कर अष्टमी

सहर्ष स्वागत करत आहे 
"विचारमंथन"
     
*एक आठवण*
पूजा कराष्टमीची

परवाच कराष्टमी झाली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरीही 'कराष्टमी' पूजा करायचे ती आठवण झाली. आम्ही परीक्षा संपली की सगळे दिवाळीसाठी भुसावळहून चाळीसगावला जायचो.
ही पूजा रात्री होत असे. त्यादिवशी चंद्राला नैवेद्य दाखवला जायचा. स्वयंपाक वरणभात, भाजी- पोळी, भजी, शिकरण, गोड पुऱ्या. अजून इतर काही नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी जेवायचे नाहीत.  स्वयंपाक सोवळ्यात असायचा. कोणीही उष्टे करायचे नाही. हा तिथला नियम होता आणि त्या दिवशी नेमका चंद्रोदय उशिरा असायचा रात्री दहाच्या पुढे. सर्व लहान मुलं भूक लागायची झोपून जायची त्यावेळेस आत्तासारखे बारा वाजेपर्यंत जागरण करत नव्हते. नऊ वाजले की सगळे मुलं झोपून जायचे. आजी आम्हाला झोपू द्यायची आणि मग परत नैवेद्य झाला की उठवून जेवायला बसवायची. अर्धवट झोपेत आम्ही जेवण करायचो पण काय मजा गोड पुरी खाण्यासाठी प्रत्येक जण उठायचे. पूजा मांडलेली बघून खूप मन प्रसन्न व्हायचे. आता त्यातल्याच काही गोष्टीचं समजत नव्हत्या.
ती पूजा का करतात आणि कशी असते. त्याबद्दल थोडी माहिती मिळवली व ती आपल्याला देत आहे.
कराष्टमी हा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा होणारा एक सण आहे, जो दिवाळीच्या आगमनाची सुरुवात दर्शवतो.
कालाष्टमी आणि कराष्टमी हा 'कालाष्टमी'चाच एक भाग आहे. तसे प्रत्येक महिन्याला अष्टमी येते पण प्रत्येक अष्टमीचे महत्व वेगवेगळे आहे.
 या दिवशी कालभैरवाची पूजा केली जाते. तर 'कराष्टमी' हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा होतो, देवीची पूजा आणि करांची पूजा केली जाते, हे दिवाळीच्या तयारीचे प्रतीक आहे.
पूजेची पद्धत: या दिवशी घरामध्ये लक्ष्मी आणि धन-धान्याची पूजा केली जाते आणि करांच्या पूजेसोबत पहिला दिवा लावला जातो. काही ठिकाणी आठ दिवे लावून देवीची पूजा केली जाते.
खानदेशात व विदर्भात घरोघरी ही पूजा होते. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी दिवाळी आलीय, हा संदेश देणारी व धन समृध्दी तर पुजेला ठेवलेले धांडे आणि धान्य म्हणजेच लक्ष्मी होय. या गोष्टींची कराष्टमीला पूजा करून दिवाळीचा पहिला नवा दिवा घरात लावला जातो. 
काही ठिकाणी कालभैरवाच्या पूजेचाही समावेश असतो आणि शेतीत पिकलेल्या पिकांची (विशेषतः ज्वारीची) ही पूजा केली जाते. ही आपली उपासना पध्दती आहे. कराष्टमी म्हणजे  दिवाळीअगोदर कराष्टमीचे महत्व! त्वचारोगींनी कराष्टमीला उपवास का करावा? देवाधर्माच्या गोष्टी आणि त्यामागील गूढ पूजा विदर्भात जास्त प्रचलित आहे. करा + अष्टमी अशी याची फोड आहे मातीचे किंवा (आठ तांबे )पण घेतात ८ कऱ्हे पूजन करतात.. कुलाचारानुसार नैवेद्य असतो.. ५ ज्वारीचे धांडे एकत्र करून त्याखाली ही पूजा होते.
देवघरात पाटावरती सुपामध्ये आठ तांबे ठेवून त्यावर गोड पुरी वर नैवेद्य ठेवून ही पूजा मांडतात, चंद्राला नैवेद्य दाखवतात.
त्या दिवसापासून दिवाळीच्या कामांना सुरुवात झाल्याचे समजतात.
कृष्ण पक्षातील आठवी तिथी 'कालाष्टमी' म्हणून ओळखली जाते. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाचीपण पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रतदेखील करतात .
असे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतात. अशी कराष्टमीची मला माहिती मिळाली. आवडल्यास लाईक करा. शेअर करा.

                              
सुलहर

Comments

  1. खूप छान माहिती तसेच आपल्या पारंपरिक , सांस्कृतिक रीतीरिवाजांचे दर्शन घडवले आहे . अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐👍👍

    ReplyDelete
  2. फारच सुंदर माहिती कराष्टमी बद्दल आताशा कांही गोष्टी विस्मरणात जात आहे पण अजूनही बरेच घरातील लोक व्रतवैकल्य करून नविन पिढीला हे सर्व अवगत करत आहेत 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹
    -- पुरंदरे मॅडम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"चहा"