दिवाळी

सहर्ष स्वागत करत आहे 
"विचारमंथन"
दीन दीन दिवाळी!
परवा मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. "काय म्हणते? कशी आहेस?"  बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला कारण परवा दिवाळी आली तू माझ्याकडे ये
ती जरा नाराजीनेच बोलली आता मला दिवाळी आली की जुनं सारं वैभव आठवून जीव रडकुंडीला येतो. चार दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं? एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का मी ओझं? 
 
मी म्हटले, "अगं, असं काय म्हणतेस? तुला तर सुट्टीच आहे ना मग काय प्रॉब्लेम नाही गं... सर्व ठीक आहे मग तरी सुद्धा असे का बरं म्हणतेस?

तर ती म्हणाली, "काय सांगू आम्ही चौघे बहीण भाऊ. कुणीच कुणाशी बोलत नाही. मी कुठे जाऊ?

आता कुणी कुणाकडे जात येत नाही आणि आम्हालाही दोन दिवस कुणीच बोलावीत नाही.चार दिवस कसे जातील? मलाच प्रश्न पडतो लहानपणीचे फोटो पाहून मी एकटीच रडते. मुलांना काय सांगावे बरे यातले? मुले विचारतात, आई आपल्याला मामाकडे, काकां कडे का मावशी कडे जायचं यावेळी? पूर्वीच्या काळी नातेवाईक जरी गरीब होते तरीही ते एकमेकाकडे जात येत होते. कुणाकडे गेल्यानंतर मनापासून स्वागत व्हायचं सारं काम साऱ्यानी 
मिळून मिसळून करायची. सुख सोयी फार नव्हत्या पण वृत्ती चांगली होती. गरिबी असूनसुद्धा मायाळू होती माणसे. खूप मज्जा होती.
मी म्हणाले, "खरं आहे. ती पुढे बोलली,
"मुरमुऱ्याच्या चिवड्यामधेएखादा शेंगदाणा भेटायचा त्याप्रसंगी आनंद मात्र आभाळा एवढा व्हायचा. लाल, हिरव्या रंगाचे वासाचे तेल असायचे. अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात बुडाला जाऊन बसायचे. लाडू, शंकरपाळे, चकली सर्व एकत्र बसून खायचे. फटाके उडवताना मात्र एकमेकांशी भांडून घ्यायचे. उत्साह आणि आनंद मात्र काठोकाठ असायचा. सख्खे असो, चुलत असो... वाडा अगदी गच्च भरलेला दिसायचा माणसांनी. चपला नव्हत्या, बूट नव्हते, कपडेही धड नव्हते तरीही आनंदाने जगण्याची मोठी धडपड. आता सारे झालेत श्रीमंत, पण वाडे गेले पडून, नाते गोते प्रेम माया गेली विमानात उडून!
घराघरात दिसतो आता सुबत्तेचा पूर तरी आहे मनामनात चुली सारखा धूरच धूर. पाहुण्यांचे येणे- जाणे आता संपून गेले. दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण पार  संपून गेलेत. श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे मोठे  सण असतात फ्लॅट आणि बंगल्यामधे 
दोन चार माणसं दिसतात.
माझी आई म्हणते, 'प्रवासाची सुटकेस आता अडगळीत पडली.' त्या दिवशी ती माझ्याजवळ धाय मोकलून रडली. हँडल तुटके होतं तरी सुतळी बांधत होती. माहेरी जायला तिची मला खूप सोबत होती. तर सुटकेस म्हणली, 'मला पाहुण्याकडे नेत जा कमीत कमी दसरा- दिवाळीत तरी माझा वापर करीत जा.' सुटकेसचं बोलणं ऐकूण माझं ही काळीज भरून आले. म्हटले, बाई माणसाचं आता नातंच तुटलं गं.'
मग मी तिला म्हटले, 'आपणच मोठेपणा घेऊन गरीब श्रीमंत  लहान-मोठे जरा बाजूला ठेवू. बहीण, भाऊ, काका, काकू पुन्हा नाती जोडून पाहू. नको दुखी: होऊ  माझ्या कडे ये माझ्या भाच्यांना घेऊन या वर्षी माझ्या कडे दिवाळीला ये हे ऐकून तिचे  मन भरून आले.
'आता परत एकदा  सुटकेस काढा. तिला कपड्याने भरा  मुलांचे बोट धरून आनंदाने दिवाळी करायला या जरा.' हे ऐकून तिला छान वाटले आणि आनंद झाला असे की मला कोणीतरी दिवाळीला बोलावले
म्हणून. 
खरंच ही सध्याची परिस्थितीच अशी आहे. नाते दुरावली जात आहेत. पण काय करणार?
         कालाय तस्मै नमः 🙏
                                 सुलहर 🖋️

Comments

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"