शक्ती महिमा
सहर्ष सादर करीत आहे "विचारमंथन"
*शक्तीचा महिमा*
या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता l
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता l नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः l
आजकाल व्यवहारात 'लेडीज फर्स्ट' हा शब्द फार प्रचलित झाला आहे तेव्हा काही वयस्कर लोकांच्या मनात येते की हा पाश्चिमात्य शब्द का वापरतात? तसे पाहिले तर हा अनादी काळापासून चालत आलेला शब्द आहे तर तो कसा की जेव्हा आपण धार्मिक पूजा करतो, तेव्हा गुरुजी आपल्याला पूजा सांगतात तेव्हा प्रथम श्री व पुरुष असे दोघं मिळून पूजा होते पण सुरुवात करताना श्री गणेशाय नमः उमापती - शिव किंवा सिता- राम, राधा - कृष्ण, असे म्हणतात. म्हणजेच काय स्त्री ला अगदी पुरातन काळापासून पहिले स्थान आहे. तिला शक्तीचे स्थान दिले आहे. म्हणून तिची पूजा करतात. तर शक्ती ही फार महत्त्वाची आहे! शक्ती म्हणजे (ताकद नाही ) प्रेरणा आहे. देवांनी सुद्धा दानवांना मारण्यास शक्तीचा उपयोग केलेला आहे . स्त्री ही अनंत काळची माता आहे .शिवाजी महाराजांची जिजामाता, कुंती माता , सीता माता अशी अनेक उदाहरणं आहेत. स्त्री ही अनेक नात्यांनी गुंफलेली असते - मावशी, आत्या, आजी, बहिण, इत्यादी. म्हणजे तिचे प्रत्येक ठिकाणी किती महत्त्वाचे स्थान असते!
देवीने महिषासुराला मारले म्हणजे त्याचे मुंडके उडवले म्हणून देवीजवळ नरभक्षक मारण्याची प्रथा आहे. म्हणजे ज्या डोक्याचा वापर नाही त्याचा गैरवापर केला होता, अशा राक्षसाचा तिने बळी घेतला. आत्ताही कलियुगात असेच काही केले तर कदाचित स्त्रियांवर होणारे बलात्कार, अत्याचार ह्यावर आळा बसेल.
अशाच प्रकारे यंत्रांमध्ये सुद्धा 'श्री यंत्र' सर्वात श्रेष्ठ मानतात असा खुलासा आहे . पुष्कळ जण हे यंत्र धनलाभा साठी वापरतात. तर शक्ती म्हणजे देवी या शक्तीची उपासना करूनच आपण शक्ती मिळवू शकतो. श्री मधील मातृ शक्ती महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, चंडिका अशा सर्व रूपांचा साक्षात्कार आपल्याला वेळोवेळी झाला आहे. श्री शक्तीच्या अखंड जागरणामुळे समाज जागरणाचे, राष्ट्र जागरणाचे मोठे कार्य झाले आहे. श्री शक्ती महासरस्वतीचा पण एक अंश आहे . सर्व विद्या आणि कलांची अधिष्ठात्री देवी शारदा माता आपल्या बुद्धी ज्ञान स्फूर्ती देते.
आज सर्वच क्षेत्रात स्त्रीने उंच भरारी मारली आहे. संगीत, नृत्य, अभिनय, कला, संशोधन, सैन्य - सर्वच क्षेत्रात स्त्री आघाडीवर आहे. संगीताच्या क्षेत्रात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुब्बालक्ष्मी यांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे. तर हेमा मालिनी ह्यांनी आपल्या नृत्य आणि अभिनयाने सर्वांना मोहिनीच घातली आहे . खेळाच्या क्षेत्रात पी.टी उषा, अंजली भागवत पासून गीता फोगाट पर्यंतच्या खेळाडूंनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. विज्ञान संशोधनातही श्री शक्ती आघाडीवर आहे आणि कल्पना चावलाने अंतराळात भरारी घेतली. अध्यात्माच्या क्षेत्रात ही यांचे कार्य अाहे. तसेच देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर अशा स्त्रिया आपल्या डोळ्यासमोर येतात. आजही संसार करून त्या दिशेने वाटचाल करून सर्व स्तरावर आपले स्थान स्त्रीने निर्माण केले आहे .
गृहलक्ष्मी चे स्थान ! प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते. त्यानुसार घरातील पुरुषांना प्रेरणा देऊन सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या, ताण-तणाव, स्वतः झेलून तारेवरची कसरत करून स्थिर राहणारी गृहलक्ष्मी ही सुद्धा एक महान शक्तीच आहे हे विसरून चालणार नाही. आपल्या घरासाठी, मुला-मुलींसाठी स्वतःच्या हाडाच्या काड्या करून सर्वांना शक्ती देण्याचे काम तीच करू शकते. प्रत्येक घरातील स्त्री ही गृहलक्ष्मी आहे आणि आदिशक्ती तिच्यातही सामावली आहे . तेव्हा आपले सामर्थ्य, कर्तृत्व ओळखून श्री शक्ती चे बळ वाढवावे. आज बऱ्याच ठिकाणी दिसणाऱ्या अत्याचार आणि भ्रष्टाचार यांना तोंड देऊन सामोरं जाण्याचे बळ निश्चितच ती करते आहे . आपल्या कुटुंबाचे प्रेमाने भरण पोषण करणारी, आपले घर निर्मळ आणि आनंदी ठेवणारी ही महालक्ष्मीचे सात्विक रुप आहे . आदिशक्ति श्री मध्ये सामावली आहे. श्री शक्ती मधील तेजस्वी सामर्थ्याचे जपणूक करण्याचे भान मात्र सर्वांनी ठेवायला हवे. तिचा अपमान व अनादर होणार नाही हे जपायला हवे. यंत्र नमस्ते असे म्हटले आहे तेव्हा आदीशक्ती पार्वतीची सखी होऊन, आपण आपले कुटुंबाला समाजाला आणि देशाला समर्थ आणि समृद्ध करण्याचे व्रत, संकल्प करू. नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांनी ही एक घोषणा करून प्रतिज्ञा करू. आदिशक्ती चा विजय असो 🙏
- 🖋️सुलहर
Kajal Chouhan
ReplyDeleteKhup sundar 👌
Chan👌👍
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteअव्याहत कष्ट, सर्व जबाबदाऱ्या, सर्व क्षेत्र पादाक्रांत करणाऱ्या आणि सर्व नात्यांना न्याय देणाऱ्या "स्त्री" शक्तीला "देवी" तूल्य मानून माझा मन:पूर्वक सलाम... 🙏🙏🙏
ReplyDelete-रजनी दिक्षित.
२३ ऑक्टोबर २०२०.
खूप खूप धन्यवाद आपल्या वाचनानेच आम्ही उत्स्फूर्त होऊन लिखाण करू शकतो👍🌝
DeleteVery Nice. Amarnath Jangale
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआपल्या वाचनाने उत्स्फूर्त होऊन मी लिखाण करू शकते👍🏼
लेख छान आहे तसेच मस्त जमून आलंय.अतिशय सुयोग्य शब्द आपल्या भाषेत मांडलेले आहेत.अभिनंदन 🙂👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआपण कोण आहेत नाव समजलं तर बरं होईल 👍🌝