सहर्ष स्वागत करत आहे
"विचारमंथन
चोर चोळी, चोर ओटी कशी भरयची व केव्हा याबद्दल थोडी माहिती.
तसे तर ही चोर ओटी मी दहा-पंधरा वर्षांपूर्वी मी माझ्या दोन्ही सुनांची भरली होती. म्हणून मी हे दोन-चार शब्द सांगू शकते परवा काय झाले अचानक मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तिच्या मुलीची चोरी ओटी, चोळी भरायची आहे तर कसं करू ग तर मी म्हटलं अगं हो कित्ती छान योग. मी सांगते पण म्हटलं चला आपण हे लिहूनच तिला सांगू तर ईतर चार जणांना अजून समजेल म्हणून मी हे लिहायला घेतले तर चोर चोळी,चोर ओटी म्हणजे ती चोरून च भरायची बरेका आणि ती सुद्धा दिवे लागण्याच्या वेळी कोणालाही समजू न देता ही ओटी तीन महिने संपल्यानंतर चौथा लागल्यावर भरतात. चोर चोळी भरण्याचा एक उद्देश की बाळाची काळजी म्हणून कौतुकाने भरायची असते .चोर चोळी ही आपण मुलगी किंवा सून एक गोड बातमी देते तेव्हा ती एक नवीन उंबरठ्यावरती पाऊल पडत असते. आणि आपल्या घरातली ही गोड बातमी फक्त पहिले घरातल्याच लोकांना सांगायची असते.ओटी भरल्यानंतर बाहेर सर्वांना सांगायचे कारण तीन महिन्यापर्यंत बाळाचे अवयव तयार होत असतात डोळे, नाका, कान, हात, पाय सगळ्या अव वयांना आकार येत असतो. आणि बाळ हिरावते चरो ओटी भरल्याशिवाय कोणाला सांगायचे चोर चोळी ही गरोदर स्त्रियांची भरतात. तर ती कशाने भरायची आणि कशी भरायची तर तांदूळ, नारळ, खारीक ,बदाम, हळकुंड , सोबत हिरव्या बांगड्या शक्य असल्यास साडी पण देतात, नाहीतर हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस आणि नारळ एवढे ही चालते चौथ्या महिन्यातील ओटी भरतात नंतर सातव्या किंवा मग नवव्या महिन्यात अशी भरतात. त्या आधी कुठल्याही प्रसंगात प्रसुती पर्यंत ओटी भरत नाही. व माहेरच्या लोकांचा हा मान असतो बहीण, काकू, मावशी, अशांनी भरली तरी चालते पूर्वीच्या काळी ही ओटी भरल्या नंतरच ही बातमी इतरांना सांगत असत. व ओटीच्या वेळेस चौरंगावर तिला बसवतात आणि त्या खाली पंचामृत .हे छोट्या वाटीत किंवा बुडगुल्यात भरून ठेवतात दही ,दूध, मध आणि साखर असे ठेवायचे मग तिने पूर्ण गरोदरपणा मध्ये असे पंचामृत करून खायचे असा त्याचा उद्देश म्हणजे बाळासाठी चांगले असते. तीला मग दही , दूध भात खायला देतात त्या दिवशी कार्यक्रमात डोहाळे प्रमाणे सजावट म्हणजे हार, बंगळी अशी नसते अगदी साध्या पद्धतीने करायचे . तसेच जास्त नातेवाईकांना पण बोलवत नाही ही ओटी फक्त घरच्या घरीच केली जाते. तसेच स्त्रियांसाठी ओटी भरणे म्हणजे सौभाग्याचे प्रतीकच आहे .आपली आई आपल्या लेकीला आशीर्वाद देते.ह्या कार्यक्रमात पाच फळांनी ओटी भरतात. अजून एक गोष्ट ऐकण्यात आहे.जुने लोकं म्हणत की केळीची फणी मात्र ठेवत नाही कारण की केळीला एकदाच फळ लागते म्हणून हे फळ ओटी भरण्यात टाकायचे नाही. कारण हया झाडाला एकदाच फळ येते . म्हणून अशी शंका. येणाऱ्या बाळाची काळजी म्हणून तीन महिन्यात काहीही होऊ शकते तो पिरेड खूप नाजूक असतो खूप जणांना तीन महिन्याच्या आत बाळ दगावते किंवा काहीच कॉम्प्लिकेटेड केस होते . म्हणून न सांगण्याची प्रथा आहे आणि ते झाल्यानंतर सातव्याव नवव्या महिन्यातच ही ओटी भरतात .गरोदर स्त्रीची काळजी घेणे बाळाची चाहूल साधारण दीड महिन्यात लागते तसे तीन महिने झाल्यावरच.नंतर सत्व्यात व नवव्या महिन्यात डोहाळे जेवण केले जाते चोर चोळी हे साधारण बहुतेकांना माहित आहे. पण इतरांना ही माहीत असावे असे मला वाटले. ही ओटी भरण केले म्हणजे बाळाचा जन्म सुखरूप होतो अशी समजूत आहे.
लिलाताई वानखेडे
सुलहर
Comments
Post a Comment