सहर्ष सादर करत आहे विचारमंथन
🌹 *चक्र* *पूजा* 🌹
🙏चक्र पूजा नवरात्रातील एक कुळाचार करण्याची परंपरा आहे.
*चक्र* हे देवतांच्या हातातील एक शस्त्र आयुध आहे.
*चक्रपूजा*
केव्हा व कशी करतात.
ही पूजा नवरात्रात घटस्थापना झाल्यावर *अष्टमीला* करतात यावेळी जर कांही कारणास्तव नाही झाली तर (दिवाळीच्या)कर अष्टमीला पण करतात.
नवरात्रात प्रत्येक दिवस आनंदाचा असतो नवरात्र आली की गुजरात मध्ये व आता सर्वच राज्यांमध्ये *गरबा* खेळायला उत्सुक असतात. ते एका पटांगणा मध्ये मध्यभागी एक कलश ठेवतात व त्यावर दांडा रोऊन त्या भोवती फेर धरून रात्री गाणे म्हणून जागरण करतात.
आपल्याकडे पण आता खूप त्याचे प्रस्थ झालेले आहे ठिक ठिकाणी देवीच्या पुढे नवरात्र संपेपर्यंत स्पर्धात्मक गरबा डान्स खेळायला मुलं-मुली एकत्र जमतात .
खानदेशात चक्रपुजेचे खूप महत्त्व असून तो एक धार्मिक विधी म्हणून पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.
प्रत्येकाच्या घरी आपापल्या परंपरेने करण्याची रीत (पद्धत) असते.
कोणी दरवर्षी करतात तर कोणी आपल्या भाऊबंदात प्रत्येकाकडे करतात ज्यांना पुढच्या वर्षी करायची तो ज्यांच्याकडे पूजा असते त्याच वेळी सांगतो की पुढल्या वर्षी माझ्याकडे चक्र पूजा आहे. कोणाकडे तीन वर्षांतून एकदा करतात. कोणी गडावर देवी जवळ नवस म्हणून पण करतात हे सर्व खूप श्रद्धा भावनेने करतात.
या पूजे ला तसे म्हटले तर खूप आर्थिक दृष्ट्या खर्चिक आहे, सहसा ज्यांच्याकडे पिढ्यान पिढ्या चालत आहे तो करतोच. महत्वाचे म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर देवी तुमच्याकडून करूनच घेते .हा अनुभव व देवीचा चमत्कार आहे .
कोणी आपले भाऊ भाऊ एकत्र पैसे जमा करून पण करतात , चक्र भरायाचे ते आपल्या प्रत्येकाच्या कुळाप्रमाणे म्हणजे विसपुते, सोनवणे, अजून वेगळे कुळाचे आपल्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे धान्याचे भरतात.
विसपुते यांच्या कडे गोल आकारात चक्र भरतात तर , सोनवणे कुळातले चौकोनी भरतात असे बघितले आहे.
याचा स्वयंपाक खूप बारीक व लक्षपूर्वक करावा लागतो ,एक छोटेसे लग्न सोहळाच असतो.
जेवण झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे व उरलेले अन्न व पाणी टाकण्यासाठी घराच्या आवारात किंवा घराच्या बाहेर पटांगणात एक गोल खड्डा
करून त्याची पूजा करतात त्याला (समुद्र )म्हणतात.
या वेळी स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी ,खीर,भात,डाळीचे फुनके , (सार )आमटी ,वडे ,खीर हरभऱ्याची उसळ, इत्यादी
फराळ करंजी, सांजोरी, लाडू तळणा मध्ये भजी, कुरडया,पापड पुरी,अजून इतर
त्याची तयारी करायला एक महिना लागतो . सर्व नातेवाईकांना ईष्ट मित्रांना आमंत्रण दीले जाते. आता मोबाईल आल्यामुळे फटाफट मेसेज दिले की झाल पूर्वी पत्र लिहून आमंत्रण द्यावे लागत कोणाकडे मिळायचे पत्र किंवा कोणाकडे उशिरा मिळायची मग गोंधळ व्हायचा असो.
नवरात्रीचे उपवास असले तरी सर्वजण महा प्रसाद म्हणून या दिवशी उपवास सोडतात .
सर्व वडील मंडळी हजर असते. चक्र मांडलेले प्रसाद नातेवाईक व प्रसाद लग्न झालेल्या मुलींना किंवा बाहेरच्या मंडळीला देता येत नाही.
चक्र भरायला तांदूळ, मूग ,काळे उडीद ,मसूरची डाळ, मीठ, कोहळा ई.लागते
फराळाचे करंजी, सांजोरी, लाडू व झालेला स्वयंपक प्रत्येकी 11 वस्तू घेतात .
हे चक्र त्यांनाच भरायला येते जे नेहमी भरतात भाऊ बंधालेच पाच सहा जण मिळून भरतात चक्र भरायला प्रथम तांदुळाची मूठ घेऊन देवीचा गजर करून चक्र भरायला सुरुवात करतात प्रथम पांढरा तांदूळ, नंतर उडीद ,नंतर लाल तांदूळ, नंतर पुन्हा पांढरा तांदूळ, नंतर उडीद, मग पुन्हा लाल तांदूळ ,नंतर मूग असेच सात गोल आकारात चक्र भरतात पाच-सहा तास लागतात
पूजा झाली की कोहळा तलवारीने कापतात .कुणा कडे नॉनव्हेज पण असते .
पूजेत एक मोठा दिवा असतो तो पंचामृत टाकून बनवून
वाफवतात त्याचा एक दिवा वऱ्हाडी करतात त्याला मेढा म्हणतात. या दिव्यात एक जाड कापसाची वात करून कापूराने पेटवतात शक्यतो ती एकाच ठिपक्यात लागली पाहिजे अशी मान्यता आहे.
पूजेचे वेळ संध्याकाळी दिवे लागण्याच्या नंतर होते हे जेवण रात्री चे असते त्या दिवशी जागरण करतात देवीच्या नावाचा जल्लोष करतात हे चक्र ज्या धान्याने भरलेले असते ते दुसऱ्या दिवशी एकत्र स्वच्छ करूनखिचडी सारखे शिजवून सर्व भाऊबंध खातात. खूप चविष्ट असतो हा प्रसाद नंतर प्रसाद खाल्ल्याशिवाय कोणीही जात नाही ही याची माहिती.
पुरातन काळापासून सुरू झालेली नवरात्रातील चक्र पूजा ही महाराष्ट्रातील जळगाव ,धुळे, नाशिक या भागात कुलधर्म म्हणून खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यावेळी "घरात आग्या हो तिसऱ्या तिसऱ्या हो" म्हणजे देवी माता आज्ञा द्या हा असा शब्द आहे ह्याचा गजर केल्यानंतर याची पूजा सुरू करतात ती म्हणजे पाचव्या, आठव्या, किंवा नवव्या माळेला करतात. किंवा दिवाळीमध्ये पण करतात . पूजे नंतर आपल्या घरात कुलदेवतेचे आगमन होते अशीच श्रद्धा आहे या पूजेसाठी सर्व वस्तू 11- 11 लागतात त्यामध्ये तांदूळ, कणकेचे दिवे, पेरू, सिताफळ, आंबे राम फळ, ऊस, लिंबू ,चाफा उडीद कापूर ,गुलाल ,नारळ असे असते नैवेद्यासाठी बरोबर 11 पुरणपोळ्या करतात व त्यावर सर्व पदार्थ एकेक ठेवतात हे सगळं क्रमवार व्यवस्थित लावून ठेवतात.
पूजा घटस्थापने जवळ केली जाते गोमूत्र ,शेण टाकून पहिले ती जागा सारऊन पवित्र केली जाते त्यावर रांगोळी काढतात त्यावर पाचपत्री ठेवून कापूर जाळतात तांदळाच्या सात राशीचे गोल आकार चक्र बनवण्यात येते खूप प्रशस्त व सुंदर दिसते होम पण करण्यात येतो सर्वजण त्यात आहोती टाकतात.
घरातील प्रमुख व्यक्ती पूजेसाठी बसतात, पूजा झाल्यावर तलवारीने कोहळा कापतात व तो नंतर गुलाल लावून जिथे चार रस्ते मिळतात तिथे सर्व स्वयंपाकाचा नैवेद्य आणि कोहळा ठेवतात.
त्या प्रत्येक गोलाकर राशीला चार दरवाजे असतात व मंत्र म्हणून जागर केला जातो पुढे एक मिठाचा समुद्र व उडदाचा मारुती काढतात नंतर दिवा लावल्यावर सगळ्या आरत्यांचा समूह म्हणतात.
प्रसन्न मनाने सर्व मंडळींना जेवणाचा प्रसाद वाढला जातो. मधला दिवा मात्र अखंड रात्रभर जळतो .
अशी ही **चक्रपूजा**पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या चालत राहते.
जय भगवती देवी आई की जय 🙏
खूप छान लेख आहे आणि पुढील पिढीला खूप उपयुक्त माहिती मिळाली.आनंदी शुभेच्छा 🎉💐💐
ReplyDelete