लग्न

स्वागत करत आहे "विचारमंथन"

लग्न:-एक परिवर्तन
शुभमंगल सावधान! असे शब्द कानावर पडले की सर्व मंडळींना हायसे वाटते व आटोपले. 'लग्न' म्हणजे नक्की काय? असा प्रश्न लहानपणी सर्वांनाच पडतो व लहान बुद्धीप्रमाणेच विचार होतो दागिने आणि नवीन साड्या, नटायला मिळणार पण लग्न या शब्दात किती अर्थ गुण लपलेले आहे, हे लग्न ठरलेल्या अथवा लग्न झालेल्या मुलीलाच समजते तेव्हा ती मनातून हलते. आपल्याला आईचं घर सोडावं लागणार! 
तसं लग्न म्हणजे सामाजिक व पारंपारिक एक शुभ सोहळा व नात्याचे बंधन आहे व एक गोड स्वप्न. पुढे म्हणजे लग्न झाल्यावर कोणी सुखी आहे का? असे प्रत्येक विवाहितांना विचारले जाते तर कदाचित काही संमिश्र उत्तर येते असो . छान चाललंय अस म्हणतो. आता सुखी म्हणजे नक्की काय? लग्न म्हणजे नशिबाची लॉटरी किंवा पत्त्याचा डाव तर ते कसे लॉटरी म्हणजे एकदम अनपेक्षित कल्पनेपेक्षा वेगळे मिळते जसे पत्त्याचा डाव  हातात आलेल्या पत्त्याप्रमाणे डाव खेळणे, कधीही हुकमाचा एक्का येतो तर कधी साधे पाने असतात. जसे असेल तसे खेळी खेळायची असते व डाव जिंकायचा प्रयत्न करायचा असतो. कधी जिंकतो तर कधी हरतो पण प्रयत्नाची ही जीत असते, शेवटी लग्न हे एक जीवनात तडजोड करणे असते. कारण मुलींच्या माता- पित्याला तीचे पुढील जीवन आनंदाने जगण्यासाठी एक चांगला जीवनसाथी हवा असतो. तर तो सर्वांनाच मनासारखा मिळतोच असे नाही. हे एक  सामाजिक बंधन आहे त्यात राहून एकमेकांना समजून सहजीवन जगण्याचा एक मार्ग. लग्न झाल्यावर काही दिवस  सर्वांचे सुरळीत चालते पण नंतर घरात काहीतरी कारणावरून वाद मत भेद होतात. किंवा दोघांना आपण लग्न का केले असे विचारणा होते? तर काय उत्तर मिळते का? काही कुटुंबामध्ये तर मुलांवरून वाद होतात तर काही वेळा घरातील नातेवाईकांपासून जसे  सासू-सासरे दीर-नंणंद. इतरांशी पण काही झालं तरी तुम्हाला संसार करावाच लागतो. प्रत्येक नात्याचा हसरा मुखवटा चढवून वागावे लागते. पण कधी कधी असे वाटते मुले आहेत म्हणूनच बरं कारण त्यांचा विचार करून पती-पत्नी एकमेकांना धरून राहतात. कारण प्रत्येक वेळेस असा विचार येतो की मुलांचे काय त्यांचा काय दोष? खरे तर प्रत्येकाचे एकमेकात पटत नसते, कारण फक्त मतभेद विचार, आवड निवड वेगळी असतात. ज्याप्रमाणे नदीचे दोन किनारे एकमेकांना समांतर असून एकमेकांना कुठेच मिळत नाही त्याचप्रमाणे. उभयंतांचे मधे मुले म्हणजे नदीवरील पूल असतो कारण ज्या वेळेस लग्न होते त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघते आपण आपले मुले व घर पण प्रत्यक्षात स्वप्न पूर्ण करण्यातच संसार पूर्ण होतो अर्थात बहुतांचे तसे नसते शेवटी कुटुंब हे रेल्वेलाईन प्रमाणे असते जसे आयुष्यात शेवट पर्यंतसोबत असतात. हे जोडण्याचे काम संसारात मुले आईवडील करतात. जसे रेल्वेलाईन रुळामध्ये  (लाकडी जाड पट्ट्या) जोडण्याचे काम स्लीपर करतात. आणि संसारातही  दोन रुळाला जोडून ठेवायचे काम मुले करतात. तर मग लग्न म्हणजे काय? दोन घराणं जोडून आनंदाने, समजूतदारणे जोडीने करायचा संसार होय. 
सं:- संमतीने 
सा:- सातत्याने
र:- राहणे रमणे (र- धातू)

पण हे प्रत्येकाच्या नशिबात आहे का? न हे ज्याचे त्याचे नशीब. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आईचा संदेश असतो की दिल्या घरी तू सुखी राहा व दोघे घराण्याचे नाव उज्वल कर,सर्वांशी प्रेमाने वाग. 'तेच तुझे घर आहे', आईच्या ह्या शब्द मुलीच्या मनावर खोल रुजलेले असत व संसार करता करता सासरच्या कधी होऊन जातात कळत नाही व सासरची आणि माहेरचे नाव उज्वल करतात, तेही एक समाजाच्या चौकटीत राहून!


                                सुलहर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"