सहर्ष स्वागत करत आहे
"विचारमंथन"
दि. २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३, श्री गुरु दत्तात्रय परिक्रमा गिरणार
जय गिरणार, मागच्या महिन्यातच मी गिरणार परिक्रमा व गुरुदत्त शिखर करुन आले, खुप छान झाली परिक्रमा. तर मला पुरंदरे वहिनींचा खास निरोप होता की, मॅडम तुम्ही ह्या विषयावर लिहावे
म्हणजे आम्हाला सविस्तर समजेल. तसं पाहिले तर ही सर्वांना माहितच आहे, मी काही वेगळे लिहिणार नाही . तरी माझा अनुभव लिहित आहे आणि तुम्ही पण ही परिक्रमा करू शकता . कठीण असली तरी सहज होते. फक्त देवावर विश्वास आणि आपला आपल्यावर विश्वास पाहिजे.
गुजरात प्रदेशात सौराष्ट्र मध्ये जुनागढ शहरात २ कि.मी.च्या अंतरावर एक भव्य-दिव्य पर्वत गिरणार विद्यमान आहे. पर्वताच्या पाचवे शिखर गुरुशिखरच्या नावाने ओळखले जाते. येथे भगवान दत्तात्रेयाच्या चरण पादुका आहे. त्यांच्या दर्शनासाठी दुरुन लाखो श्रध्दाळु लोक येतात. या गिरीनारायण म्हणजे गिरणार ने भगवान शंकराजवळ वरदान मागितले होते. शंकर भगवानने माझ्या या पर्वतावर ३३ कोटी देव देवतांचा वास असावा व सिध्द संतांचा निवास असावा. भगवान शंकराने त्याची मनोकामना पूर्ण केली आणि वरदान दिले की, इथे परिक्रमा, दत्त पादुका दर्शन, दत्त धुनाचे दर्शन व अन्नक्षेत्राचा प्रसाद घेणे हे अलौकिक पुण्यकर्म मानले जाते. या पर्वतावर दत्तात्रय भगवानने त्यांच्या आई वडीलांच्या आज्ञेनुसार १२००० वर्षापर्यंत कठोर तपस्या केल्या वर त्याच ठिकाणी आज स्वयंभु पादुका चरण आहे. त्या सगुण रुपाहून निर्गुण झाल्या. ज्या वेळेस दत्त भगवान गिरणारवर तपश्चर्या करत होते. तेव्हा तिथे भिषण अकाल पडला आणि सामान्य जीव जंतुंची पीडा बघुन दत्त माता सती अनुसयाने दत्त भगवानांना या भयानक संकटाचे निवारण करायला सांगितले तेव्हा दत्तांनी आपल्या तपश्चर्या अवस्थेतुन जागे होऊन आपल्या हातातल्या कमंडलुला दगडाने मारले आणि गंगा मातेला प्रकट केले ते स्थान म्हणजेच कमंडल कुंड या जागेवर दत्तात्रेयांनी आपल्या हातांनी अग्नि प्रज्वलीत केला, त्याला दत्ताग्नि म्हणतात. त्या ठिकाणी भगवान दत्तांचा अक्षय निवास प्रज्वलीत झालेला अग्नि आजपण गुरु-शिष्य परंपराच्या अंतर्गत तसाच जीवंत आहे. आजपण दर सोमवारी ९.०० वाजता या धुनीवरची भस्मासारखे करुन जवळ जवळ ५ मण पिंपळाची लाकडे ठेवली जातात आणि बाहेरील अन्य वस्तुंचा उपयोग न करता उदा. रॉकेल, आगपेटी, अग्नि स्वयं प्रज्वलीत होतो.
हा क्षण रोमांच करणारा असतो.
गिरणार संस्था ही गुरु-शिष्य परंपराच्या अंतर्गत व दत्त तपस्याच्या काळापासुन हे अन्न छत्र चालवले जाते. हे अन्नक्षेत्र या पृथ्वीवर सर्वात प्राचीन आहे. अशी आख्यायीका आहे. गिरणारच्या १०,००० पायऱ्यांवर भगवान दत्ताचे अक्षय निवासस्थान, येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी हे अन्नक्षेत्र कठीण परिश्रम करुन भोजन प्रसादाची व्यवस्था राबविली जाते हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. याच्या उपयोगात आणणारे अन्नधान्य, धुनी करीता पिंपळाचे लाकडे, गॅस सिलेंडर इ. सामान गरीब मजदुरांकडुन रोज ८ ते १० तासांचा प्रवास (पायी) निश्चित करुन वरती पोहचवला जातो कारण इथे वरती सामान चढवायला अन्य दुसरी सुविधा नाही. इथे दरवर्षी (प्रकोप) नुकसान, नैसर्गिक आपत्ती होऊन सुध्दा ही सेवा अविरत चालु राहाते. येथे दररोज हजारो भाविक येतात पण दर पौर्णिमेला उत्सवच भरतो आणि न चुकता येणारे भाविक सुध्दा आहे.
२) घझाला गुरुशिखरवरचा परीक्रमा / आता दुसरे विशेष म्हणजे येथे कार्तिकी एकादशी पासून तर कार्तिक पौर्णिमा पर्यंत पाच दिवसांची (जंगलातुन) परिक्रमा केली जाते. ही पर्वताच्या उजव्या हाताकडुन सुरुवात करायची असते. या परिक्रमाचा मार्ग जंगलातुन आहे. तिथे जंगली प्राण्यांचे वास्तव्य असुन सुध्दा श्री दत्तकृपेने आजपर्यंत लाखो भक्तांनी निर्विघ्न यात्रा पूर्ण केली आहे. ही यात्रा दत्तचरण पादुका, दत्त धुनी आणि अन्नक्षेत्राचा प्रसाद ग्रहण करुनही पूर्ण होते. दत्तात्रयाच्या काळापासुन शिष्य परंपरा चालु आहे. तेव्हापासुन आतापर्यंत शेकडो दत्त पिठाधिशांनी सेवा कार्य दिले आहे. सध्या तिथे आता पिठाधीश श्री महेश गिरीबापूंच्या देखरेखीखाली संस्थेचे संचालन होत आहे. भारतात जे जितके पण दत्त अवतार झाले आहे त्यांना भगवान दत्तात्रेयांनी इथे या स्थानावर दर्शन दिले आहे. या सिध्द भुमीचे महत्व प्रतिपादीत आहे. अध्यात्म आणि भक्तीची उच्चतम अनुभूती देणारे स्थान म्हणजे गिरणार / शारीरिक आणि मानसिक कष्ट कमी व्हावे म्हणुन आता गजरात सरकारने रोप-वे ची सुविधा केली आहे. रोपवेला जाण्यासाठी गिरणार की तलेटी जवळ यात्राकरुंना थांबावे लागते.
इथेच अन्न छत्र चालवले जाते. येथे रोज हजारो यात्रींचे भोजन करतात. यात्री सुविधेसाठी १० रुम्स आहेत. दत्त निवास बिल्डींगची संकल्पना करत आहे. आपल्या भक्तांच्या सहकार्याने लवकरच काम पूर्ण होईल. येथे छीडवडी गावाजवळ गिरणारी गो-शाळा पण आहे. त्याचे दूध दत्ताच्या पुजेसाठी व अन्नक्षेत्री उपयोगात आणतात. गोशाळेसाठी पण दान देतात ही झाली माहिती.
माझी परिक्रमा कशी झाली ते सांगतेः-
परिक्रमाः ग्रुपमध्ये मला एक स्नेही मैत्रीण मिळाली, तिचे नांव संपदा होते. चला एक मैत्री संपदा मिळाली. जुनागडला धर्मशाळेत उतरलो. रात्रीचे जेवण करायला गेलो तसे पायी जाण्यासारखे नव्हते पण अफाट गर्दीमुळे तिथं पर्यंत रिक्षा मिळत नसत. मग आम्हाला आमच्या टूर ऑर्गनायझर श्री. अमर सरांनी सांगितले की, आपल्याला परिक्रमेसाठी ह्या गेटने जायचे आहे व परवा ह्या पहिल्या पायरीचे दर्शन घ्यायचे. नमस्कार करुन गिरणार दत्त भगवानाची प्रार्थना करुन यात्रा सफल होओ असे म्हणुन पायरी चढायला सुरुवात करणार आहे. तसेच चालता चालता रस्त्यात श्री मारुती मंदिरात रामचे दर्शन घेतले. सकाळी पण जाणार होतो कारण संकटहारी हा आपला मारुतीराय श्री. रामभक्तच ना. नंतर परत धर्मशाळेत आलो. तसे मला खुप दिवसांपासुन जायचे होते पण प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, त्याप्रमाणे आज तो दिवस आला होता. या आधी मी गिरणार गुरुशिखर 10,000 पायऱ्या चढुन दर्शन घेतले होते. इथे परिक्रमापण होते. ऐकले होते, पण त्याचे स्वरुप कसे असते हे कधी जाणुन घेतले नव्हते. फक्त परिक्रमा करायची हेच ध्येय होते आणि आधी समजुन घेणे हे माझ्या स्वभावातपण नाही. कारण आधीच जाणुन घेतले तर ते ऐकून ते कठीण आहे, असे समजले असते तर कदाचीत आपण जाऊ शकणार नाही. करावे असे योजिले पण नसते असो. आधी परिक्रमा सुरु केली. सकाळी ८.०० वाजता जय गिरणार बोलुन आम्ही सर्व २०-२५ लोक गेटमधुन सुरु केली, चाललो-चाललो पुढे फक्त चालतच राहिलो. मधे-मधे खाच खळगे, चढ उतार खुप होते, आजू बाजूला संपूर्ण जंगलच जंगल. मधे मधे बोर्ड लावले होते ते असे, थोड्या थोड्या अंतरावर पाणी (लिंबु), चहा, इत्यादी किरकोळ खाद्य, मोठ्या प्रमाणावर लंगर पण होते (मोफत), कधी पाण्याचे झरे, तलाव, पहाड, डोंगर असा रस्ता ओलांडत होतो. मधे मधे लोकांना विचारत होते, किती राहिले तर थाडेच असेल असे सांगायचे असे दोन तीन डोंगराची चढ उतार झाल्यावर रस्त्यात देवीचे मंदिर लागले व आता जवळच आले आहे असे ऐकुन खुश झाले व परत दुसऱ्या गेटमधुन बाहेर आलो. जवळ जवळ १५-१६ तास लागले. ४० किलोमीटर चालायला रस्ता खुप कठीण. तिथे डोली नाही, घोडा नाही, सर्व कठीण, पण अशक्य नाही. रात्री ९.०० वाजता पोहोचलो. खुप पाय दुखत होते. रुमवर आलो. छान कडक गरम पाण्याचे आंघोळ केली व फ्रेश होऊन झोपी गेले. एक दिवस आराम केला व संध्याकाळी ६.०० वाजता गिरणार शिखरा करता पायरी पायरीने चढायला सुरुवात केली (काठी हाच आपला आधार असतो). सुरुवातीला पहिल्या पायरीवरच भक्त कापूर लावतात, नारळ फोडतात. देवी, राम, सीता, हनुमानाचे दर्शन घेऊन गिरणारीचा जय जय कार करुन चढायला सुरुवात करतात. लाखो पदयात्री असतात. सुरुवातीला सर्व बरोबर असतात पण पुढे गेल्यावर कोणीच दिसत नाही. प्रत्येकजणांच्या चालण्याची गती मागे-पुढे होते. इथे पण अंबाजीचे मंदिर लागते, म्हणे निम्मा रस्ता झाला असे समजतात. पुढे डाव्या बाजुला अन्न छत्र प्रसाद असतो तो वर चढुन आल्यावर घेतात. खुप स्वादिष्ट आणि शिस्तबध्द असे आयोजन नियोजन असते. पुढे भक्त पाण्याची बाटली मिळते. अजुन वर गेल्यावर काहीच मिळत नाही. रस्ता पण अरुंद होत जातो व सिंगल लाईन लागते (मंदिर लागतात) टोकावर १०,००० पायऱ्या चढल्यावर जी श्री दत्त भगवंतांना भेटण्याचे दर्शनाचा क्षण येतो आणि काय खुप सुंदर अशा दत्तमुर्तीचे दर्शन होते. १० बाय १५ फुटाची जागा असेल. कोणालाही तिथे जास्त थांबता येत नाही, दर्शन झाले की लगेच पुढे निघायचे व उतरायला सुरुवात करायची. थांबत थांबत पायऱ्या उतरायच्या. मग प्रसाद घेऊन वर यायचे. गुरुदत्तात्रेय धुनी आहे तिथे येऊन जाऊन ५०० पायऱ्या असतील बहुतेक. शिखर चढताना भावनाथ मंदिर संतोषीमाता, गोरक्षनाथ मंदिर, गोपीचंद मंदिरात गुहा असे अनेक छोटे मोठे मंदिर लागतात. परतीचा प्रवास सुरुहोतो . पुढे पण तश्याच खाली-वर पायऱ्या असतात. रात्रभर चालतच होतो. दर्शन, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर झाले, ३।। / ४ वाजता खाली पोहोचलो. १८-१९ तास लागले. बरोबरीचे मागेपुढे होतात. कोणी हळु हळू येतात, पायात गोळे आले होते. पाय उचलत नव्हते. पण देवाचे दर्शन झाल्यामुळे सर्व ठिक म्हणत धन्य होतो. तिथुन सकाळी 11 वाजता पोहोचलो खाली मग रिक्षा करुन धर्मशाळेत आली. एक-एक जण येत होते. सर्व रात्रीपर्यंत जमा झाले. सकाळी परतीचा प्रवास सुरु झाला. एकुण काय, इच्छा असली की मार्ग सापडतो आणि देव भगवंताच्या दर्शनाने धन्यता वाटते. काही भक्त दर पौर्णिमेला न चुकता येणारे पण आहेत. आणि डोल्या पण असतात कुठेही कसलीही भिती वाटत नाही.
🙋♀️सुलहर🖋️
Comments
Post a Comment