सर्वांचा आवडता केक
'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -
आज नाताळ. केक हा ख्रिश्चन लोकांचा नाताळातला एक खूप आवडता आणि प्रचलित पदार्थ. पण आता सर्वदूर सर्वांना प्रत्येक फंक्शन मध्ये केक हवाच असतो. तसे बघितले तर केक हा काही वर्षांपूर्वी फक्त ख्रिश्चन लोकांमध्ये जास्त प्रचलित होता. आपल्याकडे जसे दिवाळीत लाडू करंजी मुख्य असतात तसे त्यांच्याकडे नाताळात केक हा मुख्य पदार्थ आहे. आम्हाला लहानपणी केकची इतकीच माहिती होती की तो नाताळात ख्रिश्चन लोक बनवितात. त्याहून जास्त माहिती म्हणजे तो बेकरी प्रॉडक्ट आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत मराठी लोक तो खात नव्हते कारण त्यात अंडे टाकून बनवत असत पण नंतर हळूहळू लोकांच्या मागणी नुसार बिनाअंड्याचा केक - मिल्क केक मिळू लागला. ज्या लोकांना अंडे चालत नाही ते लोक असा केक खाऊ लागले. वाढदिवसाच्या दिवशी तर केक असतोच असतो. तो कापल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होतच नाही. कोणी महत्त्वाचे पाहुणे येणे बाकी असले तर म्हणतात "थांबा ! त्यांना येऊ द्या मगच केक कापू!" केकचे महत्त्व एवढे वाढले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत कितीही खाण्याचे प्रकार असले तरी गोडाची जागा केकने पटकवली आहे. आज - काल केक म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच कापतात असं काही नाही. गेल्या दहा वीस वर्षांत तर केक इतका प्रचलीत झाला आहे की कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम असो, केक हवाच. अगदी बेबी शॉवर, प्रमोशन, कुठलेही फंक्शन असू दे, केक हवाच. आणि आता तर तो सहज उपलब्धही होतो. त्यातच आता किती प्रकार निघाले आहेत. वेगवेगळे आकार, रंग, चव, थीम, हर प्रकारे बनवून मिळतो. त्यात हवे त्याप्रकारचे डिझाईन ही करतात. अगदी देखावे, पैठणी साडी, पक्षी , गाडी, घरटे, एक ना अनेक डिझाईनस. कप केक / स्लाइस केक पासून पुढे किती ही किलो आणि त्यात खूप बदल करून त्याचे रूप इतके सुंदर बनवले जाते की बस्स !!! केक आला की तो कसा आहे? किती मोठा आहे? कोणती थीम आहे? हे बघण्यासाठी सर्वजण केक च्या भोवती जमा होतात. तो एकदा डोळ्यांनी बघुन घेतला की केवढा आनंद मिळतो ! कारण केक खाण्यासाठी आधी डोळ्यांनी बघून खायला छान वाटतो. केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता झाला आहे. इतके केकच्या आहारी आपण केव्हा आणि कसे गेलो हे लक्षातच आले नाही !
शहरात केकची मोठी मोठी दुकानं आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे महिलांना एक रोजगार मिळाला आहे. केक शिकवण्याचे क्लासेस निघाले आहेत. क्लास केल्यामुळे खूप महिलांना आपला छंद जोपासता आला आहे तर काही महिलांना आपल्या घराला हात भार लागावा म्हणून उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. असा हा केक खूप प्रसिद्ध झालेला आहे. आता तर होम मेड केक पण खूप छान मिळतात. आमची सुनबाई पण हाच व्यवसाय करते. तिला खूप ऑर्डर येतात. तिच्या हातचा केक खूप छान असतो. एकदा खाऊन बघा. आवडल्यावर परत ऑर्डर द्या.
🖋 सुलहर
खूप सुंदर...
ReplyDeleteSundar
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice Amarnath . Jangale.
ReplyDelete