वहिनी तुम्ही एवढ्या आवडीने आणि सवडीने वाचले त्याबद्दल आभारी आहे👍🏻
ReplyDelete