8 मार्च महिला दिन

सर्व भगिनी महिलांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹👍🏼

जागतिक महिला दिन का आणि कधी  सुरू
 झाला?

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एक कामगार आंदोलनातून झाला 1908 झाली याची पहिली ठिणगी पडली होती .त्यावर्षी पंधरा हजार महिलांनी न्यूयार्क शहराच्या रस्त्यावर मोर्चे काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
२) याशिवाय  त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या चांगले वेतन मिळावे, आणि मतदानाचा अधिकार मिळावा. या आंदोलनाचा वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशलिस्ट पक्षाने 8 मार्च महिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला .
३) हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करा याची कल्पना कशी सुचली?
ही कल्पनासुद्धा एका स्त्रीची च होती क्लारा झेटकिन यांनी 1910 स कोपनहेगन मध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठी च्या
एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला त्या परिषदेत देशाच्या शंभर महिला सहभागी झाल्या होत्या त्या सर्वांनी प्रस्तावाला अनुमोदन दिली सर्वप्रथम 1911ऑस्ट्रिया ,जर्मनी ,आणि स्वित्झर्लंड मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता 1975 चाली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीम सह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती Celebrating the past,Planing for the future   (भूतकाळाचा आनंद भविष्यासाठी योजना)
४)आज काल ऑफिस मध्ये , सामाजिक ठिकाणी  बऱ्यापैकी भारतीय महिला दिन साजरा करतात. ऑफिसमध्ये तर ( डब्ल्यू एस एस सी) कडून वेगळा फंड मिळत असतो.
त्या दिवशी ऑफिसमध्ये महिलांना हाफ डे सुट्टी दिली जाते. आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतो.   रांगोळी स्पर्धा, नवीन नवीन योजना, खेळ, पूर्ण दिवसभर कार्यक्रम चालतो. त्यादिवशी जेवण सुद्धा देतात. त्यादिवशी सर्व महिला जात पात धर्म पंथ सगळे विसरून एकजुटीने  एकत्र होऊन उत्साहाने सक्रिय होऊन कार्यक्रमात भाग घेतात. खरं तर एक दिवस असा महिला दिवस नसतोच कधी. रोज, सर्व दिवस महिलां  दिवस च ! कारण महिला  आपल्या कुटुंबाची ,समाजाची, नात्याची घरची आर्थिक,जबाबदारी एक कर्तव्य म्हणून तिचा (रोल) निभवत  असते. आपले कार्य शिताफीने पार पाडते
५)दुसरे असे की महिला दिनाच्या दिवशी काही ठराविक रंगाचा वापर केला जातो आणि त्याला प्राधान्य दिले जाते .ते म्हणजे जांभळा ,हिरवा, आणि पांढरा .
१)जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठा दर्शवते. २)हिरवा रंग आशे साठी.
३) पांढरा रंग शुद्धतेच्या प्रतिका साठी.

श्री रविशंकर जी म्हणतात सामाजिक असमानता कौटुंबिक ,हिंसा ,अत्याचार आणि आर्थिक परावलंबी यातून श्री यांची सुटका व्हायची असेल तर गरज आहे महिला सक्षमीकरणाची (सबलीकरण) सशक्तीकरण प्रथम आपण सक्षम आहोत याची खात्री स्त्रियांनी बाळगणे गरजेचे आहे आपण स्त्री आहोत ह्या आत्मग्लानी मध्ये कधीही राहू नका जेव्हा तुम्ही आत्मग्लानी मध्ये येतात तेव्हा उत्साह आणि सामर्थ्य गमावतात.
ही झाली एक ओळख अशा आपल्या महिला थोर  राष्ट्रीय स्वयं सेविका होऊन गेलेल्या आहेत व अजुनही नेटाने काम करता. त्यांची संख्या अगणित आहे न मोजन्या इतक्या प्रत्येकाचे नाव लिहित बसले तर  पान कमी पडतील. पण एक जागतीक उदाहरण म्हणून काही महिलांचे नावे देत आहे

१) मूळ भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स हिने अंतराळ विक्रम केला. १२७ दिवस ती अंतराळात राहिली. तिने आपल्या मोहिमेत आतापर्यंत ३२२ दिवसांचा मुक्काम केला. ५० तास पेसवॉक   केलाय. विश्व गुजराती सोसायटी तर्फे दिला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल विश्व प्रतिभा पुरस्कार सुनीताला देण्यात आला.

२) बचेंद्री पाल यांचा जन्म उत्तरकाशी जिल्ह्यात गढवाली या गावात 24 मे 1954 रोजी  सामान्य कुटुंबात जन्म झाला, असला तरी त्यांनी स्वप्न मात्र मोठी पाहिले भारतीय गिर्यारोहक म्हणून त्यांनी नाव कमावले एव्हरेस्ट शिखर सर करण्यात त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

३)दोन मुलांची आई मेरी कॉम ही वयाच्या अठरा वर्षे महिला मुष्टियुद्ध स्पर्धा ठरली अधिक ताकदवान होण्यासाठी तिने मुलांबरोबर सराव केला मेरी कॉमने अंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला भारताची विश्व विजेती मुष्टियुद्ध खेळाडू म्हणून मेरी कोमने ऑलम्पिक मध्ये चमदार  कामगिरी केली.

४) ( उडन परी) हिमा दास,(नऊ जानेवारी 2000)ही एक भारतीय 21 वर्षे वयाची धावपटू आहे .2018 फिनलँड  मध्ये वर्ल्ड जूनियर ॲथलेटिक्स चंपियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले .या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.400 मीटर धावून रौप्य आणि सुवर्णपदक जागतिक 20 वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धा, विविध स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता 26 फेब्रुवारी  मध्ये ती डी.एस.पी पादावर रुजू झाली.

अशा एक नाही अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात वीर आणि थोर आहेत ,आणि होऊन गेलेल्या आहेत. उदा. सावित्रीबाई फुले ,जिजामाता अहिल्याबाई होळकर,मदर टेरीसा इतर अनेक. 

अश्या महिलांना साष्टांग दंडवत आणि आपणही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा काहीतरी करू शकतो, आणि  करावे आपल्यातही  स्री शक्ती आहे हे कधीही विसरून चालणार नाही.

सर्व महिलांना प्रेमपुर्वक अभिष्टचिंतन ..🌹👍🏼😀

🖋️ सुलहर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"