होळी
सहर्ष स्वागत करत आहे
"विचारमंथन",,
🌹होळी पौर्णिमा 🌹
काल नुकतीच होळी होऊन गेली
आणि जुन्या आठवणी त रमले.
आणि लहानपण आठवतले.
होळी रे होळी पुरणाची पोळी! आठ दिवस जून फर्निचर व लाकडं आधी चोरन ठेवायची.
ते साठवून ठेवायची मग होळीच्या दिवशी काढायची. रात्री सात वाजता होळीला नैवेद्य दाखवायचा. होळीला एरंडेलचे झाडाचा खांब रोवायचा. त्याला साखरेचा हार, फुलांचा हार असे घालून सजवायचे रांगोळी काढायची व सर्व गल्लीतले महिला ,
मुली सर्वजणी नैवेद्य घेऊन पूजा करायला यायच्या खूप मजा यायची होळी पेटली की 'होळी रे होळी पुरणाची पोळी' मित्राचे नाव घेऊन त्यांच्या नावाने ओ ssअसे म्हणून एकमेकांच्या नावाने ओरडायचे.
होळीला तांब्या मध्ये पाणी घेऊन गोल असे फिरवून होळी भोवती रिंगण पाच वेळा टाकायचे व त्याच्यामध्ये नारळ वहायचे. खोबऱ्याची वाटी भाजायला टाकायची आणि ते प्रसाद म्हणून खायची. खूप गोड आणि छान लागते ते. रोवलेले झाड ज्या बाजूला पडेल त्या दिशेला महागाई वाढेल अशी एक समज होती.
रात्रभर जागरण करायचे आणि मग सर्वान साठी पोहे करून अंगत पंगत करून रात्री खायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच होळीच्या निखार्यावर गरम पाणी करून आंघोळीला न्यायचे त्याच राखीची धुळवड म्हणून पण खेळायचे.
असो. आता पुढे 🔥 होळीची माहिती फाल्गुन पौर्णिमेचे *हुताशनी पूर्णिमा* हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी पेटविली जाते.
एक आख्यायिका अशी पण आहे की नाशिक शहरांमध्ये धुली वंदन च्या दिवशी पारंपारिक सण साजरा केला जातो तो म्हणजे गंगे वरती वीरांच्या मिरवणुकीचा जल्लोष होतो. ते म्हणजे प्रत्येक जण आपले देवाचे टाक घेऊन येतात, आणि गंगेवर त्यांना विधिवत आंघोळ घालून घरी नेतात खूप मोठी मिरवणूक निघते त्यामध्ये
वीरदाजीबा म्हणजे मानाचे समज जाते. नाशिक येथील दाजीबा वीर मिरवणुकीचा प्रारंभ होतो वीर तब्बल 24 तासानंतर घरी जातो. तसेच यावर्षी पण हा सोहळा खूप भव्य दिव्य गंगेवरती पार पडला .
हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जळू शकणार नाही असा वर होता.
म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस, असे सांगितले. कारण प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटेच. होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळी पेटवून आनंद व्यक्त करतात. शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात.
तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात बीभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली आहे. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते तसाच हा प्रकार आहे. विषवृत्तावर सूर्य येतो तो २१ मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. देवालया समोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.
एकदा भगवान शंकर तपा चरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पाहता क्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे. 'होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्व गुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल!
होळीच्या खूप खूप शुभेच्छा🌷
लीलाताई
सुलहर🖋️
खुप छान
ReplyDeleteधन्यवाद ताई🙋
ReplyDelete