* विचर मंथन *
प्रस्तावना,
स्नेह नमस्कार ,
मी लीलाताई वानखेडे
रिटायर्ड एम्प्लॉयी वय 65
हल्ली मुक्काम मुंबई
माझ्या
पुस्तकाचा आत्तापर्यंतचा प्रवास अगदी स्वप्ना प्रमाणे पूर्ण झाला.
मी अठरा-वीस वर्षापासू लिहीत आहे, सुरुवातीला मी हे माझ्या आईच्या नावाचे विश्लेषण लिहिले होते ,नंतर कसे आणि काय कशी सवय लागली मला समजलं नाही काहीतरी एक विषय डोक्यात आला की ते लिहायचे सहज म्हणूनच लिहीत होते पण मग नंतर त्याचे पुस्तकाचं रूपांतर होईल हे कधी वाटले नव्हते. पण माझे भाऊ वासुदेव वहिनी प्रभा मला नेहमी उस्फुर्त करायचे की तुम्ही खूप खूप छान लिहितात. कुठल्यातरी मासिकात किंवा पेपरात तुमचा लेख द्या ,पण कुठे आणि कसे काही लिंक सापडत नव्हती बघू असेच खूप वर्ष गेले . एकदा वाटले आपण जे लिहितो ते कितपत बरोबर आहे हे कसं समजेल मग मी आमच्या फॅमिली डॉक्टर मोरे यांन लिखाण दाखवले त्यांनी वाचले, आणि अभिप्राय लिहून दिला म्हणाले छान आहे प्रयत्न करून सतत लिहीत रहा जमेल.
अजून एक माझ्या ओळखीचे मराठीचे प्रोफेसर पाठक सर आहे त्यांना पण दाखव हे . त्यांना पण दिले वाचायला मग त्यांनी चेक केले व त्यांनी पण असाच अभिप्राय दिला मग मला जरा उत्साह आला, लिहितच राहिले पुढे काही दिवस बंद झाले
आत्ता म्हणजे चार महिन्यापूर्वी पेपरात ॲडवटाईज होती की 55वर्ष वयाच्या वरील लोकांनी करोना बद्दल लेख पाठवा तर भावाने मला आवर्जून सांगितले, तु लिहून पाठव म्हणून मग मी ते लिहिले, आणि नंतर तोच लेख दुसऱ्या भावाला सदाशिव याला पाठवला खूप छान लिहिले , आपण तुझे सर्व लिखाण हे टाईप करू एक कॉपी करू, कारण त्याला माहिती होते की मी लिहिते मला हे करायचे आहे. त्याचं कोर्टाचे काम टायपिंग करून द्यायचे व्यवसायच आहे . म्हणून त्याच्या डोक्यात आले आपणच करावे आता हे काम आणि काय, तुझी खुप दिवसांची इच्छा होती ना? मग आता करतो मी म्हटले कसे काय देऊ तुला मी मुंबईला तू जळगावला .तो म्हणाला व्हाट्सअप वर टाक मी करतो बरोबर कारण आता मला करोना मुळे विशेष काम नाही वेळ आहे वेळेचा सदुपयोग खूप छान झाला. सर्व फोटो कॉपी काढून व्हाट्सअप वर पाठव .
त्याने खूप मेहनत घेऊन सर्व टाईप केले पूर्ण झाले मग तो म्हणाला आपण ह्याचं प्रिंटिंग करू थोडाफार खर्च येईल पण तुझी इच्छा पूर्ण होईल.
पुस्तकच करू माझ्या ओळखीचे आहे ,प्रेस वाले आणि तेच प्रकाशक पण आहे तू म्हणशील तर करतो.
ओके म्हटले कारण हे करताना माझ्या मुलांचा व सुनांचा पण मला सपोर्ट होता आणि माझे स्नेही आप्तेष्ट ह्यांच्या शुभेच्छा मग मी विचार केला ठीक आहे करू , मग काय पुस्तक रुपी एक स्वप्नच माझ्या हातात आले. त्याने हे सर्व ठाण्यात माझा भाऊ पं. विवेक सोनार बासरी वादक आहे, त्याला कळवले, तर तो म्हणाला छान आम्हाला माहीतच नव्हते की तू पुस्तक लिहिले म्हणून! मग मी म्हटले अरे हो सरप्राईज द्यायचे होते सर्वांना, व एक कार्यक्रम पण करायचा होता छोटासा पुस्तक विमोचना चा आता करोना मुळे शक्य नाही, तो म्हणाला तू कशाला काळजी करते आपण ऑनलाइन करू शकतो त्याने मनावर घेतले व एक छोटासा अनपेक्षित असा पुस्तक विमोचन सोहळा प्रस्थापित केला खूप छान झाला अगदी "सुवर्णक्षण" म्हणता येईल असा.
माझ्यावर माझ्या भाऊ बहिणीचे अतोनात स्नेहबंध प्रेम आहे म्हणून च हा क्षण प्रत्यक्षात आनंद अनुभवायला मिळाला 

ताक.
आणि आता ऑनलाइन लिंक वर "आनंदी पाऊस" वर्षाली ताई चे लेख वाचले तर खूप छान वाटले त्यांचे विचार. आपणही करू शकतो का असे तर त्यांना विचारले मला मदत कराल का त्यांनी मनापासून मला सहर्ष मदत करण्यासाठी हात पुढे केला खरंतर त्या खूप खूप बिझी आहेत आणि असतात. तरी पण मला वेळ देण्यासाठी खुशीने तयार झाल्या ,हे ऐकून मला खूप आनंद वाटला. आणि पुढे वाटचाल करावी असे वाटले. त्याबद्दल त्यांचे मनस्वी हार्दिक स्वागत.
ReplyForward |

अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 💐 💐
ReplyDeleteHeartly Congratulations & Best wishes
ReplyDeleteWow sunder. Congratulations and best wishes. Tu chaan chaan lihit raha. Tujhye anek pustake prakashit hou det heech shubhecha.👍👌🙏
ReplyDelete👍👌🌹🌹👏👏 super aahe aatya "vicharmanthan"
ReplyDeleteCongratulations and best wishes for your next writing.
I am waiting for your next surprise 👍👍🎉🎉
ReplyDeleteपुस्तक खूपच आवडले, तसा अभिप्राय बाबांनी फोन करून दिलाच आहे, आपली प्रतिभा अशीच फुलत राहो ही प्रार्थना
ReplyDelete